सांता केजरीवाल खोटं का बोलले? महिला सन्मान योजनेवरुन फसवणूकीचा प्रकार

दिल्ली सरकारने परिपत्रक काढल्यानंतरही आम आदमी पक्षाच्या एक्स हँडलवरही खोटा प्रचार सुरूच

    25-Dec-2024
Total Views |

kejariwal
 
नवी दिल्ली : (Arvind Kejriwal) दिल्लीतील केजरीवाल सरकार सध्या योजनांच्या अफवांमुळे चर्चेत आले आहे. एकीकडे कुठलीही योजना लागू नाही, कोणालाही कागदपत्रं दिल्यास फसवणूक होईल अश्या आशयाचे परिपत्रक काढायचे, वृत्तपत्रात जाहिराती द्यायच्या आणि दुसरीकडे पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर योजनांचा प्रचार करायचा, असे आप सरकार (AAP Government) चे दुटप्पीपणाचे धोरण सध्या सुरु आहे.
 
आम आदमी पक्षाच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओत आपचे अरविंद केजरीवाल हे सांताच्या वेशात एका महिलेला भेटवस्तू देताना दिसतात त्या भेटवस्तू असलेल्या बॉक्सवर २१०० रुपये असे लिहिले आहे. अश्याच अनेक योजनांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख या व्हिडिओत केलेला दिसून येतो. याशिवाय या व्हिडिओला "दिल्लीचा स्वतःचा सांता वर्षभर भेटवस्तू देतोय" असं कॅप्शन ही देण्यात आले आहे.
 
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आप सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना जाहीर केल्या होत्या. याच योजनांवरुन उठलेल्या अफवांवर स्पष्टीकरण देताना आप सरकारने या योजना अद्याप अधिसूचित नाही तसेच अस्तित्वात नसलेल्या अशा कोणत्याही योजनेकडे दिल्लीतील सामान्य जनतेने लक्ष देऊ नये, असे म्हटले होते.