हा देखावा कशासाठी ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2020   
Total Views |


vedh _1  H x W:


मागील वर्षी पावसाळ्याच्या हंगामात शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड केली. आज एक वर्ष होत आले आहे. मात्र, येथे लावण्यात आलेल्या वृक्षांची वाढ झालेली दिसून येत नाही, तर या झाडांच्या रक्षणार्थ लावण्यात आलेल्या जाळ्यांच्या आत गवत आणि काटेरी झुडपे वाढलेली दिसून येत आहे.



आजच्या आधुनिक युगात वृक्षसंवर्धन आणि लागवड ही काळाची गरज झाली आहे
. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था, शासकीय आस्थापने, नागरिक, बिगर शासकीय संस्था या वृक्षलागवड करताना दिसून येतात. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद असलेले पोलीस दलदेखील वृक्ष लागवडीत सरसावल्याचे वृक्ष लागवडीच्या हंगामात दिसून येत असते. पर्यावरणरूपी चांगल्या घटकाचे रक्षण करणे आणि प्रदूषणरूपी खलनायकास दूर करणे, हे कार्य आपल्या ब्रीदनुसार पोलीस खाते करत असल्याचे पाहून समजात अनेक नागरिक समाधान आणि आनंद व्यक्त करताना दिसतात. हे सर्व चित्र आहे ते नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या उपक्रमाचे. मागील वर्षी पावसाळ्याच्या हंगामात शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड केली.




आज एक वर्ष होत आले आहे
. मात्र, येथे लावण्यात आलेल्या वृक्षांची वाढ झालेली दिसून येत नाही, तर या झाडांच्या रक्षणार्थ लावण्यात आलेल्या जाळ्यांच्या आत गवत आणि काटेरी झुडपे वाढलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे, येथे लावण्यात आलेल्या रोपट्यांचे पालकत्व आडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचारी वर्गाने स्वीकारले आहे. त्या कर्मचार्‍यांच्या नावाच्या नोंदीदेखील संरक्षक जाळ्यांवर लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे असे असतानादेखील पालक असूनही ही रोपटी अनाथ झाल्याचे येथून मार्गक्रमण करताना सहज दिसून येते. पोलीस दलाने पर्यावरणाप्रती सहृदयता जोपासत वृक्षारोपण करणे, हे निश्चितच स्वागतार्ह आणि प्रेरणादायी आहे. मात्र, वृक्षारोपण केल्यावर कोवळ्या रोपट्यांना असे निर्जनवासात सोडून देणे, त्यांची देखभाल न करणे, त्यांना पाणी न घालणे हे किती संयुक्तिक? आडगाव पोलीस ठाण्याची हद्ददेखील बर्‍यापैकी मोठी आहे. त्यामुळे येथे येणार्‍या नागरिकांची संख्यादेखील जास्त असते. तसेच पोलीस ठाणे भरवस्तीत असल्याने नागरी वस्तीदेखील आहे. रात्रीच्या सुमारास शतपावली करणारे बव्हंशी नागरिक येथूनच जातात. त्यांच्यासमोर हा आदर्श आपण ठेवत आहोत की पोलिसांनी वृक्षलागवडीचा देखावा तरी कशासाठी केला, हाच प्रश्न उपस्थित होतो.



आम्ही सुधारणार नाहीच
!



नाशिक शहर हे स्वच्छ आणि सुंदर असावे
, शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी नाशिक महानगरपालिका, शासन सेवाभावी संस्था या विविधप्रकारे कार्यरत आहेत. शहराचे सुशोभिकरण व्हावे यासाठी वाहतूक बेटे, उड्डाणपुलाखालील परिसर येथे आकर्षक चित्रे रंगवून शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यात आली आहे. मात्र, शहरातील काही नतद्रष्ट नागरिकांनी ‘तुम्ही काहीही करा, आम्ही कदापि सुधारणार नाही,’ असाच पवित्र घेतल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरात आगमन होत असताना मुंबई नाका चौक हा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे येथून शहरात प्रवेशकर्ते पर्यटकांना शहराचे सौंदर्य समजावे, यासाठी येथील उड्डाणपुलाच्या खांबांवर आकर्षक चित्रे चितारण्यात आली होती. त्यावर अज्ञातांनी ‘खलिफा’, ‘बीएमएफ’ अशा प्रकारची अक्षरे मोठ्या स्वरूपात काळ्या शाईने रंगवली आहेत. त्यामुळे या पुलाचे विद्रूपीकरण झाले आहे.



हे कृत्य करणार्‍यांनी संबंधित कलाकाराचे मोल
, त्याचे कष्ट, त्याची कला यांचा विचार तरी करणे आवश्यक होते. केवळ आपल्यातील विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचा असा वापर करणे हे कितपत संयुक्तिक आहे, हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. नागरी जबाबदारी आणि सामाजिक भान यांसह जीवन व्यतीत करणे, हे आज लयाला जात आहे काय, हाच प्रश्न यानिमित्ताने सतावत आहे. सार्वजनिक उपक्रमातून साकारण्यात येणारे बांधकाम हे आपल्याच कररूपी पैशातून साकारले जाते. त्यामुळे त्याचे संवर्धन करणे, हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव तरी कृत्य करणार्‍या या नतद्रष्ट नागरिकांनी ठेवणे आवश्यक आहे. मुंबई नाका हा सातत्याने रहदारी असणारा परिसर आहे. त्यामुळे येथे असे कृत्य होत असताना इतर कोणी त्यांना हटकले का नाही, याचेदेखील नवल वाटत आहे. तसेच या चौकात पोलीस ठाणेदेखील आहे. त्यामुळे तेथील कर्मचारीवर्गालादेखील ही बाब लक्षात आली नाही का, हा प्रश्नच आहे. कृत्य करणार्‍या नागरिकांनी आपली मनोवृत्ती सुधारण्याबरोबरच, इतर नागरिकांनीदेखील सजगता दाखविण्याची गरज यामुळे प्रतिपादित होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@