जय श्रीराम...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020   
Total Views |


Congress_1  H x



भारतातली गाव-खेड्यातली निरक्षर व्यक्तीही सांगेल की, प्रभू श्रीरामचंद्राचे नामस्मरण हे स्वत:च इतके शुभ आहे की, त्यांच्या नामस्मरणासाठी आणि कार्यासाठी कोणताही मुहूर्त हा शुभच आहे. पण, अति अतिपुरोगामी निधर्मी पक्षाचे अर्थात नाव घ्यायला हवे का? तर त्या निधर्मी पुरोगामी पक्षाचे नेते दिग्विजय सिंग म्हणाले, “राम मंदिराचा शिलान्यास हा वेदांद्वारा स्थापित मान्यतांच्या विरूद्ध होत आहे.” थोडक्यात, त्यांना म्हणायचे आहे की, राम मंदिराच्या शिलान्यासाचा मुहूर्त शुभ नाही. वर दिग्विजय असेही म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशुभ वेळी राम मंदिराचे भूमिपूजन करून तुम्ही किती लोकांना दवाखान्यात पाठवणार आहात? पुरोगामी, अतिपुरोगामी निधर्मी की काय असलेल्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ (?) नेते दिग्विजय सिंग यांनी पंतप्रधानांना हा प्रश्न विचारला. राम मंदिर भूमिपूजन केल्याने लोक आजारी पडणार आहेत? हा कसला तर्क आहे? दिग्विजय कोण? मोठे पंडित ज्योतिषी आहेत का? अरे हो, बरे आठवले, हिंदू धर्मात ज्योतिष, शुभ-अशुभ मानतात वगैरे वगैरे म्हणत. हिंदू धर्माची निंदानालस्ती करण्यात दिग्विजय सिंगही कधी मागे नव्हते. हिंदू धर्माबद्दल काहीही निंदाजनक बोलले की, आपण मोठे पुरोगामी असा मूर्ख विचार त्यांचा होता. त्यामुळे प्रश्न असा आहे की, दिग्विजय यांनी कधीपासून वेद, धर्म वगैरेवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. याचे उत्तर आहे की, दिग्विजय किंवा त्यांच्यासारख्या नेत्यांनी हिंदू धर्म आणि श्रद्धा यावर विश्वास कधीही ठेवला नाही आणि ठेवणारही नाहीत. यांची धर्मश्रद्धा सोयीची आहे. यांचा विरोध मुहूर्ताला वगैरे नाही, तर यांचा विरोध आहे तो येणार्‍या काळात हिंदू धर्माच्या इतिहासातील वैभवशाली पर्व म्हणून या शिलान्यासाचा अभिमानाने उल्लेख केला जाणार आहे त्याला. आजपर्यंत भारतीयांना पराजितांचा इतिहास शिकवला गेला. पण, यापुढे इतिहासाची पाने उलटवत भारताने पुन्हा धर्म इतिहास घडवला हे सांगावे लागणार आहे. खरे दु:ख आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिराचा शिलान्यास झाला त्याचे! त्यामुळेच दिग्विजय सिंग म्हणत आहेत की, ‘रामजन्मभूमी शिलान्यास मुहूर्त अशूभ होता.खरेतर असे म्हणणारे स्वत:च अशुभ आहेत आणि अशुभाला सगळेच अशुभ! जय श्रीराम!
 
राम सचके हैं।


‘राम सबके हैं।’ असे राजकुमारी प्रियांका गांधी म्हणाल्या. त्यांनी म्हणे प्रभू रामचंद्रांचे नामस्मरणही खूप वेळा केले. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी कमलनाथांनीही कट्टर हिंदूंचा आवेश आणला, तर दुसरीकडे दिग्विजय सिंग यांना रामजन्मभूमीचा शिलान्यास मुहूर्ताची चिंता लागून राहिली होती. थोडक्यात अभूतपूर्व वातावरण झाले आहे. प्रभू श्रीरामाचे नाव सगळ्यांनाच घ्यावे लागत आहे. कारण, चार-पाच वर्षांपूर्वी देशात असेही काही महाभाग होते की जे मेले तर त्यांची अंतिम यात्रा ‘रामनाम सत्य’ म्हणतच अंतिमधामावर जाणार. हे माहिती असूनही या लोकांनी मात्र कायमच प्रभू श्रीरामाबद्दल निंदा करण्यात हयात घालवली. आज दैवगती अर्थात रामगती अशी आहे की, या सगळ्यांना बळे बळे का होईना ‘राम राम’ म्हणावे लागत आहे. कारण, हिंदूंच्या विश्वासाची ताकद काय असते, हे या निधर्मीपणाचे बेगडी ढोल वाजवणार्‍या लोकांना माहिती झाले आहे. सदानकदा सत्तेसाठी दांभिक निधर्मीपणाचा मुखवटा घालणार्‍या लोकांनी आणि काही राजकीय पक्षांनी, हिंदू धर्म, श्रद्धा, मान्यता याबद्दल गरळ ओकण्यास कसलीच कसर ठेवली नव्हती. याचे सर्वोच्च उदारहण म्हणजे काँग्रेस पक्षाचे राजकुमार म्हणता येतील. त्यांना तर लोक मंदिरात मुली छेडायला जातात, असे वाटायचे. आज सगळ्यांच्या तोंडावर बारा वाजलेत. ‘असेही’ कधी होईल, असे यांना स्वप्नात वाटले नव्हते. कारण, पराजित पराजित, शक्तिहीन म्हणून हिंदू आणि त्यांच्या मान्यतेची संभावना करण्यात यांना आनंद होता. आज तीच ताकद राम मंदिराच्या रूपाने निर्माण झाली आहे. आता या सगळ्यांना एकच चिंता आहे, काय करावे? इकडे आड तिकडे विहीर. मंदिराबद्दल काही म्हणावे तर ज्यांच्या दबावाखाली आजवर राजकारण केले, सत्ता हस्तगत केली ते सोडून जातील. बरं, मंदिराविरोधात काही बोलले तर देशात जागृत झालेली बहुसंख्य धर्मशक्तीला आपण काय तोंड दाखवणार, हा मोठा प्रश्न. एकंदर रामललांमुळे सगळेच कामाला लागले. सज्जनशक्ती सत्कृत्यासह कार्यरत झाली, तर दुसरीकडे ज्यांनी प्रभू श्रीरामाच्या नावावर प्रश्नचिन्ह उमटवले त्यांना आता आपलेच अस्तित्व वाचवण्यासाठी प्रभू श्री रामचंद्राचे नाव घ्यावे लागत आहे. यातच सगळे आले. ‘राम सबके हैं’ म्हणणार्‍यांनी लक्षात घ्यावे ‘राम सबके हैं, पर राम सचके ज्यादा हैं।’

 
@@AUTHORINFO_V1@@