ब्रिटनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, मानवतेवर अत्याचार होत आहेत, म्हणत पुन्हा एकदा पॅलेस्टाईन समर्थक रस्त्यावर उतरले. कारण, युनायटेड किंगडममध्ये ‘दहशतवादी प्रतिबंध कायद्या’नुसार ‘पॅलेस्टाईन अॅक्शन’ या पॅलस्टाईन समूहावर कायदेशीर बंदी घालण्यात आली. पॅलेस्टाईन समर्थनाच्या आड हे संघटन देशाचे नुकसान करते, दहशतवादी कृत्य करते, असे ब्रिटनचे म्हणणे. ब्रिटनला खूप उशिरा जाग आली असेच म्हणावे लागेल. कारण, इस्लाम आणि त्याद्वारे वाळवंटातल्या प्राचीनकालीन रीतीपद्धतींनी आता ब्रिटनमध्ये चांगलेच बस्तान बसवले आहे.
Read More
मानवी स्थलांतर ही खरं तर मानवी उत्क्रांतीपासूनचीच निरंतर सुरु असलेली प्रक्रिया. अशा स्थलांतरातून नवीन प्रदेशात प्रत्येक धार्मिक समुदायाची तेथील स्थानिक समाजांशी जुळवून घेण्याची प्रक्रियाही वेगवेगळी असते. काही गट नव्या देशांत गेल्यावरही आपली वेगळी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकसंख्येच्या बळावर स्थानिक संस्कृतीत मोठे बदल घडवण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. मात्र, हिंदू समाजाचा दृष्टिकोन प्रारंभीपासूनच यापेक्षा पूर्णतः वेगळा राहिला आहे. हिंदू जिथे जातो, तेथील स्थानिक संस्कृतीशी तो समरस होतो, त्या
अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दि. 20 जानेवारी रोजी शपथबद्ध होऊन ‘व्हाईट हाऊस’चा उंबरठा ओलांडतील. पण, तत्पूर्वीच अमेरिकेच्या शत्रूराष्ट्रांसह मित्रराष्ट्रांनाही ट्रम्प आणि त्यांचे साथीदार मस्क यांनी घाम फोडला आहे. ब्रिटनही त्यापैकीच एक. तेव्हा, ट्रम्प यांच्या सत्तारोहणापूर्वी ब्रिटनला ग्रहण का लागले, त्याचा उहापोह करणारा हा लेख...
रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाला हजार दिवस पूर्ण झाले आहेत, अशातच आता रशियाने युक्रेन वर आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा मारा केला आहे. आण्विक शस्त्रांच्या वापराबद्द्लचे धोरण रशियाने बदल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला करण्यात आला आहे. युक्रेन आणि पाश्चात्य जगातीला त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी हा एक इशारा आहे असे म्हटले जात आहे.
जुलै महिन्यात ब्रिटनमध्ये पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या नेतृत्वातील लेबर पार्टी पक्षाचे नवे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून ब्रिटनच्या रस्त्यावर हिंसाचाराच्या विविध घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. सातत्याने हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान केयर स्टारर यांच्याशी चर्चा केली आणि ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल आणि निवडणुकीत मजूर पक्षाचा मोठा विजय झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.
संपूर्ण युरोपाचा एक आवाज असणारी जागतिक संघटना म्हणजे युरोपीय महासंघ होय. पण याच युरोपातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलत आहे. अनेक राष्ट्रवादी विचारधारा असणार्या लहान लहान पक्षांचे बळ युरोपात वाढत आहे. आशातच महासंघाच्या निवडणूका जवळ आल्याने, एकूणच तिकडच्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा..
ब्रिटनच्या उत्तरेकडील ‘नॉर्थ सी’ या सागरी भागात जॉन पॉल जोन्स फिरत होता. ‘बॉनहोम रिचर्ड’ या जहाजावर तो होता आणि त्याच्या टेहळ्यांनी त्याला खबर दिल्ली की, स्कँडिनेव्हियन सागराकडून नौदल सामग्रीने भरलेल्या काही बोटी ब्रिटनकडे जात आहेत नि त्यांच्या संरक्षणासाठी फक्त दोन युद्धनौका आहेत. हे म्हणजे घबाडच होतं. जॉन पॉल ताबडतोब ब्रिटिश काफिल्याच्या मागावर निघाला.
