डोंबिवली : डोंबिवलीतील 27 गावांतील भोपरगाव गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईने त्रस्त आहेत. याठिकाणाच्या अमृतयोजना रखडल्याने आणि एमआयडीसीमधील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाली आहे. त्यावर प्रेशर वाढविले की पाईपलाईन फुटते त्यामुळे नागरिकांना पाणी येत नाही. दिवाळीला नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता त्यांना टॅकरने स्वखर्चाने पाणी देणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
भाजपाच्या माजी नगरसेविका रविना माळी यांनी डोंबिवली पूव्रेकडील भोपर गावातील टेकडीवर ‘आमदार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पाटील बोलत होते. भोपर गावात गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची समस्या आहे त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. ऐन दिवाळीत पाणी मिळत नसल्याने नागरिकांची गा:हाणी ऐकून घेण्यासाठी पाटील आले होते. यावेळी मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, भाजपाच्या माजी नगरसेविका रविना माळी, अमर माळी, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार पाटील म्हणाले, भोपरवासियांनी मला मते दिला त्यांचा राग येथील रहिवाश्यांवर काढला जात आहे. सत्ता त्यांच्या हातात आहे. ते माज करतील. आम्हाला त्रस देतील पण त्यांचे शब्द मला ही खावे लागतात. पण हे खूप दिवस चालणार नाही. मी केवळ श्रेय घ्यायला येणार नाही. इतर ही राजकारण करतात. नागरिकांनी त्यांना ही बोलावे. या गावात पाणी यायला हवे आहे. सत्ताधारी काम करतोय. आम्ही सत्तेत आहे. चांगले वाईट परिणाम सत्ताधा:यांचे असतात. चांगले काम होण्यासाठी आपण त्यांना टोचत असतो. ते काम विरोधक म्हणून मी काम करीत आहे. माङया हातात आहे ते सर्व प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी थोडा संयम ठेवावा असे ही त्यांनी सांगितले.रविना माळी म्हणाल्या, गेल्या पाच वर्षापासून प्रभागात पाणी कमी दाबाने येत आहे. स्थानिक आमदार राजू पाटील यांच्याकडे समस्या मांडल्या आहेत. अनेकदा भूमीपूजन झाल्या आहेत. पाच वर्षापूर्वी लाईन नव्हती. मी नगरसेविका झाल्यावर अमृतयोजनेची पाईपलाईन टाकली आहे. हे काम पूर्ण व्हायला दोन वर्ष जातील . उद्घाटन केले त्या लाईनला पाणी येते तिला पाणी येते पण ते कमी दाबाने येते. त्यामुळेच आज जास्त दाबाने पाणी यावे हा विषय आमदारांकडे मांडला आहे.
कोरोना काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. भाेपर गावात पाणी कमी दाबाने येत असल्याने टॅकरसाठी दररोज दोन हजार रूपये खच करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. 2018 मध्ये अमृत योजना गावात आली पण कोरोना, राजकारण आणि श्रे्यवाद यात या योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे आता राजकारण थांबवा आणि नागरिकांना पाणी द्या अशी मागणी नागरिक करीत आहेत.
भोपर गावात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आमदार पाटील पोलिसांशी ते बोलणार आहे. गावातील लोकांचा गट तयार करणार आहे. त्यामुळे पोलिस मित्रंच्या माध्यमातून परिसरात गस्त घातली जावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------