पोस्ट-टर्म प्रेग्नन्सी कारणे आणि धोके

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |

page 8_1  H x W



गर्भावस्थेचे महिने (४२ आठवडे) पूर्ण झाल्यानंतरही लांबलेली गर्भावस्था किंवा प्रसुतीच्या अंदाजित तारखेला १४ दिवस उलटून जाणे अशीपोस्ट-टर्म प्रेग्नन्सीची व्याख्या केली जाते. सर्वसाधारणपणे होणार्‍या मातेने गर्भावस्थेचे ३७ आठवडे पूर्ण केल्यास आम्ही त्यालाटर्म प्रेग्नन्सीकिंवापूर्ण दिवसांची गर्भावस्थाअसे म्हणतो. तेव्हा, यामागची कारणे, उद्भवणार्‍या समस्या आणि या समस्येचे निदान याविषयी आजच्या लेखातून सविस्तर जाणून घेऊया...


कारणे

लांबलेल्या गर्भावस्थेचे सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारे कारण म्हणजे प्रसुतीच्या तारखेचा अंदाज बांधण्यात झालेली चूक. त्यामुळे एखाद्या महिलेची गर्भावस्थापोस्टडेट्सच्या टप्प्यावर पोहोचल्याचे म्हणजे ४० आठवड्यांच्या पुढे गेल्याचा संशय आल्यास पहिल्यांदा तिची शेवटची पाळी नेमकी कोणत्या तारखेला आली होती हे तपासायला हवे. गर्भावस्था लांबण्याचे कारण हे बरेचदा अज्ञात असते. अशा अवस्थेशी निगडित धोक्यांची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात - पहिलीच गर्भधारणा असल्यास, यापूर्वी गर्भावस्था लांबलेली असल्यास, पोटात पुरुषभ्रूण वाढत असल्यास, होणार्‍या मातेस लठ्ठपणाची समस्या असल्यास. याखेरीज हार्मोन्समुळे किंवा अनुवांशिक कारणांमुळेही असे घडू शकते.


गुंतागुंती
आणि धोके

  • ४२ आठवड्यांच्या गर्भावधीनंतरही गर्भावस्था सुरूच राहिल्यास काही धोके संभवतात, ज्यात माता बालक दोघांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.
  • जन्मत: मृत बालक (स्टिलबॉर्न) किंवा जन्मानंतर काही दिवसांनी किंवा लगेचच बाळाचा मृत्यू ओढवणे या गोष्टींचा धोका वाढतो. गर्भावस्थेच्या ४२व्या आठवड्यामध्ये या गोष्टीची शक्यता गर्भावस्था पूर्ण होण्याच्या सर्वसाधारण कालावधीच्या (३७ आठवडे) तुलनेत दुपटीने वाढते.
  • बाळाला गर्भाशयाच्या आत जंतूसंसर्ग (इंट्रायुटरीन इन्फेक्शन) होण्याचा धोका वाढतो.
  • बाळाला नाळेमधून पुरेसा रक्तपुरवठा होत नाही त्यामुळे बाळाला पुरेसा प्राणवायू पोहोचत नाही. असे झाल्यास बाळाची विष्ठा (मेकॉनियम) बाहेर पडून मातेच्या गर्भाशयातील अ‍ॅम्नियॉटिक द्रवामध्ये मिसळते. हे मॅकॉनियम श्वासावाटे फुप्फुसात शिरून बाळाला न्यूमोनिया होऊ शकतो.
  • प्राणघातक मॅक्रोसोमियाचा म्हणजे जन्मतेवेळी बाळाचा आकार मोठा असण्याचा (जन्मतानाचे वजन . कि.ग्रॅ) धोकाही असतो. प्रसुतीच्या वेळी अशा बाळांना इजा होऊ शकते किंवा मातेचा योनीमार्ग फाटला जाऊ शकतो किंवा प्रसुतीनंतर अतिरिक्त प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. प्रसुतीदरम्यान बाळाचा खांदा किंवा डोके अडकू शकते त्यामुळे प्रसुतीकाळ लांबू शकतो.

सुमारे २० टक्केपोस्ट-टर्मअर्भकांमध्येडिसमॅच्युरिटी सिंड्रोमदिसून येतो. याचा अर्थ ही बाळे शरीराने इन्ट्रायुटरीन ग्रोथ रिटार्डेशन’ (IUGR) म्हणजे गर्भाशयाच्या आत वाढीची गती मंद झालेल्या बाळांसारखी (नाळेवाटे पुरेसा रक्तपुरवठा झाल्यामुळे गर्भाशयाच्या आत असताना अकाली वाढ खुंटलेल्या बाळांप्रमाणे) दिसतात. यात सुरकुतलेली, पापुद्रे निघणारी त्वचा (अतिरिक्त डेसक्वामेशन), कृश अंगकाठी (कुपोषण), लांब केस आणि नखे, ऑलिगोहायड्रॅमनिओस (अ‍ॅम्निऑटिक द्रावाची कमतरता) आणि मॅकॉनियम बाहेर पडणे (बाळांची विष्ठा) अशा गोष्टींचा समावेश होतो. अशा प्रकारच्या गर्भावस्थेमध्ये ऑलिगॉहायड्रॅमनिओसमुळे नाळ दाबली जाण्याचा धोका अधिक मोठा असतो, तसेचनिओनॅटल डिप्रेशन’, ‘हायपोग्लायसेमिया’ (रक्तातील शर्करेची पातळी खालावणे), सीझर्स किंवा आकडी येणे आणि श्वसनक्रिया संपूर्ण क्षमतेने चालणे अशा नवजात बालकांमध्ये लगेचच दिसून येणार्‍या गुंतागुंतीही दिसून येतात. बाळाच्या मेंदूला दीर्घकाळासाठी दुखापत होण्याचा धोकाही वाढू शकतो.


समस्येचे व्यवस्थापन

  • पोस्ट-टर्म प्रेग्नन्सीचे निदान व्यवस्थापन करण्यासाठी गर्भ राहिल्याची नेमकी तारीख माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • गर्भावस्थेमध्ये सर्वसामान्यपणे केल्या जाणार्‍या अल्ट्रासाऊंड चाचण्या नियमितपणे केल्याने गर्भावस्था लांबल्याचे चुकीचे निदान केले जाण्याचे प्रमाण कमी होते.
  • गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीमध्ये केलेली सोनोग्राफी हा गर्भावस्था सुरू झाल्याची तारीख ठरविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
  • प्रसुतीकळांना चालना देणे हा प्रसुती लांबण्यास प्रतिबंध करण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे. गर्भावस्थेचा किती अवधी पूर्ण झाल्यानंतर हे करता येईल, यासंबंधी वेगवेगळ्या हॉस्पिटल्सचे वेगवेगळे नियम असतात. मात्र, सध्या उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांनुसार गर्भावस्था ४१ आठवड्यांवर लांबू देणे योग्य असून त्यानंतर कृत्रिमरित्या प्रसुतीकळांना चालना दिली पाहिजे. ३८-३९व्या आठवड्यानंतर धोके वाढत जातात ही गोष्ट इथे ध्यानात ठेवली पाहिजे. ३८-३९ आठवडे उलटल्यानंतरनॉन-स्ट्रेस टेस्टद्वारे (NST) ‘अ‍ॅण्टिनेटल फीटल सर्व्हिलन्सची गरज आहे का याची विचारणा आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञाकडे करायला हवी, जेणेकरून बाळाची वाढ निरोगीपणे होत असल्याची हमी मिळू शकेल.

अशा स्थितीमध्ये पाळावयाचा एक महत्त्वपूर्ण नियम म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे. ते नेहमीच अर्भक आणि माता या दोहोंच्याही सर्वाधिक हिताचा निर्णय घेण्याचाच प्रयत्न करतील, याची मनोमन खात्री बाळगणे.


- अस्मिता
महाजन
(लेखिका फोर्टिसची सहकारी संस्था असलेल्या एस. एल. रहेजा हॉस्पिटल, माहीम येथील सल्लागार निओनॅटोलॉजिस्ट पीडिअट्रिशियन आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@