महिलांच्या न्यायासाठी राज्य सरकारने महिला आयोग आपल्या दारी हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. मंगळवार, १५ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा तीन दिवसांचा पुणे जिल्हा दौरा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमा अंतर्गत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेण्यात आली.
Read More
Ekal Mahila Sanghatana स्वत:च्या समस्यांपासून सुटका झाल्यानंतर, त्यातूनच प्रेरणा घेत इतरांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. मराठवाड्यातील एकल महिला संघटनेशी जोडलेल्या असंख्य महिला, आज हेच कार्य करत आहेत. यामध्ये आशालता पांडे यांचे कार्य लाखमोलाचे. आशालता यांच्या माध्यमातून एकल महिला संघटनेच्या कार्याचा घेतलेला आढावा...
आजची पिढी ही मोबाईलच्या युगात वावरणारी. तेव्हा, हिंदू धर्मातील सण, संस्कृती आणि परंपरा यांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या हेमा नरेंद्र पवार कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी...
लेखक, कवी किरण येले यांनी ’बाईच्या कविता’ या आपल्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून स्त्रीच्या संवेदनशीलतेचा एक अनोखा पट वाचकांसमोर उभा केला. एक दशकापेक्षा अधिकचा काळ उलटून गेल्यानंतर आता ’बाईच्या कविता’चा पुढचा भाग ’बाई बाई गोष्ट सांग’ अर्थात ‘बाईच्या कविता २’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. आज ‘जागतिक महिला दिना’निमित्त बाईच्या कविता लिहिणार्या या अनोख्या पुरूषाची गोष्ट...
स्वारगेट अत्याचार प्रकरणी पुण्यातील महिला जागर समिती आक्रमक झाली असून बसस्थानकात तिरडी आंदोलन करण्यात येत आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या महिलांकडून करण्यात आली आहे.
संघर्ष होताच पण, त्या संघर्षावर मात करत, स्वतःसोबत समाजाच्या उन्नतीसाठीही कार्यरत ‘आनंदी महिला समूहा’च्या अध्यक्षा गौरी पिंगळे यांच्याविषयी...
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) ( AAP ) प्रस्तावित कल्याणकारी योजना 'महिला सन्मान योजना' साठी नोंदणीच्या नावाखाली "गैर-सरकारी" लोक दिल्लीतील रहिवाशांची वैयक्तिक माहिती गोळा करत असल्याच्या आरोपाची चौकशी दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी सुरू केली आहे.
(AAP) दिल्लीतील आप सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. दिल्ली सरकारने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देत या योजना अद्याप अधिसूचित नाही, त्यामुळे कोणालाही आपली कागदपत्रे देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. तसेच दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागानेही यासंदर्भात सूचनापत्र जारी केले आहे.
(Arvind Kejriwal) दिल्लीतील केजरीवाल सरकार सध्या योजनांच्या अफवांमुळे चर्चेत आले आहे. एकीकडे कुठलीही योजना लागू नाही, कोणालाही कागदपत्रं दिल्यास फसवणूक होईल अश्या आशयाचे परिपत्रक काढायचे, वृत्तपत्रात जाहिराती द्यायच्या आणि दुसरीकडे पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर योजनांचा प्रचार करायचा, असे आप सरकार (AAP Government) चे दुटप्पीपणाचे धोरण सध्या सुरु आहे.
(Delhi) येत्या नव्या वर्षात दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मोठ्या विकासयोजनांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर त्याच धर्तीवर राजधानी दिल्लीतील केजरीवाल सरकारने 'महिला सम्मान योजने'ची घोषणा केली आहे. या योजनेतंर्गत महिलांना दरमहा १,००० रुपये मिळणार आहे.
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणार्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (जदयु) सर्वेसर्वा नितीश कुमार ( Nitish Kumar ) सज्ज झाले आहेत. ते राज्यातील मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी लवकरच राज्यव्यापी यात्रा काढणार आहेत.
(Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024)पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना आयडी कार्ड, प्रमाणपत्र, स्किल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अमरावती येथील पीएम मित्र पार्कचे ई-भूमिपूजन, १००० आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभ देखील याप्रसंगी करण्यात आला. यावेळी राज्यपाल डॉ. सी. पी.
