‘ग्रुमिंग गँग’चा ‘लव्ह जिहाद’

    05-Apr-2023   
Total Views |
uk-minister-suella-braverman-says-pakistani-men-grooming-white-girls-and-rape

त्यावेळी मी किशोरवयीन होते. माझे प्रेम एका पाकिस्तानी मुस्लीम व्यक्तीसोबत होते. पण, त्याने प्रेमाच्या नावाने विविध शहरांमध्ये नेऊन माझ्यावर अनन्वित शारीरिक अत्याचार केले. त्याच्यापासून कसे वाचायचे? मी लहान होते. मग पोलिसांनीच माझ्या पालकांना सांगितले की, राहते शहर सोडून जा. आम्ही आमचे शहर सोडले. पण, ते प्रेमाच्या नावाने केलेला छळ आणि अत्याचार विसरायला खूप त्रास झाला.” ब्रिटनची इंग्रज नागरिक डॉ. एला हिल हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले. ब्रिटनच्या समाजअभ्यासकांच्या मते, २०१९ साली इंग्लंडमध्ये १९ हजार अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले. त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तर गेल्या ४० वर्षांत एकूण पाच लाख अल्पवयीन मुली अगदी दहा वर्षांपासूनच्या अल्पवयीन मुलींवर सामुदायिक बलात्कार, शारीरिक-मानसिक शोषण झाले. व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्री-पुरुष समानतेचा बिगुल सारखाच वाजवणार्‍या ब्रिटनमध्ये हे का झाले?

नुकतेच ब्रिटिश चॅनल ‘जीबी न्यूज़’ने एक डॉक्युमेंटरी, ‘ग्रूमिंग गँग्स : ब्रिटेन्स शेम’ या नावाने प्रसिद्ध केली. त्यामध्ये अत्याचार पीडित हजारो मुली-महिलांसोबत संपर्क केला गेला. त्या अत्याचाराला कशा बळी पडल्या? त्यांच्यासोबत काय घडले? याबाबत या डॉक्युमेंटरीमध्ये मांडणी केली गेली. आपल्याकडे ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहून वादळ उठले. काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचाराची जाणीव अवघ्या देशाला जाणीव झाली. तसेच ‘ग्रूमिंग गँग्स : ब्रिटेन्स शेम’ या डॉक्युमेंटरीमुळे अख्खा ब्रिटन ढवळून निघाला. काही वर्षांमध्ये ब्रिटनमधील इंग्रज आणि शीख तसेच गैरमुस्लीम अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटना वाढल्या. अगदी १०-११ वर्षांच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना अमली पदार्थांची चटक लावून त्यांचे शारीरिक शोषण करण्याच्या घटना घडू लागल्या. ब्रिटनमधली शीख संघटनेने तर याबाबत स्पष्टच म्हटले की, ”काही छानछोकी पोशाख केलेले मूल, आधुनिक पोशाखात महागड्या वाहनातून शाळा- महाविद्यालयांच्या बाहेर घिरट्या घालतात. कधी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून तर कधी जबरदस्तीने या बालिकांशी संपर्क वाढवतात, तर कधी ‘ब्लॅकमेल’ करूनही या मुलींचे शारीरिक शोषण करतात.”

याबाबत ब्रिटनच्या गृहमंत्री सुऐला ब्रेवमॅन यांनी जाहीरपणे म्हटले की, “गुन्हेगार ‘ग्रुमिंग गँग’वाले आहेत. या घटनांमध्ये दोषी आढळलेल्यांपैकी दोनच जण आफ्रिकन आहेत, तर बाकी सगळे पाकिस्तानी वंशाचे मुस्लीम आहेत.” पुढे त्या म्हणतात, ”वंशभेद किंवा धर्मभेद करतो, आपण पुरोगामी नाही, असा कोणी आपल्यावर ठपका ठेवू नये म्हणून याबाबत कोणीही उघडपणे हे गुन्हेगार पाकिस्तानी मुस्लीम असतात हे म्हणत नाहीत.” अर्थात, त्यानंतर ब्रिटनमधील तथाकथित पुरोगामी गटाने सुऐल यांच्यावर टीकेची झोड उठवली, तर यावर ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटले की,“हे सगळे भयंकर आहे. निवडून येण्यापूर्वीच मी म्हटले होते की, ब्रिटनच्या बालिकांवर अत्याचार करणार्‍यांची गय केली जाणार नाही. या क्रूर अपराध्यांना शासन केलेच जाईल. त्यासाठी ‘नॅशनल क्राईम एजेंसी’ द्वारा समर्थित विशेषज्ञ अधिकार्‍यांसोबत ‘ग्रूमिंग गँग टास्कफोर्स’ निर्माण करणार” आता सुनक यांच्या या निर्णयाचे अवघ्या ब्रिटनच्या नागरिकांनी समर्थन केले आहे.

‘ग्रुमिंग गँग टास्कफोर्स’ काय काम करेल, तर अशा घटना घडल्या, तर त्या विरोधात तपास आणि तथ्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना मदत करेल. तसेच, गुन्हेगार आणि पीडित यांच्या जातीयतेसंदर्भातही अभ्यास करेल. असो. बालिका, मुली केवळ इंग्रज आहेत, शीख हिंदू आहेत म्हणून त्यांना फसवणारे, बलात्कार करणारे त्यांना नशेचे आदी बनवून त्यांना जीवनातून उठवण्याचे कारस्थान करणारे ब्रिटनमधील ते पाकिस्तानी वंशाचे मुसलमान. त्यातले काही अपवादही असतील. पण, गेल्या ४० वर्षांत पाच लाख मुलींसोबत असे जघन्य कृत्य करणारे बहुसंख्य एकाच देशातील एकाच वंशातील असतील तर मग काय समजायचे? आपल्या इथेही मुलगी हिंदू आहे म्हणून तिला फसवून तिचे शारीरिक शोषण केल्याच्या घटना घडत असतात. ब्रिटनमध्ये या गुन्ह्याला ‘ग्रुमिंग गँग’चा गुन्हा म्हणतात, तर भारतात ‘लव्ह जिहाद.’ ब्रिटिश ‘ग्रुमिंग गँग’च्या विरोधात एकवटले आहेत. आपला भारत ‘लव्ह जिहाद’ विरोधात कधी एकवटणार?





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.