दादरमध्ये 'आयडियल'ची दहीहंडी; महिला गोविंदानी दिली सलामी!

    07-Sep-2023
Total Views |
dahihandi 

मुंबई : दादरमध्ये प्रसिध्द असलेली 'आयडियल'ची दहीहंडी मानाची हंडी मानली जाते. दरवर्षी प्रमाणे महिला गोविंदा दहीहंडी फोडतात. यंदा दहीहंडीसाठी महिला गोविंदा या सकाळी पाच वाजल्यापासूनच मोठ्या उत्साहात तयारी सुरू करतात. महिला गोविंदा या पाच थर लावून दहीहंडी फोडतात.

सकाळपासून थर लावण्याची तयारी मोठ्या जोमाने सुरू होते. सकाळपासूनच पावसाचे आगमन झाल्यामुळे महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळते.