हिंदू विवाहाचा पवित्र संस्कारहिंदू परंपरेत विवाह केवळ एक सामाजिक करार नसून ते एक पवित्र आणि सात जन्मांचं नातं मानलं जातं. हा विवाह केवळ त्या दोन व्यक्तींचाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांचा आणि समाजालाही जोडणारा एक महत्त्वाचा बंध असतो. त्यामुळे पूर्वीपासून धर्म, कर्तव्य आणि समाजात संतुलन राखण्याच्या दृष्टीने विवाह संस्काराला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजकाल अनेक विवाहांमध्ये आधुनिकतेच्या आग्रहापायी पारंपरिक विधी कमी प्रमाणात होत असले, तरी अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा सर्व भारतीय परंपरा आणि विधींसह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यामागे अनंत आणि राधिकाचा परंपरा, संस्कृतीप्रति आदर प्रतिबिंबित झाला. तसेच त्यामागे वडीलधार्यांचे व आचार्यांचे आशीर्वाद घेण्याचीही त्यांची मनस्वी भावना होती. त्यामुळे हा विवाह जगाला भारताच्या सांस्कृतिक समृद्धतेचे दर्शन घडवणारा क्षण ठरला.
जागतिक मान्यवरांची सोहळ्याला उपस्थितीअनंत आणि राधिका यांच्या विवाहात भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली. यामध्ये प्रामुख्याने जॉन केरी (अमेरिकन राजकारणी), टोनी ब्लेअर (ब्रिटनचे माजी पंतप्रधान), बोरिस जॉन्सन (ब्रिटनचे माजी पंतप्रधान), स्टीफन हार्पर (कॅनडाचे माजी पंतप्रधान), एनरिक लोरेस (उएज, कझ), शंतनू नारायण (उएज, अवेलश), किम कार्डाशियन, लो कार्डाशियन (जगप्रसिद्ध सेलिब्रिटी), जय ली (सॅमसंग) आणि अनेक जागतिक कंपन्यांचे सीईओ, अध्यक्ष आणि उद्योजक उपस्थित होते.
भारताची जागतिक प्रतिमा अधिक भक्कमआज आपला देश आर्थिक, तांत्रिक आणि औद्योगिक प्रगतीच्या मार्गाने वेगाने वाटचाल करीत आहे. त्याच काळात असा हा पारंपरिक विवाह सोहळा भारताच्या ‘जगाची आध्यात्मिक राजधानी’ या प्रतिमेला बळकटी देणारा ठरला. जागतिक नेते, उद्योगपती आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, ही भारताच्या जागतिक पातळीवरील वाढत्या प्रभावाचीच साक्ष देणारी म्हणावी लागेल.
पाहुण्यांना बनारसची अनुभूतीविवाहदिनी ’An Ode to Banaras’ या संकल्पनेवर सजवलेल्या परिसरात बनारसच्या घाटांचा, भोजन व हस्तकलेचा अनुभव पाहुण्यांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. पाहुण्यांना बनारसची अनुभूती मिळावी, यासाठी संपूर्ण परिसर अगदी आकर्षकरित्या सजवण्यात आला होता.
पारंपरिक वेशभूषा आणि भारताचे सांस्कृतिक दर्शन’ठशीश्रिशपवशपींश्रू खपवळरप’ या संकल्पनेनुसार विवाह सोहळ्यात सर्व पाहुणे पारंपरिक भारतीय वेशभूषेत सहभागी झाले. विविध रंग, वस्त्रप्रकार आणि कारागिरी यांचे दर्शन घडवणारा हा विवाह सोहळा भारताच्या समृद्ध वस्त्रसंस्कृतीचेही अद्भुत दर्शन घडविणारा ठरला.
अनंत अंबानी आणि राधिकाची रेशीमगाठ...अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा २०२४ मध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झालेला विवाह सोहळा केवळ एक सामाजिक समारंभ नव्हता, तर तो एक सांस्कृतिक पर्वणी ठरला, ज्याची भारतासह संपूर्ण जगभरात चर्चा झाली. पारंपरिक विधी आणि आध्यात्मिक वातावरणाने भारलेला हा विवाह सोहळा समाजमाध्यमांवर आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांतूनही लाखो लोकांनी पाहिला.
मानवसेवा हीच माधवसेवाअनंत आणि राधिकाच्या विवाह सोहळ्याच्या प्रारंभी अंबानी कुटुंबाने नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे ५० गरजू जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळादेखील आयोजित केला होता. त्यानंतर सलग तीन आठवडे भंडार्यातून हजारो लोकांना अन्नदानही केले गेले, त्यातून ‘मानवसेवा हीच माधवसेवा’ आहे, असा संदेश देण्यात आला.
धर्मगुरूंचा महामेळाया विवाह सोहळ्यात विविध वैदिक आणि आध्यात्मिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे धर्मगुरू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने-स्वामी सदानंद सरस्वती (शंकराचार्य, द्वारका), स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (शंकराचार्य, जोशीमठ), गौरांग दास प्रभू (आयएस्कॉन), गौर गोपाल दास, राधानाथ स्वामी, पूज्यश्री रमेशभाई ओझा, बाबा रामदेव, श्री देवकीनंदन ठाकूरजी, दीदी माँ साध्वी ऋतंभरा आणि इतर अनेक संत-महंत, गुरूजी व आचार्य यांची उपस्थिती होती.
विवाहपूर्व कार्यक्रमविविध पारंपरिक कार्यक्रम विवाहपूर्व साजरे करण्यात आले.
मोसलू : वराच्या मामाने नवदाम्पत्याला दिलेली भेटवस्तू (मामेरू)
व्हॅली ऑफ गॉड्स : निता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली मंदिरात पारंपरिक नृत्य
संगीत : अंबानी कुटुंबातील सदस्यांचा नृत्य व संगीताचा कार्यक्रम
ग्रहशांती पूजन : नवग्रह शांती व गणेशपूजन
पिठी-हळदी : पारंपरिक हळदी समारंभ
शिवशक्तीपूजा आणि भजन : आध्यात्मिक समारंभ
विवाह विधी : वैदिक पद्धतीने अग्नीला साक्षी मानून विवाह
विवाह समारंभानंतर तीन दिवसीय स्वागत समारंभ : कर्मचार्यांसाठी खास दिवस