का ठरतोय बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग वन्यजीवांचा मृत्यूचा सापळा ?

    01-Jul-2025
Total Views |
balharshah-gondia railway



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग हा दक्षिण विदर्भातील वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे (balharshah-gondia railway). रविवार दि. २९ जून रोजी पहाटे या रेल्वेमार्गावरील लोहारा-जुनोना दरम्यान सांबराच्या गर्भवती मादीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला (balharshah-gondia railway). ही धडक इतकी जोरदार होती की, मादीच्या पोटातील पूर्ण वाढ झालेले पिल्लू हे पोट फाटल्याने बाहेर फेकले गेले (balharshah-gondia railway). गेल्या वर्षभरात १४ वन्यजीवांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे (balharshah-gondia railway). यामध्ये तीन वाघांचा समावेश असून रानगवा, अस्वल, सांबर, चितळ या प्राण्यांचा देखील समावेश आहे. (balharshah-gondia railway)
 
 
 
लोहारा-जुनोना जंगलातून जाणाऱ्या बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर रकसोल एक्सप्रेसने रविवारी सकाळी ४ च्या सुमारास एका गर्भवती सांबराला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की,सांबराचे पिल्लू पोट फाटल्याने रेल्वे रुळाच्या बाजूला फेकले गेल. त्या पिल्लाचे कोवळे पायाचे खूर सुद्धा गुलाबीसर होते. सांबराच्या पोटाचा कापलेला भाग पिल्लापासून जवळपास १०० मीटर दूर फेकल्या गेला. सांबराचे मागील पाय सुमारे ५० मीटर दूर फेकले गेले. सांबराच्या पोटाचा भाग पूर्णपणे रेल्वे अपघातात छिन्नविछिन्न अवस्थेत रुळावर पडलेला होता.
 
 
या अपघाताची माहिती वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जुनोना मेश्राम, वनपाल डी. जी कांबळे, वनरक्षक आर दि पायपरे यांना देण्यात आली. वनकर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी 'हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीट'चे अध्यक्ष दिनेश खाटे व सहकारी अमित देशमुख, किरण बावस्कर,नाजिश अली उपस्थित होते .बल्लारशाह-गोंदिया रेल्वे ही जंगलातून जाते. सर्वात जास्त अपघात हे लोहारा ते मूल दरम्यान होतात. चंद्रपूरमधील हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी ही संस्था रेल्वे रुळावरून जाणाऱ्या प्रत्येक प्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवून असते. अशा रेल्वे अपघातातील मृत वन्यप्राण्यांचे शास्त्रीय पद्धतीने नोंदी करते. याच मार्गिकेवर मध्यप्रदेशमधील बालाघाट - नैनपुरदरम्यान वन्यजीवांच्या सुखकर हालचालींसाठी १० अंडरपास आणि दोन ओव्हरपास बांधण्यात आले आहेत. म्हणजेच काही ठिकाणी रेल्वे मार्ग उन्नत स्वरुपात बांधण्यात आला आहे, तर काही ठिकाणी रेल्वे मार्गावरुन वन्यजीवांसाठी उन्नत पूल उभारण्यात आला आहे. या अंडरपास आणि ओव्हरपासमधून २३ प्रजातींचे वन्यजीव ये-जा करत असल्याची नोंद 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'ने केली आहे. यामध्ये वाघ आणि बिबट्याचा देखील समावेश आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना या बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावर करण्यात आलेल्या नाहीत.
 

वेगावर मर्यादा महत्त्वाची
२०१८ साली बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्यानंतर वन विभाग आणि रेल्वे प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर वनक्षेत्रामधून जाणाऱ्या रेल्वेचा वेग ४० किमी प्रति तास करण्यात आला. मात्र, याची अंमलबजावणी फार काळ झाली नाही. सध्या या मार्गावरुन १०० तास प्रति किमी याच वेगाने रेल्वे धावते. त्यामुळे गव्यासारख्या मोठ्या प्राण्याचा देखील रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू होतो. - दिनेश खाटे, अध्यक्ष - हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी