नवी दिल्ली: श्रीलंकेच्या कृषिमंत्र्यांनी शुक्रवारी नागरिकांना त्यांच्या घरातील बागांमध्ये अन्नधान्य पिकवण्याचे आवाहन केले आहे. श्रीलंकेवर कर्जाचे संकट वाढतच चालले आहे. या देशाची लोकसंख्या २२ दशलक्ष आहे. श्रीलंकेच्या मुख्य शहरांमध्ये सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीमध्ये तीव्र तुटवडा जाणवला जात आहे. महागाईसुद्धा नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचली असून, लोकांचं जगणं कठीण झालेलं आहे. एप्रिलमध्ये जवळपास 30 टक्क्यांवरून, अन्नधान्य महागाई ४६.६ टक्क्यांवरून ५७.४ टक्क्यांवर पोहोचली आहे
“आम्ही लोकांना घरी शेती करण्यास प्रोत्साहित करत आहोत. सर्व प्रकारचे अन्नधान्य रताळे, बटाटे आणि चवळी; मिरची, वेलची आणि कढीपत्ता आणि फळे यासारखे मसाला लोकांनी घरी पिकवावे, " असे आवाहन कृषी मंत्री महिंदा अमरवीरा यांनी सांगितले. आतापर्यंत ३०,००० मेट्रिक टन तांदूळ आयात करण्यासाठी श्रीलंकेने भारताकडून मदत मागितली आहे. सर्व रासायनिक खतांवर बंदी घालण्यास राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी गेल्या वर्षी सांगितले होते. या कारणामुळे, देशात तांदूळ उत्पादनात घट झाली होती.