दान हे सत्पात्री असावे लागते, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील युद्धामुळे विस्थापित झालेल्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्या देशात आश्रय दिलेल्या अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स वगैरे युरोपीय देशांना या तत्त्वज्ञानाचे सत्य आता उमगू लागले आहे. ब्रिटनमध्ये आश्रयास आलेल्या या स्थलांतरित मुस्लिमांकडून या देशातील स्वातंत्र्याचा उपयोग आपली धार्मिक-सांस्कृतिक मूल्ये लादण्यासाठी केला जातो. पण, अतिउदारतेने पछाडलेल्या पाश्चिमात्य देशांना भावी धोक्याची घंटा ऐकू जाते का, हाच खरा प्रश्न.
शरणार्थी म्हणून याचिका करणार्यांना रवांडाला पाठवून तिथे न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्याचा खर्च ती प्रक्रिया ब्रिटनमध्ये पार पाडण्यापेक्षा जास्त आहे. ब्रिटनमधील संसदेच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहांत दुरुस्ती सुचवून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पाठवून झाल्यावर अखेर हे विधेयक संमत करण्यात सरकारला यश मिळाले.
युरोप, अमेरिकेसह जगभरातील देशांना बेकायदेशीर घुसखोरांच्या समस्येने ग्रासले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुणाकडेही ठोस योजना नाही. ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचे ठरवले, तर, युरोपियन युनियनने तुर्कियेला घुसखोर रोखण्यासाठी पैसे दिले. पण, याने काहीही साध्य झाले नाही. आता ब्रिटनने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रवांडा योजना आणली आहे. याच योजनेविषयीचे आकलन...
ब्रिटनमधील एका शाळेतील मुस्लिम विद्यार्थिनीने शाळेच्या आवारात नमाज पठण करण्यावर बंदीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण त्या याचिकाकर्त्या मुलीली न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने विद्यार्थिनीची याचिका फेटाळून लावत तिला शाळेत शिकायचे असेल तर शाळेचे नियम पाळावे लागतील, असे स्पष्टपणे सांगितले.
भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी पोसलेल्या आपल्या भाडोत्री दहशतवाद्यांचा गूढ मृत्यू आपल्याच देशात होत असल्याचे पाहून पाकिस्तानी सत्ताधार्यांची आणि लष्करी नेतृत्वाची गाळण उडाली होती. या हत्या थांबविण्यासाठी, त्यांनी थेट अमेरिकेला यामध्ये घातले खरे; पण खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून तोंड पोळल्यापासून, भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप न करण्याचा शहाणपणा अमेरिकेने दाखविला आहे. ‘नव्या भारता’ने अमेरिकेला दिलेला, हा आणखी एक दणकाच म्हणावा लागेल.
अयोध्येतील राम मंदिर कर्तव्य धर्म रामाचे मंदिर आहे. या कर्तव्य धर्माचे पालन करण्याचा कालखंड आता सुरू झाला आहे. मानवी जीवन हे अनेकांगी असतं. मनुष्य हा सृष्टीतील एकाकी प्राणी नाही. सर्व प्राणी वनस्पती, विश्वातील सर्व मानव त्यांचे उपासना पंथ ही सर्व सृष्टी निर्मात्याची विविध रुपे आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाप्रति आपले कर्तव्य आहे. रामचरित्र हे कर्तव्य धर्म शिकवणारे चरित्र आहे. त्याचे स्मरण आपल्याला नित्य ठेवावे लागेल.
देशातील बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन पळालेले उद्योगपती नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि संजय भंडारी यांना वापस आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योगपतींना भारतात आणण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांचे उच्चस्तरीय पथक ब्रिटनला जाणार आहे.
