उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सुनावले खडेबोल शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांचेच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे, शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी असून, आमचे सरकार ती पार पाडेलच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.
Read More
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकाच छताखाली उपलब्ध राहून, नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्याच्या हेतूने थेट प्रशासकीय मदत मिळवून देणारा जनता दरबार आयोजित करून कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या या जनता दरबारात महाराष्ट्रातील सुमारे 500 नागरिकांनी आपले प्रश्न मांडले.
( Shahapur residents water problem ) शहापूर तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावपाड्यांमध्ये नागरिक पाण्याविना तहानले आहेत. ‘धरण उशाला, पण कोरड घशाला’ अशी अवस्था सध्या शहापूरवासीयांची झाली आहे. शहापूर तालुका जरी मुंबई आणि ठाणे या महानगरांना पाणीपुरवठा करणारा मुख्य स्रोत असला, तरी इथल्या शेतकर्यांना मात्र सिंचनासाठी पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे.
विद्यार्थिनी असो, नोकरदार महिला अथवा गृहिणी, त्यांच्या आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, वाढत्या ताणतणावामुळे आणि आहार-विहाराकडे केलेल्या दुर्लक्षामुळे, महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या प्रकर्षाने दिसून येतात. तेव्हा, या समस्यांचे स्वरुप, लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
आज होळीचा सण! त्यामुळे आता रंग, पिचकारी अशा विविध साधनांनी बाजारपेठ सजली आहे. मात्र, दिवसेंदिवस हा सण पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करूनच साजरा केला जात आहे. त्यामध्ये होळीसाठीची सामग्री असो किंवा रंगपंचमीचे रंग असो. हे सारे काही पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात कोणतीही कमतरता न ठेवता कसे साजरे करायचे याचा घेतलेला आढावा...
गेल्या काही वर्षांत झपाट्याने शहरीकरणात वाढ झाल्याने, अनेक नागरिकांनी रोजगारासाठी शहराची वाट धरली. त्यातून जसा लाभ झाला, तसे काही तोटेही झाले. वाहतुकीची समस्या ही त्यापैकीच एक! पुण्यासारख्या शहरात ही समस्या आता उग्र होऊ लागली आहे. पुण्यातील वाहतूक समस्यांवर अधिकाधिक झोत टाकून, येथील सर्वच प्रकारच्या माध्यमांनी प्रशासनाला जेरीस आणले आहे. ‘पीएमपी’ची अवस्था अतिशय वाईट आणि प्रवाशांना त्रास होईल, अशी असल्याचे गेल्या वर्षभरापासून दिसत आहे.
( Devendra Fadanvis on stuck housing problem of 28,000 Munbai sweepers ) मुंबईतील २८ हजार सफाई कामगारांच्या रखडलेल्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी गुरुवारी माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांना दिले.
आज अन्नाची होणारी नासाडी ही फार मोठी समस्या आहे. देशासमोरील उपासमारीच्या समस्येवर अन्नाची नासाडी थांबवणे हा सुद्धा एक पर्याय आहे. यासाठीच संतजनांनी सुद्धा अन्नाच्या ब्रह्मशक्तीची आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव वेळोवेळी करून दिली. तीच जाणीव नव्या रुपात करून देण्यार्या आणि गरजुंची क्षुधातृप्ती करणार्या रेस्टोरेंट क्रिकेट लीगविषयी...
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाची मोठी समस्या आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून हे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत.
गोराईतील अनेक भागात पासाळ्याच्या दिवसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांना ही वाहतूकीला त्रास होतो. रात्रीच्या वेळी अंधारामुळे खड्डे न दिसल्यास भीषण अपघाताची ही भीती असते. अशावेळी शिंपोली रिलायंस मॉल ,गौतम नगर वीर सावरकर गार्डन शेजारील रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक निखळून खड्डे पडले आहेत.
‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती वापरत जगभरातील अनेक देशांवर ब्रिटनने राज्य केले. धर्मनिरपेक्षतेसारख्या गोंडस विचारांना जन्म देणारा ब्रिटनच. मात्र, या शब्दाची किंमत ब्रिटनला आता हिंसाचाराच्या घटनांच्या स्वरूपात मोजावी लागत आहे. ब्रिटन मागील काही वर्षांपासून धार्मिक हिंसाचाराच्या गर्तेत आहे. ब्रिटनमधील शरणार्थी मुस्लिमांमुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, वारंवार उफाळून येणार्या दंगलींमुळे ब्रिटनमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळते. ब्रिटनच्या लीड्स शहरात दि. १८ जुलै रोजी दोन हजारांहून अधिक दंगेखोरांनी सरकारी बसेसची
डंपिंग ग्राऊंडच्या अभावामुळे गेले काही दिवस ठाणे शहराची कचराकोंडी झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, आता लवकरच ठाण्याच्या कचरानिर्मूलनाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हं दिसत आहेत. भिवंडी, पडघानजीक शासनाच्या मालकीची असलेली 85 एकर जमीन डम्पिंगसाठी देण्याच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, लवकरच या जमिनीचे सर्व्हेक्षण, मोजणी करून प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध परवानग्या मिळताच ठाण्याची डम्पिंगची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
कचरा संकलन केंद्रावर रांगा लावाव्या लागत असल्याने घंटागाडीवरील वाहन चालक आणि सफाई कामगारांना दररोज तीन तास अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्या कामाचा मोबदला दिला जात नाही
बार्टी संस्थेमार्फत "द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ; इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन" या शोध प्रबंधसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स" यांनी प्रदान केलेल्या "डॉक्टर ऑफ सायन्स" या पदवीच्या शतकपूर्ती निमित्त श्री सुनील वारे, महासंचालक बार्टी यांचे मार्गदर्शनाने बार्टी संस्थेतर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईतील महिलांच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने एक नवा पर्याय आणण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीर अर्थात सरकार आपल्या दारी या उपक्रमाला सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे. महिलांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी राज्य सरकारकडून मोबाईल व्हॅन सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोबाईल व्हॅनचा उदघाटन सोहळा सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला.
मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण करुन महामानवास अभिवादन केले.
भारत संचार निगर लिमिटेड अर्थात बीएसएनएल . केंद्र सरकारचा उपक्रमाचे पुनरुज्जीवन, सुधारणा आणि सेवाविस्तार यासाठी केंद्र सरकारने १ लाख ६४ हजार १६४ कोटी रुपयांचा विशेष पॅकेजला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत पुरस्कार मिळवल्याचा बडेजाव केला जात आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरातील कचर्याचे ढीग पाहता महानगरपालिका प्रशासन खरोखर शहरातील स्वच्छतेसाठी काम करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत, पुढील दहा दिवसांत कचर्याची समस्या न सोडविल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे कल्याण पश्चिमचे माजी आमदार व भाजप भटके विमुक्त आघाडीचे संयोजक नरेंद्र पवार यांनी महागनरपालिका आयुक्तांना पत्र लिहून दिला आहे.
तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कुडूस नाक्यावरील भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीसह अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे.
श्रीलंकेच्या कृषिमंत्र्यांनी शुक्रवारी नागरिकांना त्यांच्या घरातील बागांमध्ये अन्नधान्य पिकवण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १८ वी बैठक आज पार पडली. यावेळी बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्ग मधील वन्यहत्ती समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यात अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले.
पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर इमरान खान आणि त्यांचे समर्थक रस्त्यांवर उतरले असून, सरकारच्या भाववाढीविरुद्ध हिंसक आंदोलनं करत आहेत.
जगात जेव्हा म्हणून कधी युद्धजन्य परिस्थिती उद्भवते तेव्हा आर्थिक आणि अन्नधान्यविषयक समस्या डोके वर काढत असतात. आज जग रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या गडद छायेतून मार्गस्थ होत आहे.
