(Eggs Thrown At ISKCON Rath Yatra In Toronto Canada) कॅनडाच्या टोरंटोमध्ये काढलेल्या इस्कॉनच्या जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून केंद्र सरकारने त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या रथयात्रेत सहभागी झालेल्या एका भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्या महिलेने केलेल्या पोस्टनंतर हा प्रकार उघडकीस झाला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध व्यक्त करत कॅनडा सरकारकडे आपली परखड भूमिका मांडली आहे.
Read More
कॅनडातील ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाला. कपिल शर्माने काही दिवसांपूर्वी कप्स कॅफे नावाच्या कॅफेचे उद्घाटन केले होते. हल्लेखोरांनी कॅफेवर नऊ गोळ्या झाडल्या आहेत. हल्लेखोरांनी या हल्याचे व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ देखिल व्हायरल होत आहे. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे.
कलेसाठी जीवन की, जीवनासाठी कला’ हा वाद तसा फार जुनाच. कला समीक्षकांनी, विचारवंतांनी यावर बरेच विचारमंथन करून ठेवले आहे. रूढार्थाने या वादाचे अंतिम उत्तर काही सांगता येत नाही परंतु, एक गोष्ट मात्र नक्की; कला हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माणसाच्या जीवनाला अर्थ येतोच, तो त्याच्यावर झालेल्या कलेच्या संस्कारांमुळे. परंतु, याच कलेची, कलाकृतीची विटंबना व्हायला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा ती समाजमनाच्या अध:पतनाचीसुद्धा सुरुवातच असते.
कॅनडामधील अल्बार्टा प्रांतातील कनानास्किस येथे दोन दिवसीय ‘जी-७’ शिखर परिषद नुकतीच संपन्न झाली. युद्धजन्य स्थितीवर एक औपचारिक संयुक्त निवेदन, इस्रायलला पाठिंबा आणि इराणच्या अण्वस्त्रनिर्मिती विरोधात ठराव, ही ‘जी-७’ गटाच्या कॅनडातील परिषदेची प्रमुख वैशिष्ट्ये. पण, त्याहीपेक्षा अधिक चर्चिली गेली ती ट्रम्प यांची धावती भेट. तसेच या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाश्चात्त्य देशांच्या दहशतवादाविषयक दुटप्पी धोरणांचाही कठोर शब्दांत समाचार घेतला. यानिमित्ताने ‘जी-७’ परिषदेच्या फलश्रुतीचा आढावा घेणार
विशेष प्रतिनिधी खलिस्तानी अतिरेकी कॅनडाच्या भूमीचा वापर भारतात हिंसाचारासाठी करत आहेत, असे कॅनडाची प्रमुख गुप्तचर संघटना असलेल्या कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस (सीएसआयएस)ने प्रथमच अधिकृतपणे कबुल केले आहे.
(PM Narendra Modi) कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये ३५ मिनिटे फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर जी-७ शिखर परिषदेच्या वेळी त्यांची भेट होणार होती, परंतु डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत लवकर परतल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या विनंतीवरून दोघांमध्ये फोनवरुन ही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल ट्रम्प यांच्यांशी सविस्तर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र सचि
विशेष प्रतिनिधी कॅनडात कनानास्किस येथे होणाऱ्या ‘जी - ७’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कॅनडात दाखल झाले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या अधिकृत निमंत्रणानंतर २०१५ नंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच कॅनडा दौरा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सूत्रधाराला कॅनडामध्ये अटक करण्यात आली आहे. झीशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल असे त्याचे नाव असून त्याला कॅनडाच्या सरे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.
uniqueness of the election results in Canada 51वे राज्य म्हणून अमेरिकेत सामील व्हा, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडाला वारंवार हिणवण्याच्या पार्श्वभूमीवर यंदा कॅनडाची निवडणूक राष्ट्रवादाच्या प्रमुख मुद्द्याभोवती केंद्रित होती. या निवडणुकीत अखेरीस लिबरल पक्षाचा विजय झाला आणि पक्षाचे नेते मार्क कार्नी यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली. त्यानिमित्ताने कॅनडातील निवडणुकांचा अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. निवडणूक निकाल पाहता, विद्यमान पंतप्रधान मार्क कार्नी हेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीत खलिस्तानी जगमीत सिंग याचा पराभव झाला आहे.
