मदतीला धावून आले भगत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |
Bhagat _3  H x
 
 
कोरोनाकाळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक अनिल पांडुरंग भगत यांनी आपले योगदान दिले. ‘लॉकडाऊन’मुळे नोकरी-धंद्यावर परिणाम झाल्याने अनेक गरीब कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली होती. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

नाव : अनिल पांडुरंग भगत
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
पद : स्वीकृत नगरसेवक, पनवेल मनपा
संपर्क्र : ९७६९७०९८९८ 
 
पनवेल महापालिका ऑक्टोबर, 2016 मध्ये स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. त्यावेळी पूर्वीच्या पनवेल नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कामाचा अनुभव असलेल्या अनिल पांडुरंग भगत यांची महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. कोरोना सुरू झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस नगरसेवक अनिल भगत महापालिका क्षेत्रात फिरून लोकांना काळजी घेण्याबाबत माहिती देत होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लोकांची होणारी उपासमार पाहून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता आपण घरात न बसता बाहेर पडून मदत करायला पाहिजे, असे सांगितले. त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत देण्यास सुरुवात केली. त्यांना अन्नधान्याच्या किटचे वाटप सुरू केले.
 
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्कचे, सॅनिटायझरचे वाटप, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून ‘आर्सेनिक अल्बम-30’ गोळ्यांचे वाटप केले. नगरसेवक अनिल भगत यांच्या पत्नी पूर्वी नगरपालिकेत नगरसेविका होत्या. त्यामुळे त्यांना सामाजिक कार्याची माहिती असल्याने आपल्या पतीच्या कोरोनाकाळातील मदतकार्यात त्यांनी पुढाकार घेतला. या काळात त्यांच्यासह घरातील सगळ्यांना कोरोना झाला असतानाही त्यांनी कधी आपल्या पतीला बाहेर जाण्यास अथवा मदत करण्यास अडविले नाही. त्यामुळेच अनिल भगत हे लोकांना मदत करण्याचे कार्य करू शकले. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा सरचिटणीस अंबरीश मोकल, सुशांत मोहिते, रजनीश जाधव या युवा कार्यकर्त्यांचे त्यांना चांगले सहकार्य मिळाले.
 
 

Bhagat _1  H x  
 
 
“कोरोनामुळे आपल्याला ज्या चांगल्या सवयी लागल्या आहेत, त्या सवयींमुळे अनेक छोटे-मोठे रोग आता झाल्याचे ऐकायला मिळत नाहीत. त्यामुळे सतत हात धुणे, बाहेरून आल्यावर हात-पाय धुणे, मास्क वापरणे आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे यांचे पालन करणे गरजेचे आहे.”
 
 
पनवेल महापालिका क्षेत्रात सगळीकडे नगरसेवक अनिल भगत हे काम करीत होतेच; पण रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून ओळखीच्या लोकांचे फोन येत असत. कोणाच्या नातेवाईकाला मदत हवी असे, कोणाला रुग्णालयात बेड हवा असे, कोणाचे खासगी रुग्णालयाचे बिल कमी करून हवे असायचे, तर कोणाला रुग्णवाहिकेची गरज असायची. सगळ्यांची कामे करून देण्यात अनिल भगत तत्पर असायचे. रुग्णवाहिका न मिळाल्यास स्वत:च्या गाडीतून रुग्णाला दवाखान्यात घेऊन येत. अनेक रुग्णांचे बिल कमी करून दिल्यावर घरी गेल्यावर त्यांच्या नातेवाईकांचे फोन येत. “तुम्ही होता म्हणून आमचे बिल कमी झाले, तुमचे आमच्यावर उपकार आहेत, तुमचे आभार कसे मानावे समजत नाही.” त्यावेळी आपण केलेले काम कसे योग्य आहे, याचे त्यांना समाधान वाटायचे.

Bhagat _2  H x  
 
अनिल भगत स्वत: ज्या बिल्डरबरोबर काम करतात, तेथे अनेक परप्रांतीय मजूर काम करतात. त्यांना गावाहून फोन येत, “आमचे हाल होत आहेत, खायला नाही, कोरोनाचा धोका वाढत आहे.” त्यावेळी अनेक मजूर रडत असत, त्यांना धीर देण्याचे कामही करावे लागत होते. पनवेल परिसरात बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना काम बंद असल्याने रोजगार नव्हता. त्यांच्याजवळ रेशन कार्ड नसल्याने त्यांना धान्य मिळण्यास अडचण होती. त्यावेळी त्यांना धान्याचे वाटप केले. त्यांची गावाला जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था झाल्यावर त्यांची तहसीलदारांकडे नोंद करून त्यांची ट्रेन कधी सुटणार आहे, याची माहिती घेऊन त्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात पुढाकार घेत असत.
अनिल भगत यांच्या चालकाच्या भावाचा मृत्यू मुंबईला झाला. त्याला आपल्या भावाचा मृतदेह उत्तर प्रदेशात न्यायचा होता. कोरोनामध्ये ते शक्य नव्हते. पण, त्यांचे नातेवाईक इकडे कोणीच नसल्याने घरून मृतदेह गावाला आणण्यासाठी त्याच्यावर दबाव येत होता. अखेर अनिल भगत यांनी मुंबईतील नगरसेवक असलेल्या मित्राला विनंती केली. त्याने तेथील पोलिसांकडून परवानगी मिळविली. पण, चार राज्यांच्या सीमा ओलांडून जायचे होते. तेथील एका खासदाराचे पत्र घेतले. चालकाला रस्त्यात खर्चासाठी पैसे दिले. प्रवासात जेवण स्वत: शिजवून खाण्यासाठी धान्याचे किट दिले. तो गावाला कोणतीही अडचण न येता सुखरूप पोहोचला. त्यामुळे घरच्यांना शेवटचे दर्शन घेता आले. त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी फोन करून व्यक्त केलेल्या भावना ऐकून त्यांना आपल्या कामाचे समाधान मिळाले.
- नितीन देशमुख
@@AUTHORINFO_V1@@