भारतीय सैन्याचे 'ऑपरेशन शिवशक्ती'! जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

    30-Jul-2025   
Total Views | 12



श्रीनगर : (Two Terrorists Killed In Operation Shivshakti) जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न भारतीय सैन्याने उधळून लावला. सीमेपलीकडून भारतात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा बुधवारी ३० जुलैला पहाटे केलेल्या कारवाईत खात्मा करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस सुरु असताना अंधाराचा फायदा घेत काही दहशतवादी नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न करत होते, तेव्हा संशयास्पद हालचाली पाहिल्याने उपस्थित असलेल्या लष्कराच्या जवानांनी कारवाई सुरू केली आणि दोन दहशतवाद्यांना ठार केले. 'ऑपरेशन महादेव' नंतर सुरू झालेल्या या कारवाईला सैन्याने 'ऑपरेशन शिवशक्ती' असे नाव दिले आहे. लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर कारवाईसंदर्भात माहिती दिली. तसेच तीन शस्त्रे देखील जप्त करण्यात आल्याचे सांगितले.

नेमकं काय घडलं?

बुधवारी सकाळी, पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली आढळताच, भारतीय सैनिकांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात केली.घुसखोरीची माहिती मिळताच, जोरदार गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले. लष्कराने सांगितले की, गुप्तचर संस्था आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये वेळेवर मिळालेल्या अचूक माहितीसह ही कारवाई करण्यात आली. सध्या, परिसरात सखोल शोध मोहीम सुरू आहे, जेणेकरून जवळपास दुसरा कोणताही दहशतवादी लपलेला नाही याची खात्री करता येईल.



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121