राष्ट्रध्वज, आपला स्वाभिमान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020
Total Views |

indian flag_1  
 
मुंबई : लवकरच आपला स्वातंत्र्य दिन येत आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी आपण सर्वच आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी यांचे आपण स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या राष्ट्रध्वजाचादेखील सन्मान करतो. अनेक जण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या वाहनाला राष्ट्रध्वज लावतात व आदराने मिरवतात, पण स्वातंत्र्य दिनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच १६ ऑगस्टला रस्त्यामध्ये व इतरत्र, हे ध्वज पडलेले दिसतात. नकळतपणे लोकांचे पायही पडतात व अशाप्रकारे आपल्या राष्ट्रध्वजाचा आपल्याकडून अवमान होतो, अपमान होतो.
 
 
 
राष्ट्रध्वजाचा असा अपमान होऊ नये म्हणून मयुरेश्वर प्रतिष्ठान, हर्ष काळे आणि सहकार्‍यांनी पुढाकार घेतला आहे. ”आपल्याच राष्ट्रध्वजाचा आपल्याकडून अपमान होऊ नये, म्हणून गेली अनेक वर्षे मी एक मोहीम राबवित आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दुसर्‍या दिवशी रस्त्यावर वा इतर पडलेले ध्वज उचलून व ते स्वच्छ पुसून ते जतन करुन ठेवतो. गेल्या अनेक वर्षांचे जपून ठेवलेले हे ध्वज माझ्या संग्रही आहेत.
 
 
तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की, आपण लावत असलेले राष्ट्रध्वज आपण व्यवस्थित जतन करून ठेवावेत व इतरांनाही तसे करण्यास प्रवृत्त करावे. त्याचबरोबर कुठेही पडलेला ध्वज आढळला, तर तो सन्मानाने, आदराने उचलून तो योग्य ठिकाणी ठेवावा. माझ्या या छोट्या हातांनी सुरु केलेल्या राष्ट्रध्वज संरक्षणाच्या अभियानात आपण सहभागी व्हावे,” अशी विनंती हर्ष राजेश काळे यांनी केली आहे. सदर अभियानाबद्दलचे आपले अभिप्राय अवश्य कळवण्यासाठी निलेश यादव : 9920464173, अमित बनगे : 9619149250 यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन हर्ष राजेश काळे यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@