ठाणे : ठाणे महानगरपालिकेत वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा, कारण १६ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पदाचे नाव : अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) , पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदांवर भरती केली जाणार आहे.
एकूण पदसंख्या : एकूण 42 पदे रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने एमबीबीएस पदवीधर असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण : ठाणे महानगरपालिका क्षेत्र
अर्ज पाठवण्याचा पत्ता : नरेंद्र बल्लाळ सभागृह, 1 ला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे - 400602
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जुलै २०२५
अधिकृत वेबसाईट: [https://thanecity.gov.in](https://thanecity.gov.in)
महत्वाची सूचना: या भरतीसाठी उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज करावा लागेल. आवश्यक कागदपत्र सोबत घेणे अनिवार्य आहे. रिक्त पदांनुसार निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अर्ज सादर करावा. ही संधी दवडू नका!