नवी दिल्ली : परकियांच्या सुंदर आकर्षक व्यक्तीमत्वाने हुरळून जाण्यापेक्षा भारतीयच सर्वाधिक आकर्षक असल्याचे शिक्कामोर्तब इंग्लडच्या ‘पोर मोई’ने केलेल्या विश्लेषणात करण्यात आले आहे. नुकतेच विश्लेषण केलेल्या ५० आकर्षक दिसणार्या देशांची यादी जाहीर करण्यात आली त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका दुसर्या, तर ब्रिटन तिसर्या क्रमांकावर आहे. ‘पोर मोई’च्या विश्लेषणानूसार जपान चौथ्या स्थानावर, तर कॅनडा पाचव्या स्थानावर आहे.
सर्वात आकर्षक व्यक्तिमत्त्वे निवडण्यासाठी सोशल मीडिया न्यूज एग्रीगेटर प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वर दिसणार्या पोस्टचे विश्लेषण करण्यात आले. ज्यामध्ये विविध देशांतील लोक होते. या पोस्टवरील कमेंटमध्ये येणार्या आकर्षक, सुंदर, देखणा, भव्य, गुड आदी शब्दांच्या आधारे त्यांचे गुण तयार करण्यात आले. याशिवाय त्यांना मिळालेल्या अपव्होट्सचाही एक भाग बनवण्यात आला. आणि मग एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुध्दीमत्ता)ची मदत घेऊन मानांकन तयार करण्यात आले, अशी माहिती इंग्लंड स्थित द सनच्या वृत्तात देण्यात आली आहे.
दरम्यान, सुंदर दिसण्याच्या बाबतीत एकूण देशांच्या यादीत ब्रिटन पहिल्या १० मध्येही स्थान मिळवू शकले नाही. तथापि, ब्रिटनचे पुरुष खूपच आकर्षक मानले गेले आहेत आणि पुरुषांच्या यादीत ब्रिटनला पहिल्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.पुरुषांच्या यादीत भारत दुसर्या, इटली तिसर्या, अमेरिका चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार अमेरिकेपाठोपाठ स्वीडन, जपान, फ्रान्स, आयर्लंड, बेल्जियम आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो.या विश्लेषणात देशाव्यतिरिक्त सुंदर महिला आणि देखण्या पुरुषांचीही स्वतंत्र यादी जाहीर केली आहे. यातही भारत आघाडीवर राहिला. या यादीत भारतीय महिलांचे वर्णन जगातील सर्वात सुंदर म्हणून करण्यात आले आहे.
जगातील सर्वात सुंदर महिलांच्या बाबतीत जपान दुसर्या क्रमांकावर आहे. त्यामध्ये स्वीडन तिसर्या, पोलंड चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, इटलीच्या महिला पाचव्या क्रमांकावर आहेत. विविध देशांचे सौंदर्य दाखवण्यासाठी एआयचा वापर करण्यात आला आणि यातून त्यांची चित्रे प्रसिद्ध झाली.त्याच्या मते, जेव्हा जेव्हा जगातील सर्वात सुंदर महिलेचे नाव येते तेव्हा ‘रेडीट’ वापरकर्त्यांच्या यादीत भारतीय महिला पहिल्या स्थानावर असतात. चित्रपटांपासून ते जगाच्या अनेक टप्प्यांवर भारतीय महिलांनी आपल्या सौंदर्याचा बोलबाला केला आहे.
केलेल्या विश्लेषणानुसार, जपान आणि स्वीडनमधील महिलांचा टॉप ३ मध्ये समावेश आहे. दोन्ही देशांतील महिला त्यांच्या खास दिसण्यासाठी ओळखल्या जातात. जपानी महिला त्यांच्या स्वच्छ लूक आणि वेगळ्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. दुसरीकडे, स्वीडिश महिलांना कमी अॅक्सेसरीजसह चांगले दिसण्यासाठी ओळखले गेले आहे.
जगभरात भारतीयांच्या वाढत्या वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर, हा अहवाल त्यांच्या ताकदीचे उदाहरण सादर करतो आणि दर्शवतो की भारतीय जगभर पसरत आहेत आणि त्यांचा नावलौकिक करत आहेत. आता भारतीयांच्या सौंदर्याचेही कौतुक होत आहे.रेडिटच्या वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या देशांतील लोकांना अपव्होट केले. यामध्ये भारतीयांना सर्वाधिक २,६२८ अपव्होट मिळाले आहेत. तर अमेरिकेला फक्त १,९३६ अपव्होट मिळाले. भारतीयांसाठी सर्वात आकर्षक, सुंदर, देखणा, भव्य, चांगले आदी शब्द वापरले आहेत आणि सर्वाधिक अपवोट दिले आहेत.