जेव्हा मुख्यमंत्र्यांमधील पक्षीमित्र जागा होतो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2021
Total Views |

bird _1  H x W:

गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान केले पक्षीनिरीक्षण

 


मुंबई - काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर-भंडारा जिल्ह्यांचा दौरा केला होता. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांमधील पक्षीमित्राची छबी दिसून आली. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करत असताना त्यांनी वेळ काढून वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तन्मयतेने याठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांमधील पक्षीप्रेम दिसून आले.


 

पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. या दौऱ्यात त्यांनी पवनी तालुक्यातील प्रकल्पस्थळाला भेट दिली. या भेटीतील नियमित उपक्रमांसोबतच एक अनोखा उपक्रम होता तो या जलाशयातील पक्षीसंपदेची माहिती करून घेण्याचा. वन परिक्षेत्र अधिकारी आणि पक्षी निरीक्षक पांडुरंग पाखले यांनी मुख्यमंत्र्यांना जलाशय परिसरातील पक्षांच्या विविध प्रजातींची माहिती दिली. येथे येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची माहिती जाणून घेण्यास मुख्यमंत्र्यांनी विलक्षण आस्था दर्शविली. जलाशयात विहार करीत असलेल्या पक्ष्यांच्या सवयी, अधिवास, वैशिष्ट्ये आदींबाबतही त्यांनी विविध बाबी अतिशय औत्सुक्याने जाणून घेतल्या.


या प्रकल्पात निर्माण झालेल्या जलसाठ्यामुळे विविध स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या प्रमाणात येतात. मुख्यमंत्र्यांनी येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा भ्रमण मार्ग आणि त्यांचे मूळचे अधिवासी देश यासंदर्भात माहिती घेतली. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये सायबेरिया, चीन, दक्षिण आफ्रिका यासह लडाख, हिमाचल आधी भागातूनही मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. त्यासोबतच स्थानिक पक्षांबद्दल उत्सुकतेने माहिती घेतली. येथील जलाशयात पाणकावळे, बगळे, खंड्या, ढोकरी, तुयीया अशा अनेक प्रजाती कायम वास्तव्याला असतात. त्यांच्या आवडीचे मासे मोठ्या प्रमाणात येथे उपलब्ध आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज या परिसरातील 50 पेक्षा जास्त पक्षांचे निरीक्षण केले.


काही पक्षी दक्षिणेकडे जाताना त्यांचा काही काळ मुक्काम या परिसरात राहतो तर काही पक्षी अधिक काळही येथे वास्तव्याला राहतात. पक्षीनिरीक्षण हा पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असल्यामुळे स्थलांतरित व स्थानिक पक्षांचे जेथे वास्तव्य आहे त्यांचे वास्तव्य अधिक सुरक्षित करण्यात यावे. त्यामुळे स्थानिक पर्यटनाला अधिक चालना मिळेल असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूरच्या गोरेवाडा परिसरात पक्ष्यांच्या 225 पेक्षा अधिक प्रजाती आहेत स्थलांतरित पक्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती यावेळी त्यांनी घेतली. समृद्ध अशा पर्यटनस्थळांना संरक्षित करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी या भेटीमध्ये विशेष रुची दाखवली. गोरेवाडा प्राणीसंग्रहालय परिसरातील पक्षीनिरीक्षणासाठी श्री.पाखले यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी निमंत्रित केले. या पाहणीनंतर झालेल्या बैठकीत त्यांनी पर्यटन विकासासाठी होऊ शकणाऱ्या प्रयत्नांबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ठाकरे निसर्गप्रेमी असून त्यांना वन्यजीवांविषयी विशेष आस्था असल्याचे साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र आज या दौऱ्याच्या निमित्ताने या साऱ्यांतून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे राजकारणापलीकडची तरल संवेदनशिलता दर्शविणारे एक मनोहारी व्यक्तिमत्व उलगडले.

 

@@AUTHORINFO_V1@@