Khalistani terrorists कॅनडामध्ये व्हँकुव्हरमधील एका प्रसिद्ध असणाऱ्या गुरूद्वारावर काही खलिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्याच रात्री गुरूद्वारावर भारता विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. व्हँकुव्हरच्या एका हिंदू मंदिरांच्या भिंतींवर भडखाऊ घोषणा नमूद करण्यात आल्या होत्या. आरोप आहे की, काही दिवसांआधी गुरूद्वारावर खलिस्तान्यांनी नगर किर्तनात सामिल होऊ दिले गेले नाही, यानंतर ही घटना घडली आहे.
India अमेरिकेच्या टेरिफमुळे जगामध्ये व्यापारयुद्धाचे सावट जमा झाले आहे. त्यातच कॅनडाच्या नव्या पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याची मनिषा व्यक्त केली आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापारी युद्धकाळात जगाच्या पुरवठा साखळीमध्ये, मोलाची भूमिका बजावण्याची नामी संधी भारताकडे आहे. याच पार्श्वभूमीवर एकूण परिस्थितीचा घेतलेला आढावा....
कॅनडाच्या राजकारणातील आधुनिक इतिहासात जस्टिन ट्रुडो यांची कारकीर्द ही गोंधळ, दुटप्पी धोरणे आणि आंतरराष्ट्रीय अपयश यांचे मूर्तिमंत उदाहरण ठरली आहे. त्यांनी खलिस्तानसारख्या अतिसंवेदनशील मुद्द्यावर घेतलेल्या भारतविरोधी भूमिकेमुळे केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे, तर कॅनडाच्या जागतिक विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण झाले. ‘जागतिक हरित धोरण’ आणि मानवाधिकाराच्या नावाखाली त्यांनी, आंतरराष्ट्रीय मंचांवर अनेक भावनिक भाषणे केली. पण, त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणातील अस्थिरतेने कॅनडाच्या व्यापार, गुंतवणूक आणि परराष्ट्र
( Mark Carney as Canada leader ) कॅनडाच्या लिबरल पक्षाने मार्क कार्नी यांची नेतेपदी निवड केली आहे आणि ते जस्टिन ट्रुडो यांची जागा कॅनडाचे पंतप्रधान म्हणून घेणार आहेत, असे वृत्त कॅनडातील सीटीव्ही न्यूजने दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर जागतिक परिस्थितीमध्ये मोठ्या वेगाने बदल होण्यास सुरुवात झाली. यामध्ये अनेक बदल असले तरी लक्षणीय असलेले बदल म्हणजे, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा होय! ट्रुडोंच्या बेताल वक्तव्याने भारताशी असलेले कॅनडाचे ( India-Canada Relations ) संबंध कमालीचे खालावले होते. ते आता सुधारतील अशी अपेक्षा आहे. ट्रुडोंच्या राजीनाम्यानंतर कॅनडात बदलणार्या संभाव्य राजकारणावर टाकलेला दृष्टिक्षेप...
जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेची निवडणूक जिंकल्यानंतर जगाची रचना पूर्वपदावर आणण्याचा चंग डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधला आहे. त्यालाच अनुसरून ते आक्रमक विधाने करत आहेत. मात्र, आजही त्यांचा प्रवास हा त्यांच्या सर्व नेतृत्वगुणांचा कस पाहणारा असेल, हे निश्चित...
आपल्या कार्यकाळात असंख्य आव्हानांना तोंड देत कॅनडा सारख्या देशाचा गाडा सांभाळणारे जस्टिन ट्रूडो आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. अकार्यक्षम नेतृत्व, लोकाभिमुख धोरण राबवताना आलेलं अपयश, आर्थीक आघाडीवर आलेला पराभव अशा असंख्य गोष्टींमुळे ट्रूडो यांची पक्षांतर्गत नाचक्की झाली होती.
जस्टिन ट्रूडो यांची लिब्रेल पार्टी आणि न्यू डेमोक्रेटीक पार्टी सत्तेमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. परंतु त्यांच्या मित्रपक्षाने आता त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खलिस्तानी नेते जगमीत सिंह हे येत्या वर्षात ट्रूडो सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणणार आहे. लिब्रल पार्टी आणि एनडीपीच्या सहयोगाने ट्रुडो यांचे सरकार आतापर्यंत स्थिर होते, परंतु सिंह यांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जस्टिन ट्रूडो यांच्या नेतृत्वात कॅनडाची अर्थव्यवस्था ढासळल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या उपपंतप्रधान तथा अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी अचानक राजीनामा दिला. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याशी धोरणात्मक बाबींवर मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. ट्रूडो यांच्या नेतृत्वात क्रिस्टिया संसदेत ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दलचा अहवाल मांडणार होत्या, परंतु त्याच्या काही तास आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. क्रिस्टिया फ्रीलँ
कॅनडामधील खलिस्तानी कट्टरपंथीयांचा उन्माद शांत होण्याचे नाव घेत नाहीये. ३० नोव्हेंबर रोजी खलिस्तान समर्थकांनी कॅनडातील ओंटारियो इथल्या लक्ष्मी नारायण मंदिराबाहेर भारत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असंविधानिक भाषा वापरत खलिस्तानी समर्थकांनी उच्छाद मांडला. न्यायालयाच्या आदेशाने अशा निदर्शांवर बंदी असतान सुद्धा ही निर्दशनं केली गेली. कॅनडामधील भारतीय दूतावास कॅनडामध्ये राहणाऱ्या वृद्ध भारतीय नागरिकांना जीवन प्रमाणपत्र देऊन मदत करण्यासाठी वार्षिक कॉन्सुलर शिबिरे घेत
(India ) भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या वर्तमानपत्रातील दहशतवादी निज्जरच्या संबंधातील वृत्त फेटाळून लावले. मंत्रालयाने अशा अहवालांना हास्यास्पद म्हटले आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडू शकतात.
कॅनडामधील हिंदू समाजला वेळोवेळी त्रास देण्याचा चंग तिथल्या सरकारने बांधला आहे की काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कॅनडा मधील हिंदू समाजातील लोकांना काही खलिस्तानी फुटीरतावादी लोकांकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. अशातच, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या सरकार आणि पोलिसांवर आहे, त्या पोलिसांनीच आता सामान्य हिंदू नागरिकांकडून खंडणी मागण्याचे काम सुरू केले आहे. सुरक्षा हवी असेल, तर ७०,००० डॉलर्स द्या अशी मागणी या पोलिसांनी केली आहे.
काही दिवसांआधी कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे झालेल्या हिंदू मंदिरावरील हल्लाप्रकरणातील चौथा आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो खलिस्तानी संघटनेचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. इंद्रजीत घोसल असे त्याचे नाव असून गुरूपवंत सिंह यांचा तो युवक निकटवर्ती आहे.
मुंबई : कॅनडामधील ( Canada ) एका हिंदू मंदिरावर खलिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कॅनडामध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानावर झालेल्या हल्ल्याचा कॅनडातील भारतीय वंशाच्या खासदारांनी परखड शब्दांत टीका करत पंतप्रधान ट्रुडोंना दहशतवाद्यांना आश्रय देण्यास जबाबदार धरले आहे.
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी कॅनडाचा चांगलाच समाचार घेतला आहे. जयशंकर म्हणाले की " काल ज्या प्रकारे हिंदू मंदिरावर जो हल्ला झाला तो चिंताजनक आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याच बरोबर भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर पाळत ठेवणे ही बाब सुद्धा असभ्य होती. कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर न करता भारतावर आरोप करायचा हे आता कॅनडा सरकारचे धोरणच होऊन बसले आहे."
नवी दिल्ली : ( Canada ) कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तान्यांनी हल्ला केल्यानंतर ‘कॅनडियन नॅशनल काऊन्सिल ऑफ हिंदू’ (सीएनसीएच) या संघटनेने कॅनडियन राजकारण्यांना मंदिरात प्रवेश करू न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘सीएनएचएच’तर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “ब्रॅम्प्टनमधील गोर रोडवर असलेल्या हिंदू मंदिराला हिंसक घटनेदरम्यान खलिस्तान समर्थक आंदोलकांनी लक्ष्य केले होते.
Hindus कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पण यामुळे हिंदूंचा क्रोध शांत होत नाही. कॅनडात मोर्चा काढून त्यांनी आपल्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
Khalistani गटाने हिंदू गटाला लक्ष केले गेले असल्याची घटना कॅनडा येथे घडली आहे. मात्र या हल्ल्याला आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी ब्रॅम्प्टन येथील मंदिरात हिंदू भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. देशात हिंसाचाराची कृत्ये अस्वीकार्य आहेत. रविवारी हिंदू मंदिरात भाविकांच्या एका गटाला कथित खलिस्तानी समर्थकांनी लक्ष्य केले गेले. यामुळे आता याप्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे.
