नवी दिल्ली: "भारतातले कायदे मोडून आमच्या देशात पळून आलेल्यांना आमच्या देशात आम्ही थारा देणार नाही" अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भूमिका स्पष्ट करून ब्रिटन विजय मल्ल्या आणि निरव मोदी यांच्या प्रत्यार्पणास तयार असल्याचे सांगितले. या सर्व प्रक्रियांमध्ये काही कायदेशीर अडचणी येत आहेत लवकरच त्या दूर करून या दोघांना भारतात पाठवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे २ दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. या प्रसंगी पत्रकांशी बोलत असताना त्यांना विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्याबद्दल विचारले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. या दौऱ्यातून ब्रिटन आणि भारत यांच्यातील संबंध अजून दृढ झाल्याचेही जॉन्सन यांनी यावेळी सांगितले.