महाराष्ट्र वन विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पदे रिकामी

    25-Jun-2025
Total Views | 101
 IFS transfer
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्र वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन आदेश २४ जून रोजी प्रसिद्ध झाला (IFS transfer). यामध्ये भारतीय वन सेवेतील अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, तर महाराष्ट्र वन सेवेतील काही अधिकाऱ्यांना भारतीय वन सेवेत पदोन्नती देण्यात आली (IFS transfer). बदलीच्या या आदेशात विदर्भातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या पश्चिम महाराष्ट्रात करण्यात आल्या आहेत (IFS transfer). अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ही पहिली यादी असून दुसरी यादी येत्या दोन दिवसात प्रकाशित होईल. (IFS transfer)
 
 
१९९५ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी विवेक खांडेकर यांची बदली प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) या पदावरुन प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण, पुणे) या पदावर करण्यात आली. तर उत्पादन व व्यवस्थापन या पदावर १९९४ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी संजीव गौड यांची नियुक्ती करण्यात आली. डाॅ. बेन क्लेमेंट यांच्या दिल्लीवारीवरुन रिक्त झालेल्या पदावर चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. मात्र, हे पद अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम या पदावरुन मुख्य वनसंरक्षक असे करण्यात आले आहे. २००२ बॅचचे आयएफएस अधिकारी पुण्याचे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांची बदली ठाण्याच्या मुख्य वनसंरक्षक या पदावर झाली आहे. तर प्रवीण यांच्या जागी संशोधन विभागाचे वनसंरक्षक आशीष ठाकरे यांची बदली झाली आहे.
 
 
पुण्याच्या वन्यजीव विभागाचे उपवनसंक्षक तुषार चव्हाण यांची बदली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मंत्रायलातील उपसचिव विवेक होशिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरचे उपवनसंरक्षक डाॅ. भरत सिंह हाडा यांना जैवविविधता मंडळाच्या सदस्य सचिव पदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे. ठाण्याच्या वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांची बदली पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदी करण्यात आली आहे. जुन्नरचे उपवनसंरक्षक म्हणून चंद्रपूर वन विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. बदल्यांच्या या पहिल्या यादीमुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प रिकामी झाले असून येणाऱ्या दुसऱ्या यादीत प्रकल्पात काम करण्याची संधी कोणाला मिळणार आहे, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121