कॅनडामध्ये हिंदू मंदिरातील भक्तांवर खालिस्तानी फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता ब्रॅम्प्टन मधील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता समाज माध्यामांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मध्ये एक पुजारी तिथल्या भक्तांना "बटेंगे तो कटेंगे"चा संदेश देताना दिसत आहेत. जात, धर्म, विचारधारा या सगळ्यांच्या पलिकडे जाऊन हिंदू म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
Khalistan भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडा सरकारने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरचे मृत्यूपत्र देण्यास नकार देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय एजन्सी एनआयएने कॅनडाकडून निज्जरचे मृत्यूपत्र मागितले. जेणेकरून त्यांच्यावरील खटले न्यायालयात अद्ययावत करता येतील. यावर आता कॅनडाने भारताच्या या विनंतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी भारताला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संघर्षाचे नवे अध्याय दिवसेंदिवस निर्माण होत असतानात आता एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला आहे. भारताचे कॅनडातील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना एका घटनेचा गौप्यस्फोट केला आहे. कॅनडामध्ये असताना काही खालिस्तानी फुटीरतावाद्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामधून मी थोडक्यात बचावलो. भारताच्या आणि भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील झालेल्या बेबनावाला पूर्णपणे जस्टिन ट्रूडो जबाबदार असून, ट्रूडो हे खलिस्तानी प्रोपोगंडाचा प्रचार करत आहेत असे जाहीर विधान पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले आहे. ट्रूडो यांना केवळ शीखांची मतं मिळवायची असून, जाणीवपूर्वक खलिस्तानी लोकांना फूस लावली जात आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंध बिघडवल्यानंतर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या समोर आता नवीन आव्हान उभे राहिले आहे. ट्रूडो यांच्याच पक्षातील खासदारांनी त्यांना २८ ऑक्टोबरच्या आत राजीनामा द्यायला सांगितला आहे. खासदारांचा हा सल्ला ट्रूडो यांनी मान्य केला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा त्यांच्याच पक्षातील लोकांनी दिला आहे.
नवी दिल्लीतील रोहिणी परिसारात, रविवारी सकाळी झालेल्या स्फोटामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता नवीन माहिती समोर आली आहे. या स्फोटाची जबाबदारी खालिस्तान जिंदाबाद फोर्सने घेतली आहे. टेलिग्राम वर या संदर्भातील पोस्ट व्हायरल करत संघटनेने ही माहिती दिली.
भारत आणि कॅनडा मध्ये सुरू असलेल्या वादामध्ये आता एक नवीन खुलासा समोर आला आहे. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजीव कुमार वर्मा यांनी असा दावा केला आहे की, शीख फुटीरतावादी हे कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेचे हस्तक आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांना खुद्द कॅनडा सरकार प्रोत्साहन देत असते.
खलिस्तानी आणि कॅनडाच्या ट्रुडो सरकारचे लागेबांधे हे तसे सर्वश्रूत. मतपेढीच्या लांगूलचालनाचा हा कॅनडामधील केविलवाणा प्रकार. भले, मग या खलिस्तानींमुळे भारताशी संबंध बिघडले तरी बेहत्तर अशीच ट्रुडो सरकारची आजवरची भूमिका. पण, आता कॅनडामधील विरोधी पक्षनेते आणि लोकप्रतिनिधींच खलिस्तानींना पाठीशी घालणार्या ट्रुडो यांना खडे बोल सुनावले आहेत.
( Randhir Jaiswal )भारताने कॅनडाला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांना अटक करण्याची विनंती केली होती. मात्र, कॅनडाने त्याकडे दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही; अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारला सुनावले आहे.
खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या मृत्यूमुळे भारता आणि कॅनडा या देशांमधील तणाव वाढत असताना, या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. कॅनडाचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस यांच्या मते निज्जर याची हत्या रिपुदमन सिंग मलिक याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी झाली होती.
निवडणुकीत विजयासाठी शीख समुदायाची मते मिळविण्यासाठी, कॅनडातील खलिस्तानवाद्यांची पाठराखण करण्याच्या आणि भारतावर पुराव्याशिवाय आरोप करण्याच्या धोरणामुळे, या दोन देशांतील संबंध जवळपास संपुष्टात आले आहेत. भारताने कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकार्यांना देश सोडून जाण्याचे आदेश दिल्याने कॅनडाची नाचक्कीही होत आहे.
