नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. भारतीय क्रिकेट प्रेमींच्या "मौका-मौका" जाहिरातीने पाकिस्तानची सोशल मीडियावर नाचक्की केली आहे. त्याला उत्तर देताना पाकिस्तानने भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या 'त्या' व्हिडीओचा गैरवापर करुन नवीन जाहिरात तयार केली आहे. अभिनंदन यांच्या शौर्याचा पाकिस्तानने अपमान केल्याचा आरोप करत भारतीयांकडून पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.
अभिनंदन यांना पाकिस्तानच्या सैन्याने जेव्हा अटक केली होती. त्यावेळी विचारण्यात आलेल्य़ा प्रश्नांवर मी तुम्हाला उत्तर देण्यास बांधिल नाही, असे अभिनंदन यांनी म्हणत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला होता. याचा व्हिडीओ देखील पाकिस्तानकडून शेअर करण्यात आला होता. मात्र, विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी अभिनंदन यांच्याप्रमाणे एका व्यक्तीकडून अभिनय करून घेत नवा व्हिडीओ तयार करण्यात आलाय. Pakistan’s Jazz TV ने हा व्हिडीओ प्रसारित केला आहे.
Jazz TV advt on #CWC19 takes the Indo-Pak air duel to new level. It uses the air duel over Nowshera and Wing Co Abhinandan Varthaman's issue as a prop. @IAF_MCC @thetribunechd @SpokespersonMoD @DefenceMinIndia pic.twitter.com/30v4H6MOpU
— Ajay Banerjee (@ajaynewsman) June 11, 2019
अभिनंदन यांना पाकिस्तानमध्ये नेण्यात आल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. पण "I’m sorry, I am not supposed to tell you this", असे ठामपणे सांगत अभिनंदन यांनी काहीही माहीती दिली नव्हती. अभिनंदन यांच्या या शौर्याने भारतीयांची मने जिंकली. मात्र, भारतासमोर एकदाही न जिंकलेल्या पाकिस्तानने अत्यंत खालची पातळी गाठली आहे. देशभरातून यावर टीका केली जात आहे.
'फादर्स डे'च्या दिवशी आहे भारत पाक सामना
भारत-पाक सामन्याच्या निमित्ताने २०१५च्या विश्वचषकात स्टार स्पोर्ट्सने एक प्रोमो रिलीज केला होता. ही "मौका-मौका" जाहिरात प्रचंड गाजली होती. यावर्षी हीच जाहिरात नव्या रुपात आली आहे. भारत-पाक सामना ज्या दिवशी आहे, त्याच दिवशी फादर्स डे आहे. त्यामुळे या जाहिरातीतून पाकिस्तानची फिरकी घेतली आहे. पाकिस्तानला विश्वचषकात भारतासोबत एकदाही विजय मिळवता आलेला नाही आणि सोशल मीडियावरही भारतीय नेटीझन्सने पाकिस्तानला सळो कि पळो करून सोडले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat