गाळ्यांचा प्रश्‍न मार्गी लावणार

    29-May-2018
Total Views | 18

आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी स्वीकारला पदभार

 
 
जळगाव, २८ मे :
गाळ्यांचा प्रश्‍न आधी हाती घेवून तो निवडणुकीपूर्वी मार्गी लावणार असल्याची माहिती मनपाचे नवीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सोमवारी, २८ रोजी दिली. मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार त्यांनी सोमवारी स्वीकारला. ते पत्रकारांशी बोलत होते. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त डांगे यांनी सकाळी मनपातील सर्व विभाग प्रमुखांची साडे अकरा वाजता बैठक घेतली. बैठकीत आयुक्तांनी विभाग प्रमुखांची ओळख तसेच कामांचा आढावा जाणून घेतला.
 
 
डांगेे म्हणाले की, मनपाची आर्थिक स्थिती वाईट असून हुडको, नागरिकांना मुलभूत सुविधा न मिळणे, रस्ते, गटारी या समस्या, कर्मचार्‍यांचे पगार वेळेत न होणे, सेवानिवृत्त धारकांना पेन्शन न मिळणे ही समस्या निर्माण झाली आहे. गाळे प्रश्‍न सुटल्यास मनपा हजार कोटींच्यावर रक्कम मिळू शकते. त्यामुळे गाळे प्रश्‍न हा निवडणुकीपुर्वीच आधी सोडविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपाच्या हिताचे प्रश्‍न प्रलंबित
मनपात आतापर्यंत राजकीय दबावातून मनपाच्या हिताचे प्रश्‍न प्रलंबित आहे. ते राजकीय दबावात न येता मार्गी लावावे, असे नगरसेवकांनी आयुक्तांना सांगितले. त्यावर आयुक्तांनी सर्व म्हणूनच सर्व प्रश्‍न मार्गी लावण्यासाठीच शासनाने नियुक्ती केली आहे.
 
 
भाजपच्या नगरसेवकांनी वाचला तक्रारींचा पाढा
पदभार स्वीकारल्यानंतर भाजपतर्फे विरोधी पक्षनेते वामनदादा खडके, गटनेते सुनील माळी, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र पाटील, अनिल देशमुख, नगरसेविका ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, जयश्री पाटील आदींनी आयुक्तांना शुभेच्छा दिल्या. भेटी दरम्यान चर्चा करतांना भाजप नगरसेवकांनी, गाळे प्रश्‍न, हुडको, घरकुल-मोफत बससेवाची वसुली तसेच मनपाचे खुले भुखंड ताब्यात घेण्याची, कर्मचार्‍यांचे पगार, निवृत्त कर्मचार्‍यांचे पेंशन मिळत नसल्याबाबत तक्रारींचा पाढा आयुक्तांना वाचून दाखविला.
 
 
महासभेत कोट्यवधींची कामे मार्गी लावणार
मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकास कामांसाठी दिलेल्या २५ कोटींपैकी १८ कोटीचे कामे मंजूर झाले आहे. येत्या महासभेत ठराव करून लवकरच कामांना सुरवात केली जाईल. मनपा आयुक्ताचा पदभार चंद्रकांत डांगे यांनी घेतल्यावर महापौर ललित कोल्हे यांनी त्यांच्या दालनात जावून स्वागत केले. यावेळी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, चंद्रकांत खोसे यांच्यासह खाविआचे गटनेते सुनील महाजन, माजी स्थायी समिती सभापती नितीन बरडे, नगरसेवक श्यामकांत सोनवणे, अनंत जोशी, प्रमोद नाईक आदी उपस्थित होते.
प्रभाग रचनेत घोळ
मनपातील विविध समस्या, तसेच अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी भाजप नगरसेवकांनी नवीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे भेटी दरम्यान आग्रह धरला. तसेच प्रभाग रचनेत घोळ झाला असून आता नवीन प्रारुप मतदार यादीत घोळ होण्याची शक्यता आहे. तो होवू नये त्याची दक्षता घ्यावी, अशा आशयाचे निवेदनही भाजपातर्फे आयुक्तांना देण्यात आले.
 
विकास कामे झिरो
शहरात गेल्या साडेचार वर्षात विकास कामे शुन्य झालेले आहे. घरकुल, बससेवा आदी योजनांमधील घोटाळ्यामुळे मनपावर कर्जाचा बोझा वाढत आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नाही. मनपाचे हिताचे प्रश्‍न राजकीय दबावामुळे आतापर्यंत सुटलेले नाही.
 
 
मोफत बससेवा, घरकुलमुळे मनपावर कर्ज
घरकुल व मोफत बससेवेमुळे मनपावर कर्जाचा डोंगर झाला आहे. आजी-माजी नगरसेवकांकडून घोटाळ्यातील रक्कमची वसुली अद्याप झालेली नाही. तसेच गुन्हा देखील केले गेले नाही. मनपा मालकीचे ३९६ खुले भुखंड दिले असून तिथे व्यवसाय व गैरवापर होत आहे. त्यामुळे मनपाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121