आंतरराष्ट्रीय नाणे निधीची भारताला मोठी शाबासकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2019
Total Views |



वॉशिंग्टन
: कंपनी करकपातीबाबत भारताने घेतलेल्या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय नाणे निधीने शनिवारी स्वागत केले. भारताच्या निर्णयाचा थेट परकीय गुंतवणुकीवर (एफडीआय) नक्कीच सकारात्मक परिणाम जाणवेल, असा विश्वास शनिवारी आंतरराष्ट्रीय नाणे निधीने नोंदववला.


अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी कंपनी करात कपात केल्याचा फायदा होणार नाही
, असे मत अलीकडेच व्यक्त केले होते. मात्र, नाणे निधीने या निर्णयाचे समर्थन केले. भारत सरकारने कंपनी करात कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे देशातील गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होईल आणि गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, असे म्हटले. नाणे निधीचे संचालक चांगयोंग र्ही यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

@@AUTHORINFO_V1@@