‘दि डिक्शनरी ऑफ मिलिटरी कोटेशन्स’ नावाचा हा कोश चांगला पावणेसहाशे पानांचा असून, प्राचीन काळातल्या ट्रॉयच्या युद्धापासून ते १९७३च्या अरब-इस्रायल युद्धापर्यंतचा भाग त्यात आहे. अलेक्झांडर, हनिबाल, फ्रेडरिक द ग्रेट, नेपोलियन, क्लाउझ्वित्झ, ड्युक ऑफ वेलिंग्टन, जनरल कँब्रा, जनरल पॅटन, जनरव मार्शल, विन्स्टन चर्चिल, गोल्डा मायर अशा अनेकानेक अव्वल सेनानींचे आणि युद्धनेत्यांचे उद्गार यात संग्रहित करण्यात आले आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनमध्ये दिवाळी साजरी केली आहे. डाउनिंग स्ट्रीट येथील शासकीय निवासस्थानी त्यांनी हिंदू समाजातील लोकांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इस्त्रायल आणि हमासमध्ये अद्याप युद्ध सुरुच आहे. इस्त्रायल आणि हमासच्या युद्धात अनेक देशांनी इस्त्रायलला आपला पाठिंबा दिला आहे. तर अनेक कट्टरपंथीयांनी हमासच्या दहशतवाद्यांना समर्थन दिले आहे. यानंतर आता ब्रिटननेही इस्त्रायलला आपले समर्थन दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखे लंडनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममध्ये असल्याचे सर्व भारतीयांना माहित आहे. ही वाघनखे करारी तत्त्वावर भारतात परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार १ ऑक्टोबरला ब्रिटेनला रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जर्मनी आणि ब्रिटन दौरा रद्द झाला. आणि राजकीय वर्तुळात त्या दौऱ्याची चर्चा सुरू झाली. मग गप्प बसतील ते विरोध कसले? या न्यायाने उबाठा गटाचे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करायला सुरूवात केली. इतकंच काय तर दावोस दौऱ्यावर झालेल्या खर्चावर ही आदित्य ठाकरेंनी टीका केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा जर्मनी आणि ब्रिटन दौरा का रद्द झाला? त्यांनी दावोसला जाऊन काय आणलं? आदित्य ठाकरेंनी परदेश दौरे केले त्या दौऱ्यांच फलित काय?
लंडनमधील ७० वर्षे जुने ऐतिहासिक 'इंडिया क्लब' दि. १७ सप्टेंबरपासून कायमचे बंद झाले. या इंडिया क्लबने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लंडननजीकच्या या क्लबमध्ये १९३० आणि १९४० च्या दशकात देशाला ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी नेते जमत असतं.
काही दिवसांपुर्वी 'जी-२०' परिषदेच्यानिमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. त्यावेळी सुनक म्हणाले, हाऊ इज 'यूटी...' मी म्हणालो.'व्हाय...' ('यूटी' म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे) त्यावर सुनक म्हणाले, 'ते' दरवर्षी लंडनला येतात आणि संपत्ती घेतात. थंड हवा खातात आणि भारतात परतात. तुम्ही ब्रिटनला या. तुम्हाला सगळं सांगतो, असं सुनक यांनी मला सांगितलं, हे वाक्य आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच. आणि पुढे ते म्हणाले की, त्यामुळे आमच्यावर टीका करण्याआधी विचार करावा, अन्यथा 'पाटणकर काढा' देण्या
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी (१५ ऑगस्ट, २०२३) केंब्रिज विद्यापीठात चालू असलेल्या मोरारी बापूंच्या राम कथेत भाग घेतला. यावेळी त्यांनी जय श्री रामचा नाराही दिला. ब्रिटीश विद्यापीठात 'मानस विद्यापीठ' नावाचा कार्यक्रम नियमितपणे चालवला जातो, ज्याच्या ९२१ व्या कार्यक्रमात मोरारी बापू पोहोचले आहेत. ऋषी सुनक यांनीही भाषण सुरू करण्यापूर्वी मोरारी बापूंच्या व्यासपीठाला नमन केले.
कॅनडात पुन्हा एकदा खलिस्तान्याकडून हिंदू मंदिराची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. कॅनडात खलिस्तानवाद्यांकडून वारंवार हिंसाचार होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा खलिस्तानींनी कॅनडातील लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केली. तसेच, या तोडफोडप्रकरणी आरोपी असलेला खलिस्तनावादी हरदीपसिंग निज्जरला शहीद म्हटले गेले. त्यामुळे कॅनडातील खलिस्तानवाद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कट्टरपंथी खलिस्तांनीना आळा घालण्यासाठी भारताच्या आवाहनावर ब्रिटनने मोठे पाऊल उचलले आहे. ब्रिटन सरकारने खलिस्तान समर्थक कट्टरवाद्यांशी सामना करण्यासाठी नवीन निधीची घोषणा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारत आणि ब्रिटन कट्टरतावादाशी लढण्यासाठी संयुक्त कार्य दलाच्या स्थापनेसाठी आधीच काम करत आहेत. भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांनी ही माहिती दिली.