‘अहिल्या महिला मंडळ’ ही संस्था गेली २७ वर्ष ’स्वयंसेवेतून समाज स्वास्थ्याकडे’ या उद्दिष्टाने समाजातील सर्व थरातील महिलांचा सर्वांगीण विकास करत आहे. महिलांचे सक्षमीकरण करतानाच तिच्या कुटुंबाचे आणि त्याद्वारे समाजाचे उत्थान करणार्या ‘अहिल्या महिला मंडळा‘च्या कार्याचा मागोवा घेऊया...
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ याच भावनेने छत्रपती संभाजीनगर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’चे सेवाजागृती कार्य चालते. गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्रात विजय उकलगावकरांची भेट झाली आणि त्यांनी ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’ संस्थेच्या शब्दात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपचा मोठा विजय हा प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सुशासनाचा विजय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, तेलंगणातही भाजपला पाठिंबा सतत वाढत आहे. या निवडणुकीत देशाला जातींमध्ये विभागण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण देशात चारच जाती आहेत- महिला शक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंब. या ४ जातींना सक्षम करूनच देश मजबूत होईल, असे ते म्हणाले.
स्वयंम महिला मंडळाने वैष्णवी महिला मंडळाच्या सहकार्याने नुकतेच मुंबईतील विक्रोळी येथे किन्नर भगिनींसोबत दिवाळी संमेलन आयोजित केले होते. रा.स्व.संघ कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे यांच्या मार्गदर्शनाने गेले चार वर्षे स्वयंम महिला मंडळ किन्नर भगिनींसाठी दिवाळी संमेलनाचे आयोजन करत असते. संमेलनासाठी सुरेश गंगादयाल यादव हे सुरुवातीपासूनच सहकार्य करतात. यावर्षी व्यावसायिक अजित सांडू यांनीही सहकार्य केले. दिवाळी संमेलनाच्या निमित्ताने घेतलेला
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या कारकिर्दीला आज एक वर्ष पुर्ण झाले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र महिला मोर्चा देशात नंबर एक करण्याचे प्रयत्न जोमाने सुरू राहतील, असे त्यांनी म्हटले आहे. ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या वर्षपूर्तीबद्दल माहिती दिली आहे.
भारतीय संसदेने महिलांसाठी ३३ टक्के जागा आरक्षित करणारे महिला शक्ती वंदन विधेयक मंजूर करून इतिहास घडवला आहे. हे विधेयक महिलांना राजकारणात अधिक सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहित तर करणार आहेच, त्याशिवाय त्यांच्या सशक्तीकरणाला चालना देणारे ठरेल, हे निश्चित.
दादरमध्ये प्रसिध्द असलेली 'आयडियल'ची दहीहंडी मानाची हंडी मानली जाते. दरवर्षी प्रमाणे महिला गोविंदा दहीहंडी फोडतात. यंदा दहीहंडीसाठी महिला गोविंदा या सकाळी पाच वाजल्यापासूनच मोठ्या उत्साहात तयारी सुरू करतात. महिला गोविंदा या पाच थर लावून दहीहंडी फोडतात.
भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया येथे नऊवारी साडी नेसून ९० महिलांनी योगासनं केली. विविध रंगांच्या नऊवारी साड्या नेसून वयोवृद्ध महिलांपासून ते लहानग्या मुली सहभागी झाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे : महापालिकेचे सार्वजनिक रुग्णालय दिव्यात तातडीने सुरू करून येथील माता भगिनी व सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात. या मागणीसाठी आ. संजय केळकर व भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने सोमवारी (दि.१०)दिवा बी.आर. नगर ते दिवा प्रभाग समिती असा मोर्चा काढुन धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
भाजपाच्या माजी नगरसेविका शिल्पा शिवाजी शेलार आणि माजी नगरसेवक साई शिवाजी शेलार यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात महिलांनी रॅम्प वॉक करीत प्रेक्षकांची मने जिंकली.
महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून महिला बचत गटांची मोठी शक्ती आज जिल्ह्यात उभी झाली आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ग्राहक मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र या बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना कायमस्वरूपी ग्राहक मिळावा, यासाठी जिल्ह्यात सुंदर, अप्रतिम आणि आकर्षक असे व्यापारी संकुल उभे करणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.चांदा क्लब ग्राउंड येथे विभा
मागील दहा वर्षांपासून दिवा शहरात ‘तन्वी फाऊंडेशन’च्या माध्यमातून येथील महिलांच्या प्रगतीसाठी सातत्याने झटणार्या समाजसेविका म्हणून ज्योती पाटील यांची ओळख आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
चित्रा वाघ : महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची निवड करण्यात आली आहे. मावळत्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्ष म्हणून कोण येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. त्यातच आज महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून स्वत:चे अस्तित्व निर्माण करणार्या, द्रौपदी मुर्मू देशाच्या सर्वोच्च नागरिक राष्ट्रपती होतात. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्तच्या प्रगतीचा हा अत्यंत उत्स्फूर्त आलेख म्हणावा लागेल. या अनुषंगाने स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांतील महिलाशक्तीची वाटचाल आणि त्यांनी गाठलेली यशोशिखरे यांचा मागोवा घेणारा हा लेख...
ठाणे शहर भाजपने मंगळवारी शिवसेनेला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहर संघटक संध्या सुरेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अशोभनीय वक्तव्य केले बाबत तसेच महाराष्ट्रात दोन समाजांमधील वितुष्ट निर्माण करून राज्यातील कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचे काम करणाऱ्या दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नाशिक यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार वाडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली.
आधुनिकतेशी समन्वय साधून भारताची आध्यात्मिक, राष्ट्रीय आणि पारंपरिक गृहरचना हे महापुरुषांच्या निर्मितीचे एक शक्तिकेंद्र बनले पाहिजे. स्वच्छ राष्ट्रचरित्र, सुदृढ राष्ट्रनिर्मितीला महत्त्वाचा हातभार लागतो तो म्हणजे एका मातेचा, जी आपल्या अपत्यामध्ये चारित्र्य, संस्कार राष्ट्रप्रेम रुजवते. या मातृशक्तीच्या वैचारिक विकासासाठी आणि कल्याणासाठी ‘विश्व मांगल्य सभा’ ही राष्ट्रीय महिला जनसंघटना गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत आहे. त्याविषयी सविस्तर...
गोवंडी ‘डम्पिंग ग्राऊंड’ बंद झाले. त्यावरील कचरा वेचण्यास कचरावेचकांना बंदी आली. एका कंपनीला या कचर्यासंदर्भातले काम आणि नियोजन देण्यात आले. कचरा वेचणार्या लोकांचे काम गेले, रोजीरोटी गेली. पण, रोजीरोटीचे दुसरे साधन उपलब्ध झाले का? तर नाही. वेगाने बदलत्या आणि धावत्या दुनियेत या कचरावेचक बांधवांचे प्रश्न मात्र ‘जैसे थे’च आहेत, थांबलेले आणि न संपणारे... त्या जगण्याबद्दल काही, त्या न संपलेल्या प्रश्नांबद्दल काही...
प्रचंड आंतरिक सामर्थ्य असलेल्या अमेया जाधव यांना निहित संकल्पापेक्षा वेगळी वाट निवडावी लागली. तरीही जिथे असतील, त्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या अमेया यांच्या जीवनाचा मागोवा...
भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनीथा श्रीनिवासन यांचे टीकास्त्र
पुण्यातील कोथरूडच्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वानथी श्रीनिवासन यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली.
कळव्यातील घटना ताजी असतानाच साताऱ्यातील लोणंदमध्ये मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
"लोकसभेमध्ये आवाज उठवला म्हणून एका महिला खासदाराला संसदेच्या वास्तुत शिवसेनेचे खा. अरविंद सावंत यांच्याकडून उघडपणे धमकी दिली जाण्याची घटना अतिशय वेदनादायी आणि लज्जास्पद आहे. अशी घटना पाहिल्यावर आपण शिवरायांच्या भूमीत राहतो की मोगलांच्या अंमलाखाली राहतो आहे," असा सवाल भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी उपस्थित केला आहे.
