नवी दिल्ली : कट्टरपंथी खलिस्तांनीना आळा घालण्यासाठी भारताच्या आवाहनावर ब्रिटनने मोठे पाऊल उचलले आहे. ब्रिटन सरकारने खलिस्तान समर्थक कट्टरवाद्यांशी सामना करण्यासाठी नवीन निधीची घोषणा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारत आणि ब्रिटन कट्टरतावादाशी लढण्यासाठी संयुक्त कार्य दलाच्या स्थापनेसाठी आधीच काम करत आहेत. भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांनी ही माहिती दिली.
भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त म्हणाले की 'भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि ब्रिटनचे संरक्षण मंत्री टुगेनहाट यांच्यात झालेल्या बैठकीत, टुगेनहाटने नवीन निधीची घोषणा केली आहे, ज्यामुळे खलिस्तान समर्थक अतिरेक्यांना सामोरे जाण्यासाठी ब्रिटनची क्षमता वाढेल. ९५ हजार पौंड (सुमारे एक कोटी रुपये) ची गुंतवणूक करून यूके सरकार खलिस्तान समर्थक अतिरेकी कार्यवाहीला आळा घालतील. ब्रिटीश उच्चायुक्त म्हणाले की, भारत आणि ब्रिटनमध्ये जॉइंट रॅडिकलायझेशन टास्क फोर्स स्थापन करण्याची प्रक्रिया आधीच सुरू आहे.
ब्रिटनचे संरक्षण मंत्री टुगेनहाट दि. १० ऑगस्ट रोजी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत ब्रिटनसमोर सातत्याने खलिस्तानी अतिरेकीपणाचा मुद्दा मांडत होता. किंबहुना अलीकडच्या काळात ब्रिटनमध्ये खलिस्तानी कट्टरतावाद झपाट्याने उदयास आला आहे. ब्रिटनमध्ये खलिस्तानी अतिरेक्यांच्या कारवाया वाढत असल्याची भारताला चिंता आहे. भारताच्या चिंतेमध्ये, यूके सरकारने निधीची घोषणा केली आहे. टुगेनहाट म्हणाले की, 'जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही म्हणून, जगाला अधिक सुरक्षित आणि समृद्ध स्थान बनवण्यासाठी आमच्याकडे अनेक सामायिक संधी आहेत.'
तसेच ब्रिटनचे संरक्षण मंत्री म्हणाले की, 'दोन्ही देशांमध्ये सखोल संबंध आहे आणि दोन्ही देश सुरक्षा आव्हानांना अधिक चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतात. अतिरेकाविरुद्ध आमची क्षमता वाढवण्यासाठी एकत्र काम करण्याचा आमचा निर्धार आहे. टुगेनहाट यांना कोलकाता येथे होणार्या G20 भ्रष्टाचारविरोधी मंत्रिस्तरीय परिषदेलाही उपस्थित राहायचे आहे. यावर टुगेनहाट म्हणाले की, 'भ्रष्टाचार हा आपल्या समृद्धीसाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक आहे. मी या मुद्द्यावर भारतात होणाऱ्या G20 बैठकीत सहभागी होण्यास उत्सुक आहे. टुगेनहाट सीबीआय मुख्यालयालाही भेट देतील आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेती, अशी माहिती आहे.