मुंबईच्या ‘चिता कॅम्प’ परिसरातील नागरिकांना मागील २० ते २५ वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रभागातील अस्वच्छतेसोबतच इतर मुद्द्यांमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मात्र, सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ‘चिता कॅम्प’ परिसरातील एकमेव अशा शहाजी नगर प्रसूतिगृहाची अवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. ‘चिता कॅम्प’ भागातील नागरिकांनी आणि महिलांनी प्रभागातील प्रसूतिगृहाच्या समस्येवर नुकताच दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला.
ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान जलद रेल्वेमार्गातील खडी खचल्याने बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाला. यामुळे,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडुन ठाणे स्थानकात येणाऱ्या जलद लोकल मेल एक्सप्रेसचा खोळंबा झाला.
डोंबिवलीतील 27 गावांतील भोपरगाव गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईने त्रस्त आहेत. याठिकाणाच्या अमृतयोजना रखडल्याने आणि एमआयडीसीमधील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाली आहे. त्यावर प्रेशर वाढविले की पाईपलाईन फुटते त्यामुळे नागरिकांना पाणी येत नाही. दिवाळीला नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता त्यांना टॅकरने स्वखर्चाने पाणी देणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याने, तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणातहृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले. वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाला का आला हृदयविकाराचा झटका का आला? या मागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीयांमध्ये हृदयविकाराचा झटका जगाच्या तुलनेत ८-१० वर्षांपूर्वी येतो.
अफगाणिस्तानच्या समस्येचा सामना करण्यास भारत सज्ज - बिपिन रावत
मुंबई : कलिना येथील कोलिवेरी व्हिलेजमधील गेले अनेक वर्षे नागरिक पाणीबाणीने त्रस्त आहेत. याठिकाणी दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नाही. पाण्याबरोबरच या परिसरात ड्रेनेज समस्यादेखील मोठी आहे. अपुरा पाणीपुरवठा, कचरा, ड्रेनेज व्यवस्थेचा उडालेला बोजवारा यामुळे कोलिवेरी व्हिलेज सध्या समस्येचे आगार बनले आहे. नगरसेवकांकडून निवडणुकीपुरताच पाणी समस्येचा मुद्दा विचारत घेतला जातो, असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
भारताने काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रद्द केल्यावर भारताविषयी असलेली अमेरिकेची भूमिका ही सर्वांनीच त्या वेळी पाहिली आणि अनुभवलीदेखील. भारताच्या अंतर्गत प्रश्नाबाबत गेल्या काही महिन्यांपासून असणारी भूमिका आता अमेरिकेने स्पष्ट केली आहे.
मुंबईत मे व जून महिन्यातील पाणीकपात टाळण्यासाठी मनोरी येथे समुद्राचे दोनशे एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 'वर्षा' निवासस्थानी दोनशे एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीबाबत याबद्दल बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,
सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार, पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसे चालेल?
गर्भावस्थेचे ९ महिने (४२ आठवडे) पूर्ण झाल्यानंतरही लांबलेली गर्भावस्था किंवा प्रसुतीच्या अंदाजित तारखेला १४ दिवस उलटून जाणे अशी ‘पोस्ट-टर्म प्रेग्नन्सी’ची व्याख्या केली जाते. सर्वसाधारणपणे होणार्या मातेने गर्भावस्थेचे ३७ आठवडे पूर्ण केल्यास आम्ही त्याला ‘टर्म प्रेग्नन्सी’ किंवा ‘पूर्ण दिवसांची गर्भावस्था’ असे म्हणतो. तेव्हा, यामागची कारणे, उद्भवणार्या समस्या आणि या समस्येचे निदान याविषयी आजच्या लेखातून सविस्तर जाणून घेऊया...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील विविध कार्यालयांमधील कर्मचार्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे संपूर्ण विभागात, 20 ते 22 नोव्हेंबर या काळात समस्या निवारण शिबीर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये विभागातील कर्मचार्यांनी समस्यांबाबत चार हजार अर्ज सादर केले.
