जळगाव बस स्थानकात महिला चोरट्यांचा धुमाकूळ:
जळगाव, ८ जून
जळगाव बस स्थानकात एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांचा संप सुरू आहे. त्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त तेथे देण्यात आलेला आहे.पोलिस बंदोबस्त असतंाना शनिवार ९ रोजी दुपारी दोन ते सव्वा दोन च्या सुमारास केकत निंभोरा येथील दोन महिलांचे ५ - ५ ग्रॅम चे मंगळसूत्र चोरीला गेले.
दुपारी दोन ते सव्वा दोन च्या सुमारास वंदना किशोर पाटील व योगिता अमोल पाटील या दोन महिलांना जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा येथे जायचे होते. बसची वाट पाहत या दोन्ही महिला बस स्थानकाच्या फलाट क्रमांक ११ वर बसल्या असतांना दोन चोरट्या महिलांनी गळ्यातील प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवून पोबारा केला. ही बाबत या महिलांच्या लक्षात येताच त्यांनी बस स्थानकातील अधिकार्याकडे तक्रार केली.
बस स्थानकात पोलिसांचा बंदोबस्त असतांना महिला चोरट्यांनी सोन्याचे दोन मंगळसुत्र लांबविले. काही दिवसांपूर्वी पाचोरा तालुक्यातील शेतकर्याची पाच लाख ७० हजारांच्या रुपयांची बॅग चोरट्याने लांबवली होती. त्यामुळे जळगाव बसस्थानक हे चोरट्यांचे नंदनवन बनत आहे का ?, प्रवाशी येथे सुरक्षित आहेत का ? अशी चर्चा प्रवाशांमध्ये होत आहे.
अतिरिक्त सि सि टी व्ही कॅमेर्याची मागणी:
बसस्थानकात वारंवार होत असललेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बसस्थानकात अतिरिक्ती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.
ज्या प्रकारे पोलिसांनी पाच लाख ७० हजारांच्या चोरीचा यशस्वी तपास स्था.गु.शाखेच्या पोलिसांनी केला. त्या प्रकारे आज झालेल्या चोरीचा उलगडा पोलीस कशा प्रकारे करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.