पराभूत महापौर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2019
Total Views |







वांद्रे पूर्व म्हणजे
‘मातोश्री’चे अंगण आणि शिवसेनेसाठी एक महत्त्वाचा मतदारसंघ. येथे शिवसेनेशिवाय कोणालाही विजय मिळणे कठीण होते. पण, मुळातच महाडेश्वर यांना उमेदवारी अखेरच्या क्षणी दिली गेली. त्यामुळे ‘नाईलाजाने दिलेली उमेदवारी’ असा त्याचा अन्वयार्थ घेण्यात आला.



निवडणुकीच्या निकालानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांचा मुंबईच्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून झालेला पराभव सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे
. याला प्रामुख्याने तीन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, महापौर असताना त्यांचे कथित गैरवर्तन. दुसरे कारण म्हणजे ज्या शिवसेना पक्षातून ते निवडणुकीला उभे राहिले, त्या पक्षाच्या प्रमुखांचे निवासस्थान अर्थातच ‘मातोश्री’ वांद्य्रातच आहे आणि तिसरे कारण म्हणजे त्यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातल्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी केलेली बंडखोरी. महापौर म्हणून विश्वनाथ महाडेश्वर यांचा मुंबई महापालिकेत म्हणावा तसा दबदबा दिसला नाही. पण, त्यांची बदनामी होईल असे प्रकार मात्र घडले. पर्जन्यजलवाहिन्या स्वच्छतेत समाधानकारक काम झाले नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमक्ष त्या खात्याच्या उपमुख्य अभियंत्यावर हात उचलला. त्यावेळी कार्यकर्त्यांना न रोखता त्यांनी उलट प्रोत्साहन दिले. मुंबईची तुंबई झाली म्हणून त्यांना जाब विचारणार्‍या महिलेचा त्यांनी चक्क हात पिरगळला. यावेळी आपण मुंबईचे महापौर आणि एक शिक्षक आहोत, याचा त्यांना विसर पडला.



दुसरे कारण म्हणजे वांद्रे पूर्व म्हणजे
‘मातोश्री’चे अंगण आणि शिवसेनेसाठी एक महत्त्वाचा मतदारसंघ. येथे शिवसेनेशिवाय कोणालाही विजय मिळणे कठीण होते. पण, मुळातच महाडेश्वर यांना उमेदवारी अखेरच्या क्षणी दिली गेली. त्यामुळे ‘नाईलाजाने दिलेली उमेदवारी’ असा त्याचा अन्वयार्थ घेण्यात आला. तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे तृप्ती सावंत या तेथील विद्यमान आमदार होत्या. त्यांचे पती बाळा (प्रकाश) सावंत यांनी हा मतदारसंघ बांधून ठेवला होता. सर्वसामान्यांच्या हाकेला कधीही प्रतिसाद देणे, हा त्यांचा मोठा गुण होता. त्यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेने त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली आणि नारायण राणे या दिग्गजाचा पराभव करून त्या निवडून आल्या. आता उमेदवारी नाकारताना त्यांना विश्वासात घेणे महत्त्वाचे होते. पण, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना झुलवत ठेवले आणि अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारण्यात आली. त्याचा राग मनात ठेवून त्यांनी बंडखोरी केली आणि त्यांची किंमत महाडेश्वर यांना मोजावी लागली. त्यांच्या माथी ‘पराभूत महापौर’ म्हणून शिक्का बसला.



‘नोटा’ने केला तोटा



विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांतील उमेदवारांमध्ये चुरशीची लढत असताना काही मतदारसंघांमध्ये मात्र नोटा मतांनी उमेदवाराची विजयाची संधी घालवली आहे
. राज्याचा विचार केला तर लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख हे विजयी ठरले असले तरी त्यांच्यानंतर सर्वाधिक मते ‘नोटा’ने घेतली आहेत. या मतदारसंघात तब्बल २६ हजार, ८९९ लोकांनी ‘नोटा’ बटण दाबले आहे. मुंबईतही तोच प्रकार अनुभवायला मिळाला आहे. मुंबई उपनगरात जोगेश्वरी मतदारसंघात १२ हजार, ०३१ जणांनी नोटाला पसंती दिली आहे, तर बोरिवली मतदारसंघात १०,०९५ जणांनी ‘नोटा’ बटण दाबले आहे. जोगेश्वरीत रवींद्र वायकर (विजयी) यांना ९० हजार, ६९२, तर दुसर्‍या क्रमांकाची ३१ हजार, ८६७ मते सुनील कुमारे यांना मिळाली आहेत आणि तिसरा क्रमांक ‘नोटा’ने (१२०३१) घेतला आहे.



बोरिवलीतही तोच प्रकार आहे. विजयी ठरलेले सुनील राणे यांना १ लाख, २३ हजार, ७१२ मते मिळाली आहेत, दुसर्‍या क्रमांकाची मते (२८,६९१) कुमार खिलारे यांना मिळाली आहेत, तर तिसर्‍या क्रमांकाची १० हजार, ०९५ मते ‘नोटा’ने घेतली आहेत. त्यामुळे इतर उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ने वरचा क्रमांक पटकावला आहे. याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चांदिवली मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार नसीम खान यांना ८५ हजार, ४७० मते मिळाली, नवनिर्वाचित शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना ८५ हजार, ८७९ मते मिळाली. दिलीप लांडे ४०९ मतांनी विजयी झाले. येथे गमतीची गोष्ट म्हणजे, ३३६० मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. यातील मते दोघांना विभागली गेली असती तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. मुंबादेवी मतदारसंघात मात्र सर्वात कमी १५३९ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. ‘नोटा’ म्हणजे नकारात्मक मतदान. असलेल्यांपैकी कोणीही उमेदवार पसंत नसेल तर नोटाचे बटण दाबायचे. मात्र, १०-१२ उमेदवारांमध्ये नोटा तिसर्‍या क्रमांकावर येत असेल तर उमेदवारांनी विचार करण्याची गरज आहे. नाहीतर एक दिवस असा येईल की, त्या दिवशी नोटा पहिल्या क्रमांकावर असेल.


- अरविंद सुर्वे 
@@AUTHORINFO_V1@@