सांगलीत महावृक्षांची दत्तक मोहीम; ३०० वर्ष जुने झाड घेतले दत्तक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2021
Total Views |

tree_1  H x W:


'प्लॅनेट अर्थ फाउंडेशन'चा उपक्रम

सांगली (प्रतिनिधी) - सांगलीतील 'प्लॅनेट अर्थ फाउंडेशन'ने शहरी भागातील महावृक्षांच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. यामाध्यमातून शिराळ्यातील ३०० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले गोरख चिंचेचे झाड पुढील २५ वर्षासाठी दत्तक घेण्यात आले आहे. एका नागरी पतसंस्थेने 'प्लॅनेट अर्थ फाउंडेशन'च्या माध्यमातून झाडाच्या मूळ मालकांकडून हे झाड दत्तक घेतले आहे.

महावृक्ष संवर्धन आणि संशोधन प्रकल्पाअंतर्गत 'प्लॅनेट अर्थ फाउंडेशन'कडून शिराळ्यातील महावृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.१०० पेक्षा जास्त वयोमान असलेले आणि तीन फुटापेक्षा जास्त घेर असलेली सर्व वृक्ष या प्रकल्पाअंतर्गत संवर्धित होणार आहेत. फाऊंडेशनच्या माध्यमातून शिराळ्यातील पर्यावरणप्रेमी शैलेश कुरणे यांच्या खाजगी मालकीतील आंब्याचे मोठे झाड पुढील १५ वर्षांसाठी संवर्धित करण्यात येणार आहे. तसेच शिराळ्यामधीलच ३०० वर्षांपूर्वी पेक्षा जास्त वय असलेले ऐतिहासिक गोरख चिंचेचे झाड पुढील २५ वर्षासाठी संवर्धित होणार आहे. तसा निर्णय या झाडाचे मालक रणजित आणि अभिजीत नाईक यांनी घेतला असून हे झाड दत्त नागरी पतसंस्थेला पुढील २५ वर्षासाठी दत्तक पत्राद्वारे हस्तांतरित करण्यात आले आहे.
 
अनोख्या पध्दतीने वृक्षसंवर्धनाची मोहीम राबविली जाणार असल्याने शेकडो वर्षापासून तग धरून असलेले महावृक्ष यापुढेही अबाधित राहणार आहेत. वृक्षसंवर्धन करार ही मूळ संकल्पना ए.इ.आर.एफ संस्थेच्या प्रेरणादायी कार्यतून मिळाली आहे. संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून असे आढळले आहे की, गेल्या १५ वर्षात शेकडो झाडांची तोड विविध कारणांसाठी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने घरबांधणी, रस्ते विकास, कारशेड उभे करणे, शेतीचे क्षेत्र वाढवणे अशी विविध कारणे आहेत. परंतु, अशाप्रकारच्या महावृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये गेल्या पंधरा वर्षाच्या तुलनेत सध्या २५ ते ३० टक्के महावृक्ष उरले आहेत.
 
लहान रोपांचे महावृक्ष होण्यासाठी पुढची ५० ते १०० वर्षांचा अवधी लागतो. त्यामुळे सध्या तग धरून असलेले स्थनिक देशी प्रजातीचे महावृक्ष जपणे हे सर्वांचेच प्रथम कर्तव्य आहे. 'प्लॅनेट अर्थ फाउंडेशन' संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र राबवला जाणार आहे. सर्व स्थानिक शासकीय आणि अशासकीय संस्थांनी या संस्थेला संपर्क करावा (PEF: 9657493161). तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी संस्थेशी संपर्क करून आपले झाड संस्थेकडे नोंद करावे असे आवाहन ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@