सुषमा स्वराज : उत्कृष्ट वक्ता आणि नेता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019
Total Views |


 

सुषमा स्वराज फक्त संसदपटू नसून एक प्रभावी वक्तासुद्धा होत्या. केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरसुद्धा त्यांच्या भाषणाने लोक प्रभावित होत असत. त्यात भारतीय संस्कृतीविषयी त्यांना असलेला अभिमान त्यांच्या वाणीतून कायमच झळकत असे. संस्कृती आणि भाषा हे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे भाषेचा गौरव होण्याबरोबरच संस्कृतीचा गौरव होणेदेखील तितकेच महत्वाचे आहे, भाषेचे बीज जिथे रोवले जाईल, तिथे संस्कृतीचादेखील प्रसार होण्यास मदत होईल, हे त्यांचे मत त्यांनी आपल्या आचारविचारांमधून लोकांना पटवून दिले.

 

सुषमा स्वराज यांच्या भाषेवरील प्रभुत्वामुळे कोणताही विषय प्रभावीपणे मांडण्यात त्यांची हातोटी होती. त्यांच्या करारी व्यक्तिमत्वाला भाषेची जोड मिळाल्यामुळे त्यांचा शब्द न शब्द तलवारीच्या धारेप्रमाणे वाटत असे. त्यांना हिंदीविषयी जिव्हाळा होताच परंतु त्याचबरोबर संस्कृतमध्ये पदवी घेतल्याने संस्कृतमध्येदेखील त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले होते. संस्कृत भाषेवरील त्यांच्या प्रभुत्वाचे दर्शन त्यांनी केलेल्या एका भाषणामधून प्रेक्षकांना दिसून आले. त्यांच्या वक्तृत्वाच्या कौशल्यामुळे त्या चांगल्या वक्ता आणि चांगल्या नेता म्हणून लोकप्रिय झाल्या.

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज आपल्यात नाहीत. मात्र, त्यांचे विचार पुढील हजारो वर्ष भारतवासीयांना प्रेरणा देत राहतील, यात शंका नाही. त्यांच्या जाण्याने भारताच्या राजकारणात कधीही भरून निघणार नाही, अशी पोकळी निर्माण झाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@