महिला दिना दिवशीच स्त्री शक्तीचा अपमान करून त्यांना अमानवी वागणूक देणारे काँग्रेस नेते भूपेंद्र सिंग हुडा यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी गुरूवारी केली. महिला आयोगाने हुडा यांच्यावर कडक कारवाई करावी असेही खापरे यांनी म्हटले आहे.
महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेतल्याचे आज आपल्याला अवतीभवती दिसतेच, पण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व गाजवल्याची उदाहरणे निवडक अपवाद वगळता फारशी दिसत नाहीत. मात्र, ‘कीर्ती महिला संस्था’ आणि ‘भाग्यश्री महिला पतसंस्थे’च्या संस्थापक अध्यक्षा भारती पवार यांनी सहकार क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. महिलांनी महिलांसाठी पतसंस्थेची स्थापना करुन त्यांनी महिलांच्या घरगुती गरजांपासून व्यावसायिक आर्थिक गरजा पूर्ण केल्या. जाणून घेऊया, त्यांचा आजपर्यंतचा प्रवास त्यांच्याच शब्दांत...
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची 6 विभागस्तरीय कार्यालये येत्या जागतिक महिला दिन दि. 8 मार्च रोजी कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून, महिला आयोग व बालविकास आयोगाला अध्यक्षच नाही ते कधी नेमणार असा विरोधकांनी सवाल उपस्थित करत, सरकारला धारेवर धरले आहे.
पुण्याच्या वानवडी परिसरात ९ फेब्रुवारी २०२१ रोजी एका तरुणीने आत्महत्या केली. याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे नाव पुढे येत आहे.त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी व या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेते अतुल भातखलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहत केली आहे.
सामाजिक न्यायसारखे महत्वाचे कॅबिनेट खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले गंभीर आरोप पाहता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही, त्यामुळे सोमवारपासून भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे, असे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी आज जाहीर केले.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडी सरकारवर घणाघात
अमृता फडणवीस यांचा शिवसेनेला सणसणीत टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा
बबिता फोगाटचे कंगनाला थेट समर्थन
‘चहावाल्याची मुलगी’ ते महिला ‘फायटर पायलट’ असा यशस्वी प्रवास करणार्या मध्य प्रदेशमधील 24 वर्षीय आंचल गंगवाल हिच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
लहान मुलाच्या सर्वात जवळ त्याची आई असते आणि तिचे जास्त प्रयत्न असतात ते मूल घडवण्यामागे... परंतु, पैशाअभावी किंवा अज्ञानामुळे काही महिला ते करू शकत नाहीत. म्हणून स्त्रियांना सक्षम करणे व त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या सर्वाचा विचार करून गरीब मुले व महिला यांसाठी ‘सिद्धी’ म्हणजे ‘प्रसिद्धी’ ही आपण म्हणू शकतो. ‘सिद्धी महिला कल्याणकारी संस्थे’ची स्थापना एप्रिल २०१६ रोजी करण्यात आली. नावाप्रमाणेच ही संस्था महिलांसाठी कार्यरत आहे. परंतु, गरीब मुले आणि शैक्षणिक कार्यातही या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले
विधानभवनाच्या कामकाजाची ओळख व्हावी म्हणून आ. उन्मेश पाटील प्रेरित उमंग समाजशिल्पी महिला परिवारातर्फे विधानभवन मुंबई येथे नुकताच अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.
जळगाव बस स्थानकात एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांचा संप सुरू आहे. त्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त तेथे देण्यात आलेला आहे.पोलिस बंदोबस्त असतंाना शनिवार ९ रोजी दुपारी दोन ते सव्वा दोन च्या सुमारास केकत निंभोरा येथील दोन महिलांचे ५ - ५ ग्रॅम चे मंगळसूत्र चोरीला गेले.
येथील प्रतिष्ठा महिला मंडळ तर्फे महिलांना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी करण्याकरीता यंदा २ दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
सध्याचे सरकार हे महिलांच्या नेतृत्वामध्ये देशाचा विकास करू इच्छित आहे.