वाघीण मुंबईत येतेय हिम्मत असेल तर अडवा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2020
Total Views |
Babita Phogat Sanjay Raut
 
 

 
नवी दिल्ली : शिवसेनेने कंगना विरोधात रोखठोक भूमिका घेतल्यानंतर आता कंगनानेही एक पाऊल पुढे जाऊन शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे. 'मुंबई विमानतळावर मी ९ सप्टेंबरला येतेय कुणाच्या बापात हिम्मत असेल तर रोखून दाखवा' असे ट्विट कंगना रणौत हिने केले आहे. तर या ट्विटला रिट्विट करत भारतीय कुस्तीपटू बबिता फोगाटनेही समर्थन दर्शवले आहे. 
 


 
 
कंगना रणौतच्या समर्थात ती म्हणते, "शेरनी मुंबईत येतेय वेळही सांगेल, कुणात दम असेल तर रोखून दाखवा" दरम्यान, कंगनाने मुंबईत येऊन दाखवावे, असे आवाहन शिवसेना महिला आघाडीने केले आहे. मुंबई पोलीसांबद्दल वक्तव्य करणाऱ्या कंगनाला इथे पाऊल ठेवू देणार नाही, असेही तिने म्हटले आहे. शिवसेना भवन दादर येथे कंगनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन केले होते.
 
 
 
कंगनानेही आपल्या ट्विटद्वारे खुले आव्हान दिले आहे. "मुंबईत येण्यापासून मला रोखणाऱ्यांनी ऐका ९ सप्टेंबरला विमानतळावर माझे विमान उतरेल. कोणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा", असे कंगना म्हणाली. कंगनाने यानंतर आणखी एक ट्विट केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या ट्विटची दखल घेतली आहे. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. आता माझा अधिकार हिरावून घेतला जात असून पीओके ते तालीबान, असा प्रवास एका दिवसात झाल्याचेही ती म्हणाली.


@@AUTHORINFO_V1@@