ब्रिटिश सरकारने चीनच्या धोक्याला तोंड देण्यासाठी अनेक अधिक उपाय करणे चीनच्या सरकारवर अधिक दबाव आणणे आवश्यक आहे. ब्रिटिश सरकारने चीनमधील ब्रिटिश कंपन्यांना चीनच्या धोक्यापासून संरक्षण द्यावे. ब्रिटिश सरकारने चिनी तंत्रज्ञान चोरांवर कारवाई करुन त्यांना शिक्षा द्यावी. ब्रिटनने चीनच्या घुसखोरीचा सामना करण्यासाठी तत्काळ पावले उचलावी, अन्यथा, चीन ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करू शकतो.
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला. कारण, युक्रेन अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या ‘नाटो’ संघटनेत सहभागी होण्यासाठी आग्रही होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की त्यासाठी प्रयत्नरत होते. रशियाने वेळोवेळी इशारा देऊनही युक्रेन ’नाटो’मध्ये सहभागी होण्यावर अडून राहिला. याच कारणामुळे युक्रेनच्या पूर्व भागावर हल्ला करून रशियाने युद्ध छेडले. युक्रेन ‘नाटो’त सहभागी झाल्यास त्या जोरावर अमेरिका वरचढ ठरू शकते, ही चिंता रशियाला सतावत असल्याने युद्धारंभ झाला.
फ्रान्समध्ये सुरु असलेल्या दंगलींवरुन आगामी काळात युरोपीय देशांमध्ये कट्टरतावादी मुस्लिमांचा धुडगूस वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसंख्या कमी असताना शांत राहणे आणि लोकसंख्या वाढली की, आपल्या धर्माचा अजेंडा राबवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे, हे मुस्लिमांचे धोरण असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. भारतामध्येही अशा प्रकारांचा सामना करावा लागला आहे.
दि. २८ मे ते ३ जून, १९४५ या कालावधीत हजारो कोसॅक शरणार्थींना लिअंझ शहरातून गुराढोरांप्रमाणे ट्रक्समध्ये कोंबून सोव्हिएत सैन्याच्या स्वाधीन करण्यात आलं. अनेकांनी आत्महत्या केल्या. ज्यांनी केल्या नाहीत, त्यांना सोव्हिएत सेनापतींनी गोळ्या घालून किंवा फासावर लटकावून ठार मारलं, ही घटना ’लिअंझचा विश्वासघात’ या नावाने (कु) प्रसिद्ध आहे.
ब्रिटिश राजवंशाशी जगाची जवळीक आजही अंशत: का असेना, पण टिकून आहे, हे यावरून दिसून येते, तर काहींना या गुलामगिरीच्या उरलेल्या खुणा वाटतात. रिपब्लिकनांना तर सत्ताप्रमुख लोकातून निवडलेला हवा आहे. ‘नॉट माय किंग’ असे घोषवाक्य लिहिलेले फलक त्यांच्या हाती दिसत होते. काहींनी तर रस्त्यावरही लोळण घेतली होती.
ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांचा आलिशान राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या भव्यदिव्य सोहळ्याचा अंदाजे १०० दशलक्ष पाऊंडांचा खर्च आर्थिकदृष्ट्या गटांगळ्या खाणार्या ब्रिटनला करावा लागला. याविरोधात आणि ‘राजेशाही नकोच’ म्हणून ‘नॉट माय किंग’ अभियानही ब्रिटनमध्ये चर्चेचा विषय ठरले. त्यानिमित्ताने ब्रिटनचा माठ रिकामा असताना केलेला राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकाचा थाट, राजेशाहीचा इतिहास आणि ब्रिटनचे राजकारण यांचा आढावा घेणारा या लेखाचा पहिला भाग.
प्रशस्त, आलिशान प्रासादातून देशाचा कारभार हाकला जातो, ते त्या देशाचे सत्ताकेंद्र. जशी आपली राजधानी दिल्लीतील संसदेची इमारत, तशीच साहेबांच्या देशातील म्हणजेच ब्रिटनमधील ‘पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर’ ही लंडनस्थित संसदेची देखणी इमारत. ब्रिटन अर्थात युनायटेड किंग्डमचा राज्य कारभार याच ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यताप्राप्त भव्य इमारतीतून चालविला जातो. पण, अशा या सत्ताकेंद्रालाच सध्या तडे गेले असून, ठिकठिकाणी गळती लागली आहे. एवढेच नाही, तर साधारण १५० वर्षं जुनी अशी ही ऐतिहासिक इमारत धोकादायक अवस्थेत अ
पुतीन यांनी काढलेले उद्गार म्हणजे कांगावा आहे, चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असं पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे म्हणत असली, तरी ते पूर्ण सत्य नाही. ब्रिटन, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश हे स्वतःच्या देशांत मोठे लोकशाहीचे समर्थक वगैरे असले तरी इतरांशी वागताना त्यांची मनोभूमिका बदलते.
