रशिया-युक्रेन युद्धात नवी ठिणगी! एकमेकांवर केला क्षेपणास्त्रांचा हल्ला
21-Nov-2024
Total Views |
मॉस्को : रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाला हजार दिवस पूर्ण झाले आहेत, अशातच आता रशियाने युक्रेन वर आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा मारा केला आहे. आण्विक शस्त्रांच्या वापराबद्द्लचे धोरण रशियाने बदल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला करण्यात आला आहे. युक्रेन आणि पाश्चात्य जगातीला त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी हा एक इशारा आहे असे म्हटले जात आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी युक्रेनला रशियाच्या हद्दीत खोलवर लक्ष्य करण्यासाठी लांब पल्ल्याच्या क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास परवानगी दिल्यानंतर, युक्रेनने क्षणार्धात अमेरीकन बनावटीच्या एटीएमसीएस मिसाईल आणि इंगलंडच्या बनावटीच्या ' स्टॉर्म श्याडो' मिसाईलचा वापर करत रशियावर मारा केला. यानंतर रशियाने ही प्रतिक्रिया दिल्याचे दिसून आले आहे. युक्रेनियन वायुसेनेने आज एक निवेदन प्रसिद्ध केले ज्यात असे म्हटले आहे की रशियन सैन्याने आज सकाळी मध्य युक्रेनियन शहर डनिप्रो येथे विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागली आहेत. ज्यांचा उद्देश युक्रेनियन पायाभूत सुविधा नष्ट करणे हा होता. एकूण ६ मिसाईल्साच मारा रोखण्यात युक्रेनला यश आले आहेत. दुसऱ्या बाजूला रशियाला देखील युक्रेनच्या दोन मिसाईल्सला रोखण्यात यश आले आहेत. सद्य परिस्थितीमध्ये चर्चेची दारं बंद झाली असून रणांगणावरच रशिया युक्रेन आमने सामने दिसत असल्याचे चिन्हं आहेत. ही परिस्थीती असताना सुद्धा जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांनी शांततेत हा प्रश्न सोडवावा अशी विनंती दोन्ही देशांना केली गेली आहे.