'महिला सुरक्षिततेसाठी अद्याप SOP नाहीच ; ते तर बेगडी सरकार'

    28-Nov-2020
Total Views |

chitra wagh_1  



मुंबई :
"आम्ही वारंवार मागणी करूनही महाविकास आघाडी सरकारने अद्याप महिला सुरक्षिततेसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही" अशी टीका भाजप नेत्या चित्र वाघ यांनी केली आहे. मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून महाराष्ट्रात दिशा कायदा कधी लागू होणार, असा प्रश्न भाजप नेत्यांतर्फे विचारला जात आहे.


राज्यात क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचाही मुद्दाही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वारंवार उजेडात आणला आहे. लॉकडाऊनमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये दोन बलात्कार आणि १२ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत, त्याची माहिती उपस्थित करत त्यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे. राज्य सरकारच्या या उदानसीतेबद्दल तुम्ही काय बोलणार आहात का? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. ट्विट करत चित्रा वाघ यांनी सरकारला जाब विचारला. त्या म्हणाल्या, "महाविकास आघाडीच्या काळात कोविड-क्वारंटाईन सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल महिलांवर २ बलात्कार १२ विनयभंग तर गुप्तांगातून स्वॅब घेण्याच्या गलिच्छ घटना घडल्या महिला सुरक्षा व सक्षमीकरणाचे नारे देणाऱ्या सरकारने वांरवार मागणी करूनही SOP बनवली नाही हे तर बेगडी सरकार.." अशी घणाघाती टीका वाघ यांनी केली.



 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने भाजपने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारची पोलखोल सुरु केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर तसेच मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली.“मुख्यमंत्र्यांची कालची मुलाखतीतली भाषा म्हणजे अशी भांडण नाक्यावर होतात. वर्षपूर्तीच्या निमित्ताने होत नाहीत, असं सांगत अशा प्रकारे चिरडण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली ते फार काळ टिकले नाहीत”, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.“हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. या मुलाखतीत विकासावर अजिबात चर्चा नाही. चर्चा कशावर तर कुणाच्या मागे हात धुवून लागू आणि कुणाची खिचडी शिजवू यावर मुलाखतीचा भर होता. ही मुलाखत मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती”, असेही फडणवीस म्हणाले.