महिला आयोग व बाल विकास आयोगाला अध्यक्ष कधी ? - चित्रा वाघ

    06-Mar-2021
Total Views |

chitra wagh_1  

महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी होणार कार्यान्वित करण्याचा महिला व बालविकास विभागाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची 6 विभागस्तरीय कार्यालये येत्या जागतिक महिला दिन दि. 8 मार्च रोजी कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून, महिला आयोग व बालविकास आयोगाला अध्यक्षच नाही ते कधी नेमणार असा विरोधकांनी सवाल उपस्थित करत, सरकारला धारेवर धरले आहे.
 
 
अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू व्हावीत. त्यानुसार नुकताच शासन निर्णय जारी करण्यात आला होता. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागस्तरावर ही कार्यालये महिला दिनी एकाच दिवशी प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत अशी माहिती मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
 
 
मात्र सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात अनेक महिला व बालकांना विरोधात अनेक दुर्घटना घडल्या तरीही सरकारने या दोन्ही आयोगाच्या अध्यक्षांची निवड केलेली नाही. राज्यात महिला व बालके असुरक्षित आहेत, तरी या सरकारला जाग येत नाही. महिला आयोगाची कार्यालय महिलादिनी स्थापन करण्याचा हा त्यांचा फक्त दिखावा आहे. त्यांना राज्यातील महिलांची व बालकांची काहीही पडलेली नाही. राज्यात कोणी असो पण महिला विकास आयोगाला व बालविकास आयोगाला अध्यक्ष तरी द्या अशी आमची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले.
 
राज्यात अनेक महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत, सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही. आता महिला दिनी कार्यलये कार्यान्वित करत, विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास यांना राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव यांच्या समन्वयाने या कार्यालयांचे कामकाज हाताळावे असे निर्देश महिला व बाल विकास विभागाकडुन देण्यात आले आहेत.मात्र महिला विकास आयोगाचे व बाल विकास आयोगाचे अध्यक्ष कधी निघणार यासंदर्भात काहीही प्रतिक्रिया महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलेली नाही.