खलिस्तान समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांची पत्नी किरणदीप कौरला दि.२० एप्रिल रोजी अमृतसर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. किरणदीप कौरने यापूर्वी पोलिसांच्या चौकशीदरम्यान सांगितले होते की, ती अमृतपालच्या संपर्कात नाही.तसेच किरणदीप यूकेची नागरिक आहे त्यामुळे ती लंडनला जात होती. सध्या तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.
त्यावेळी मी किशोरवयीन होते. माझे प्रेम एका पाकिस्तानी मुस्लीम व्यक्तीसोबत होते. पण, त्याने प्रेमाच्या नावाने विविध शहरांमध्ये नेऊन माझ्यावर अनन्वित शारीरिक अत्याचार केले. त्याच्यापासून कसे वाचायचे? मी लहान होते. मग पोलिसांनीच माझ्या पालकांना सांगितले की, राहते शहर सोडून जा. आम्ही आमचे शहर सोडले. पण, ते प्रेमाच्या नावाने केलेला छळ आणि अत्याचार विसरायला खूप त्रास झाला.” ब्रिटनची इंग्रज नागरिक डॉ. एला हिल हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले. ब्रिटनच्या समाजअभ्यासकांच्या मते, २०१९ साली इंग्लंडमध्ये १९ हजार अल्पवयीन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेले विधान त्यांना महागात पडत आहे. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर त्यांची खासदारकी गेली. आता आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांना ब्रिटनच्या न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा दिला आहे.ललित मोदींनी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून हा इशारा दिला आहे. वास्तविक, ललित मोदींचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा राहुल गांधी यांना नुकतेच मोदी अपमान प्रकरणी दोषी ठरवून गुजरातच्या न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनाव
पंजाबी भाषेत ‘खालसा’ या शब्दाचा अर्थ ‘पवित्र’ असा होतो. म्हणून ‘खलिस्तान’ म्हणजे पवित्र भूमी! पंजाबात शिखांचा (शिष्यांचा) स्वतंत्र देश अस्तित्वात यावा, यासाठीची चळवळ तशी खूप जुनी नाही. पण, शिखांच्या या मागणीला १९७० आणि १९८० या दशकात दहशतवाद व हिंसाचाराचे स्वरूप प्राप्त झाले. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बिअंत सिंग, जनरल अरुण श्रीधर वैद्य अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या दहशतवादाला बळी पडल्या. १९८६ नंतर पंजाब पोलिसांनी या खलिस्तानी दहशतवाद्यांविरूद्ध मोठ्या प्रमाणाव
मित्रहो, दि. ८ मार्च हा दिवस वैश्विक स्तरावर ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. मागील काही वर्षांपासून अमेरिका, युरोप, ब्रिटन, जर्मनी, भारत या देशांमध्ये स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल करणे, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना ‘वर्किंग हवर्स’ कमी देणे, वेतनवाढ, नोकरीच्या ठिकाणी महिलांना संरक्षण आदी मागण्यांसाठी विविध महिला संघटनांकडून आंदोलने झाली, मोर्चे निघाले. यातूनच महिलांच्या सन्मानासाठी अन् हक्कांसाठी सर्वानुमते दि. ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरल
परकियांच्या सुंदर आकर्षक व्यक्तीमत्वाने हुरळून जाण्यापेक्षा भारतीयच सर्वाधिक आकर्षक असल्याचे शिक्कामोर्तब इंग्लडच्या ‘पोर मोई’ने केलेल्या विश्लेषणात करण्यात आले आहे. नुकतेच विश्लेषण केलेल्या ५० आकर्षक दिसणार्या देशांची यादी जाहीर करण्यात आली त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका दुसर्या, तर ब्रिटन तिसर्या क्रमांकावर आहे. ‘पोर मोई’च्या विश्लेषणानूसार जपान चौथ्या स्थानावर, तर कॅनडा पाचव्या स्थानावर आहे.
जिहादी दुल्हन शमीमा बेगम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे वडील मुळचे बांगलादेशचे, तर आई ब्रिटनची. तर शमीमाचा जन्म ब्रिटनचाच. 2019 साली ब्रिटनने शमीमाचे नागरिकत्व रद्द केले. इतकेच नाही, तर पुन्हा तिला ब्रिटनचे नागरिकत्व मिळू नये, अशीही तरतूद केली.
