बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये आता वाघाच्या बछड्यांचे दर्शन

    24-Jun-2025
Total Views |
borivali national park tiger safari


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त वर्षभरापूर्वी जन्मलेल्या वाघाच्या तीन बछड्यांना मंगळवार दि. २४ जून रोजी व्याघ्र सफारीत सोडण्यात आले (borivali national park tiger safari). त्यामुळे यापुढे व्याघ्र सफारीकरिता जाणाऱ्या पर्यटकांना वाघाच्या बछड्यांचे दर्शन घडणार आहे (borivali national park tiger safari). सद्यपरिस्थितीत बछडे धरुन राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र विहारातील वाघांची संख्या आठ आहे. (borivali national park tiger safari)
 
 
राष्ट्रीय उद्यानातील सिंह आणि व्याघ्र सफारी हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. वाघ आणि सिंहाच्या दोन सफारी याठिकाणी उपलब्ध आहेत. यामधील वाघांच्या सफारीत मंगळवारी पहिल्यांदाच वाघाच्या बछड्यांना सोडण्यात आले. या बछड्यांचा जन्म १७ मे, २०२४ रोजी श्रीवल्ली आणि बाजीराव या वाघाच्या जोडीच्या पोटी झाला होता. जन्मानंतर त्यांना वर्षभर पिजरांबद अधिवासात वाढण्यात आले. त्यानंतर मंगळवारी त्यांना सफारीतील खुल्या पिंजऱ्यामध्ये सोडण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला. २०२३ साली श्रीवल्ली आणि बाजीराव या वाघाच्या जोडीने चार बछडे जन्मास घातले होते. मात्र, त्यामधील केवळ शक्ती नामक नर बछडा जगला होता. त्यानंतर २०२४ साली या जोडीने पुन्हा एकदा बछड्यांना जन्म दिला होता.
 
 
सद्यपरिस्थितीत राष्ट्रीय उद्यानाच्या व्याघ्र विहारात या तीन बछड्यांसह एकूण आठ वाघांचा अधिवास आहे. यामध्ये श्रीवल्ली, बाजीराव, शक्ती, बिजली आणि लक्ष्मी या वाघांचा समावेश आहे. तर सिंह विहारात छाव्यासह एकूण पाच सिंहाचा अधिवास आहे.