काही शतकांपूर्वी ज्या आरोग्याच्या समस्या माणसाला भेडसावत होत्या, त्या समस्यांचे आज काय झाले? याचा मागोवा घेतला तर जाणवते की, कधीकाळी जागतिक स्तरावर जे रोग माणसाचा जीव घेतल्याशिवाय राहात नसत, ते रोग आज हद्दपार झाले आहेत. देवी, पोलिओ वगैरेंचा नायनाट झाला आहे. आरोग्यविषयक अज्ञान, निसर्गाविषयीचे भीतीयुक्त अज्ञान आणि दैनंदिन जगण्यासाठीचा संघर्ष यामुळे माणूस या ना त्या कारणाने प्रत्येक शतकात कोणत्या ना कोणत्या विशिष्ट आजाराचा बळी ठरला आहे.
गेल्याच आठवड्यात झालेल्या विमानाचे प्रकरण ताजे असताना रविवारी अजून एक विमान अपघात टळला. जेट एअरवेजच्या विमानाचे इंजिनच बंद पडल्याचा प्रकार घडला.
अमेरिका म्हणजे स्वच्छ आरसा, अशी धारणा जे नागरिक बाळगतात, त्यांनी त्याची दुसरी बाजू समजून घेऊन स्वदेशाभिमान जोपासण्याची आवश्यकता आहे.
काही लोक तापदायक परिस्थितीने खच्चून जातात, तर काहीजण आपण जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही, असा ग्रह करून घेतात. याच्या अगदी उलट यशस्वी माणसे अवघड अनुभवांतून संधी शोधू लागतात. त्यांना कठीण परिस्थिती ही कोडं आहे व ते सोडवायचे आहे असे वाटते.
नवी दिल्ली... देशाची राजधानी आणि राजकीय घडामोडींचे केंद्र. पण, सध्या याच दिल्लीला कचऱ्याच्या भीषण समस्येने ग्रासले आहे.
आपल्या मुलांच्या वर्तनाबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, शास्त्रीय चाचण्यांच्या आधारे त्याचे निदान करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यपणे, अतिचंचलतेच्या लक्षणांमध्ये वयाबरोबर सुधारणा होत जाते.
नोकरीचे आमिष दाखवून तरुण-तरुणींना परदेशात पाठवून तिथे त्यांना गंडवणे, हादेखील मानवी तस्करीचाच एक प्रकार आहे.
गाळ्यांचा प्रश्न आधी हाती घेवून तो निवडणुकीपूर्वी मार्गी लावणार असल्याची माहिती मनपाचे नवीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सोमवारी, २८ रोजी दिली.
Bhusawal, Water Problem, Vivekanand Nagar Area
रेल्वे स्थानक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरटे, भामट्यांच्या वाढत्या दहशतीने डोकेवर काढल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.
जागतिक तापमान वाढीबद्दल सगळ्यांनाच वरवर कल्पना आहे. मात्र आजच्या परिस्थितीचा विचार केला असता पृथ्वीवरील प्रत्येक सामान्य माणसाने या जागतिक तापमान वाढीबद्दल जागरूक असणे ही काळाची गरच झाली आहे.
अंधेरी पश्चिमेला श्यामनगर झोपडपट्टी असून येथील रहिवाशांना पालिका प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे रस्ता, पाणी टंचाई, शौचालयाची कमतरता आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
राज्य शासन आता यापुढे कोणत्याही नगरपालिका क्षेत्रासाठी डंपिंग ग्राऊंड देणार नाही. त्यामुळे कचरा समस्येचे निर्मुलन करणे काळाची गरज आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे.
शहरातील मेहरूण तलावाचे सुशोभिकरण करून त्याला जिल्ह्यातील एक मोठे पर्यटनस्थळ करण्याचा महापालिका प्रशासनाचा मनोदय होता.
भाजपचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसेंना जळगावकर डॉक्टरचे खुले पत्र