कॅनडात हिंदू मंदिराची खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड; खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जरचा 'शहीद' असा उल्लेख
13-Aug-2023
Total Views | 50
नवी दिल्ली : कॅनडात पुन्हा एकदा खलिस्तानवाद्यांकडून हिंदू मंदिराची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. कॅनडात खलिस्तानवाद्यांकडून वारंवार हिंसाचार होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा खलिस्तानींनी कॅनडातील लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केली. तसेच, या तोडफोडप्रकरणी आरोपी असलेला खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जरला शहीद म्हटले गेले. त्यामुळे कॅनडातील खलिस्तानवाद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, युके संरक्षण मंत्री टुगेनहाट यांनी कट्टरपंथी खलिस्तांनीना आळा घालण्यासाठी भारताच्या आवाहनावर मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे हिंदू मंदिर खलिस्तानवाद्यांनी त्यावर हल्ला केला, त्याची तोडफोडप्रकरणी भारतीयांकडून कठोर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी असलेला व ठार झालेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचे पोस्टर्स मंदिराच्या गेटवर चिकटवण्यात आले असून त्यांना शहीद म्हटले आहे. या पोस्टरमध्ये खलिस्तान सार्वमताची चर्चा असून खलिस्तानींचे हे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उघड झाले आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात खलिस्तानवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदू मंदिराला लक्ष्य केले आहे. ही घटना शनिवार दि.१२ ऑगस्ट २०२३ रात्री घडली असून याचवेळी खलिस्तानवाद्यांनी मंदिराची तोडफोड केली होती.
कॅनडातील मंदिरावरील हल्ल्याची तिसरी घटना
विशेष म्हणजे, कॅनडातील हिंदू मंदिरांची तोडफोड आणि लक्ष्य करण्याची ही तिसरी घटना असून दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी कॅनडातील ब्रॅम्प्टनमध्ये एका प्रमुख हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. त्यावर भारतविरोधी चिथावणीखोर गोष्टी लिहिल्या होत्या. यानंतर एप्रिलमध्ये कॅनडातील ओंटारियो येथे आणखी एका हिंदू मंदिराला खलिस्तानवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यावर भारतविरोधी घोषणाही लिहिल्या होत्या. तथापि, या प्रकरणात कॅनडाच्या सुरक्षा एजन्सींनी एक सीसीटीव्ही फुटेज देखील जारी केले होते, ज्यामध्ये दोन लोक स्प्रे पेंटद्वारे मंदिराच्या भिंतीवर भारतविरोधी घोषणा लिहिताना दिसत होते. त्याचवेळी खलिस्तानींच्या या कृत्यामुळे तेथे राहणाऱ्या भारतीय समुदायामध्ये प्रचंड नाराजी होती.