कुडूस नाक्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरू

दै. मुंबई तरुण भारत इम्पॅक्ट

    15-Jun-2022
Total Views | 70

vada
 
 
 
 
वाडा : तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कुडूस नाक्यावरील भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीसह अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. याच विषयाला वाचा फोडत दै. ‘मुंबई तरूण भारत’ने दि. १४ जूनच्या अंकात याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
 
 
 
या वृत्तामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून सदर वृत्ताची दखल घेत संबंधित विभागाने कुडूस नाक्यावरील भिवंडी-वाडा-मनोर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरू केले आहे. ‘कुडूस नाक्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण’ या मथळ्याखाली दै. ‘मुंबई तरुण भारत’ने बातमी प्रसिद्ध करून या समस्येला वाचा फोडली आणि अवघ्या एक दिवसात संबंधित विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
 
 
 
दरम्यान, कुडूस नाक्यावरील खराब रस्त्यावर प्रवास करणे जिकिरीचे होऊन बसले असून प्रशासन मात्र याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करत असल्याचा आरोप करत कुडूस विभाग शिक्षण सेवा संस्थेचे सचिव श्रीकांत भोईर यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. एकूणच, संबंधित विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन दुरूस्तीचे तातडीने काम सुरू केल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121