India-Canada row : भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांतील तणाव वाढण्याचं कारण काय? भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा भारतात का परतले? नेमकं काय घडलं जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून...
(India-Canada Diplomatic Row)हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे पुन्हा भारतावर बिनबुडाचे आरोप करत, भारताच्या कॅनडामधील राजदूतांना त्यात गोवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भारताने कॅनडातील उच्चायुक्त आणि सर्व अधिकार्यांना पुन्हा मायदेशी बोलावले आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण तयार झाल्याचे दिसून आले आहे. भारताने कॅनडामधील राजदूतांना आणि उच्चपदस्थ अधिकारी यांना मायदेशी बोलवण्यात आले आहे.
Bangladeshi Hindu बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून गंभीर परिस्थिती निर्माण झाली. बांगलादेशी आंदोलकांनी शेख हसीनांचे सरकार पाडण्यास भाग पाडले होते. त्यानंतर बांगलादेशी कट्टरपंथींनी हिंदूंवर अन्याय, अत्याचार केले. बांगलादेशातील हिंदू देव देवतांचे मंदिर, पाडण्यात आले. हिंदूंच्या घरांवर हल्ले करण्यात आले. हिंदू महिला, तरूणींवर बलात्कार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात १० ऑगस्ट रोजी कॅनडात मोर्चा काढून बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणावर प्रश्न उपस्थित केला
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडाच्या लिबरल पक्षाचे खासदार चंद्रा आर्य यांना धमकावण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. चंद्र आर्य यांनी कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरून खलिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध केला होता, तेव्हा गुरपतवंत सिंग पन्नूने त्यांना कॅनडाचे नागरिकत्व सोडून भारतात परतण्यास सांगितले होते. पन्नूने देश सोडण्याची धमकी दिल्यानंतर खासदार आर्य यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
युरोप, आखाती देश आणि अनेक प्रगत देशांना कामगारांची मोठी कमतरता जाणवते. त्यामुळे या देशांमध्ये भारतातील कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. मात्र, या देशांमध्ये बरेचदा कामगारांचे शोषण होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे प्रकार थांबवण्याकरिता सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, यामध्ये सरकारी यंत्रणांनी पूर्णपणे लक्ष घालून, परदेशातील भारतीय कामगारांचे शोषण हे थांबवलेच पाहिजे.
कॅनडामध्ये खलिस्तानी मुद्द्यावरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. खलिस्तान्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल ३३१ जणांचा मृत्यू झाला होता.
कॅनडा सरकारचा दुटप्पी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. एकीकडे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो जी-७ दरम्यान पंतप्रधान मोदींना भेटून दोन्ही देशांमधील सहकार्याबाबत बोलतात, तर दुसरीकडे खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत त्यांचा दृष्टिकोन बदलताना दिसत नाही. वर्षभरापूर्वी कॅनडात मारला गेलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याला कॅनडाच्या संसदेत केवळ श्रद्धांजलीच वाहण्यात आली नाही, तर त्याच्या स्मरणार्थ २ मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.
निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याला कॅनडाच्या संसदेत श्रद्धांजली वाहिली जाते, त्याच्या स्मरणार्थ मौनही पाळले जाते, हे सर्वस्वी धक्कादायकच! कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारताशी नव्याने संबंध प्रस्थापित करण्याची गरज इटलीत व्यक्त करतात आणि मायदेशी परतल्यानंतर त्याविरोधात भूमिका घेतात. यातूनच कॅनडाचा दुटप्पीपणाच अधोरेखित होतो.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दि. १५ जून २०२४ रोजी भारतासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. इटलीतील जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे, जून २०२३ मध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरला कॅनडाच्या भूमीवर ठार केल्याचा आरोप ट्रुडो यांनी भारतावर केल्याने दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधात तणाव निर्माण झाला होता.
कॅनडामधील खालिस्तानी समर्थकांची भारताच्या विरोधात पुन्हा एकदा आगळीक केली आहे. कॅनडाच्या सरकारने देखील भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतविरोधी घटकांना मोकळीक दिली आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या ४० वर्षांच्या निमित्ताने कॅनडात खलिस्तान समर्थकांनी निदर्शने केली. या वेळी, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे महिमामंडन करणारी झांकी काढण्यात आली होती.