किंग चार्ल्स तिसरे शनिवारी, १० सप्टेंबर रोजी अधिकृतपणे ब्रिटनचे नवीन सम्राट बनले.
सप्टेंबर महिन्यातील दुसरा आठवडा ब्रिटनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. आठवड्याच्या प्रारंभी एकीकडे अटीतटीच्या लढाईनंतर भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा पराभव करत हुजूर पक्षाच्या लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्यामुळे मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांच्यानंतर ट्रस या ब्रिटनच्या तिसर्या महिला पंतप्रधान ठरल्या. त्यांचा शपथविधीही सोहळाही पार पाडला. एकीकडे लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली आणि दुसरीकडे ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या 96व्या वर्षी गुरुवार
गेल्या 12 वर्षांत उपसचिव ते सचिव ते मंत्री अशी वाटचाल करताना लिझ ट्रस यांनी पर्यावरण, व्यापार, महिला विकास ते परराष्ट्र व्यवहार अशी महत्त्वाचे विभाग सांभाळले आहेत. पण, आता ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणून ‘ब्रेक्झिट’ पश्चात ब्रिटनला नवीन दिशा देण्याचे सर्वात मोठे आव्हान लिझ ट्रस यांच्यासमोर असणार आहे.
२०२२ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आज दि. २८ जुलैपासून ८ ऑगस्ट या कालावधीत इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे रंगणार आहे. तब्बल ४,५०० खेळाडू विविध स्पर्धांमध्ये आपले कसब पणाला लावणार आहेत. यंदाची स्पर्धा अनेक अर्थाने नाविन्यपूर्ण आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच महिलांच्या टी-ट्वेन्टी स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने...
इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स या देशांत तब्बल ४० हजारहून अधिक युनियन कामगारांनी संपाचे अस्त्र पुकारले आहे. हा संप गेल्या ३० वर्षातील सर्वात मोठा रेल्वे संप आहे. वाढीव वेतनाबाबत कामगार संघटना आणि रेल्वे कंपन्यांमधील चर्चा भंगल्यानंतर कामगारांनी तीन दिवसासाठी वॉकआउट करण्याचा निर्णय घेतला.
एकेकाळी भारतावर राज्य केलेला ब्रिटनदेखील सध्या भारताच्या जागतिक महत्त्वापासून दूर नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौर्यावर आले होते. त्यांचा दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे
गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात अमेरिका, ब्रिटनसहित पाश्चात्य देशांच्या तथाकथित महासत्तापदाचा फोलपणा प्रकर्षाने समोर आला. दोन्ही देशांतील युद्धाचा प्रभाव संपूर्ण जगावर पडला तरी त्याने भारताच्या मुत्सद्देगिरी आणि ताकदीचा सामना कोणताही देश करू शकता नाही, हेदेखील ठळकपणे स्पष्ट झाले. भारत व रशियात उत्तम मैत्रीसंबंध असल्याची जगाला माहिती आहेच. त्या पार्श्वभूमीवर रशियाच्या युक्रेनबरोबरील संघर्षात भारताने तटस्थ भूमिका घेतली. पण, त्यालाच विरोध करण्याचे काम अमेरिकेने केल
"भारतातले कायदे मोडून आमच्या देशात पळून आलेल्यांना आमच्या देशात आम्ही थारा देणार नाही" अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भूमिका स्पष्ट करून ब्रिटन विजय मल्ल्या आणि निरव मोदी यांच्या प्रत्यार्पणास तयार असल्याचे सांगितले
‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ अॅलार्डाईस यांनी ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या समावेशाबाबत नुकतेच एक विधान केले. २०२८ साली होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेतक्रिकेट या खेळाचाही समावेश करण्यासाठी ‘आयसीसी’ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले
भारतीय लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह लष्करातील अनेक अधिकार्यांना अटक करावी, अशी तक्रार पाकिस्तानच्या जिया मुस्तफाने युनायटेड किंग्डमच्या पोलिसांकडे नुकतीच केली, तीही ब्रिटनमध्ये असलेल्या एका कायद्याच्या आधारे! पाकिस्तानी सरकारच्या मते, जिया हा काश्मीरमुक्तीमधील स्वातंत्र्यसैनिक! पण, सत्य हेच आहे की, जिया हा पाकिस्तानी असून तो ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित आहे. त्याने २४ काश्मिरी पंडितांची क्रूरपणे हत्या केली होती. काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ पुन्हा अमलात आणावे, अशीही जियाची मागणी. आपल्या द