भारत सरकारच्या केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्लीः भारत सरकारच्या केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ३१ मार्च २०२१ रोजी बनावट ड्रायव्हिंग लायसन्सवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय नोंदणीला सुरुवात केली आहे. नॅशनल रजिस्टरवर ड्रायव्हिंग लायसन्समधील कोणताही बदल यापुढे ऑनलाईन पद्धतीने केला जाणार आहे. तसेच घातक वाहनचालकांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे अशा वाहनचालकांची नावेसुद्धा जाहीर केली जाणार आहेत.
नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याविषयीची संपूर्ण माहिती राष्ट्रीय माहिती केंद्राच्या सारथी पोर्टलवर उपलब्ध आहे. आणि ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्यानंतर पुढच्या काही महिन्यांतच सारथीवर उपलब्ध असलेला डीएलचा जुना डेटा त्यावर स्थलांतरित होणार आहे. त्याचप्रमाणे परिवहन मंत्रालयाने ज्या वाहनचालकांचा परवाना रद्द केला आहे किंवा मोठी चूक केली आहे, त्यांच्या यादीची माहिती देण्याचासुद्धा निर्णय घेतला गेलाय.