उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर असून गुरुवार, ३ जुलै रोजी ते पंढरपुरात दाखल झाले. दरम्यान, यावेळी त्यांच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
Read More
राज्यात वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना दामिनी व सचेत ॲपद्वारे दिले जात आहे. कमी परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करण्यात येईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी दिली.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर ३९ जणांचा वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला.
संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे भूकंप होतो. ते प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला जातात आणि त्याठिकाणी विघटन होते, असा हल्लाबोल मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
संजय राऊतांएवढी दलाली आजपर्यंत कुणीही केलेली नाही. उद्धवजींनी आवरले नाही तर त्यांच्याकडे पुढे कुणीच राहणार नाही, असा घणाघात मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवार, ३ जून रोजी केला आहे. संजय राऊतांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
“चांदवडचा रंगमहाल ही वास्तू डोळे दिपवणारी आहे. अहिल्याबाई होळकर यांनी महिलांची ताकद ओळखली होती. त्यांनी अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्यांनी प्रशासक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. 300 वर्षांपूर्वी त्यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व ओळखले होते. अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादनासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. होळकर साम्राज्याची उपराजधानी असलेल्या चांदवड येथे अहिल्याबाई होळकर यांचे शिल्प साकारण्यात येईल. तसेच, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने सध्या राज्यात एकच खळबळ उडाली असून यावर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, शुक्रवार, २३ मे रोजी मंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यात कस्पटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील वैष्णवीच्या वडीलांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला.
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या दाव्याला मंत्री गिरीश महाजन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांचा अतिरेकी असा उल्लेख करत त्यांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे.
( minister girish mahajan ) आरोग्यदूत ना. गिरीष महाजन हे एक समाजशील आणि लोकाभिमुख राजकीय नेते. ते सत्तेत असोत अथवा विरोधी बाकांवर, शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ गोरगरीब रुग्णांना व्हावा आणि वैद्यकीय सेवासुविधांच्या साहाय्याने व्यापक जनसंख्येचे जीवितरक्षण व्हावे, अशी त्यांची तळमळ राहिली आहे. सन 2004 पासून त्यांनी आरोग्यसेवेची चळवळ सुरू केली. नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्रिपद सोपविण्यात आले. आपल्याकडे चालून आलेल्या संधीचे सोने करीत त्यांनी जनआरोग्य चळवळीशी विविध शासकीय
त्र्यंबकेश्वरला कुशावर्त ते गायत्री मंदीरापर्यंत सिमेंट काँक्रिट स्लॅबखाली बंदिस्त असलेली गोदावरी नदी येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मोकळा श्वास घेणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवार, दि. २८ मार्च रोजी त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी केली.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी व विदर्भातील जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प. आजच्या जागतिक जल दिनानिमित्ताने महाराष्ट्राचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीष महाजन यांचा वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा विविध पैलू उलगडणारा हा लेख...
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर आता नवनिर्वाचित मंत्र्यांना शासकीय निवासस्थाने ( government residences ) आणि कार्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चित्रकुट, तर विखे पाटलांना रॉयलस्टोन बंगला देण्यात आला आहे.
ठाणे : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचा आजार पूर्णपणे बरा झाला नसल्याने काळजी वाढली आहे. रविवार, दि. १ डिसेंबर रोजी सातार्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी परतल्यानंतर प्रकृती ठीक असल्याचे सांगणार्या शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली नसल्याचे समोर आले. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिंदे यांनी सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी निवासस्थानीच विश्रांती घेतल्याने त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकावर दबाव टाकल्याचा आरोपात त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली आहे. कारण तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे असणारा एक पेनड्राइव्ह विधानसभेत सादर करत गिरीश महाजन यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची पोलखो
मंत्री गिरीष महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तत्कालिन पोलिस अधिक्षकांवर दबाव आणल्यामुळे अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता गिरीष महाजनांनी अनिल देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत एक धक्कादायक अहवाल सादर केला असून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनिल देशमुखांनी तत्कालिन पोलिस अधीक्षकांना धमकी दिली होती, असा आरोप सीबीआयकडून करण्यात आला आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्य सरकार आणि ओबीसी शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.
लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण पूर्णत: निवळत नाही, तोवर आता पुणेकरांच्या समस्यांसाठी आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून लोकप्रतिनिधींनी कंबर कसलेली दिसते.पुणे महानगराची एकीकडे विकासाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे चित्र असताना, अलीकडील काळातील काही अप्रिय घटनांनी मात्र या चित्रावर नेमकी फुली मारली गेली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याचे विधान दि. ६ जून रोजी पत्रकार परिषदेत केले. ज्यानंतर सर्वत्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशा आशयाच्या बातम्या प्रकाशित होऊ लागल्या. त्यात काही वृत्तस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने गिरीश महाजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होतील, अशा बातम्या प्रसिद्ध करायला सुरुवात केली. पण आता गिरीश महाजनांनी याबद्दल पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.
ज्यांनी पक्षात ३०,३५ वर्ष आमदारकी भोगली आणि २० वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले ते आता दुसऱ्या पक्षात जाऊन पडले, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे नाव न घेता केली आहे. ते जळगावमध्ये आयोजित महायूतीच्या मेळाव्यात बोलत होते.
उद्धवजी आपलं नाटक होणार नाही याची काळजी घ्या, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे. गिरीश महाजनांनी रविवारी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
येत्या निवडणूकीच्या निकालानंतर उबाठा गट साफ होणार आहे. उबाठा गटाचा फुफाटा होणार आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि आदर्श विचाराने कार्यक्षम प्रगतीशील प्रशासन स्थापन करून मराठी साम्राज्याचा पाया घातला. युद्धशास्त्रात अनेक नवनवीन संकल्पना रुजविल्या आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली विकसित केली. असे महान राजा, अवघ्या मराठी मनाची अस्मिता, आपले अराध्य दैवत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९४ वी जयंती आपण १९ फेब्रुवारी रोजी साजरी करत आहोत त्याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्षे साजरे करत आहोत. या निमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या ५ महामंडळांच्या संकेतस्थळांचे लोकार्पण मंगळवारी पार पडले. दरम्यान, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता सर्वात महत्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते.
एकनाथ खडसे वारंवार लोकांच्या भ्रष्टाचारावर बोलतात पण ते स्वत: तर भ्रष्टाचाराचे कुलगुरुच आहेत, असा हल्लाबोल मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना गौण खनिज घोटाळ्याप्रकरणी १३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, गिरीश महाजनांनी पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला आहे.
पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढावा, महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाने आई हे महिला केंद्रित धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गतच महिला उद्योजिकांसाठी नवी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साने गुरूजी साहित्य नगरी सज्ज झाली आहे. साहित्यिक रविंद्र शोभणे अध्यक्ष आणि ना. गिरीश महाजन स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत सुमित्राताई महाजन यांनी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषाताई तांबे यांना आपली स्विकृती कळवली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक व म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली.
ग्रामीण पर्यटनाचा विकास करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची शपथ पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई फेस्टिव्हल २०२४ च्या समारोप प्रसंगी सर्वांना दिली. पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असे आवाहनही पर्यटन मंत्री महाजन यांनी केले.
येत्या काळात महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहे, असे भाकित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर बावनकुळेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत मुंबईमध्ये २० ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचा समाविष्ट असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
येत्या १५ ते २० दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या बोधचिन्ह, बोधवाक्याच्या अनावरणानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
‘आई’ धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत.
भाजप नेते गिरीश महजन यांनी मनोज जारांगे पाटलांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही असं मत व्यक्त केलं आहे. शुक्रवारी २९ डिसेंबर ला माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल आहे.
राज्यात सध्या राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. यातच केंद्र सरकारला व्हीव्हीआयपी वाटत आहेत त्यांना अपेक्षित आहेत ते जाणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना निमंत्रण दिलं आहे पण उद्धव ठाकरेंना नाही, असे वक्तव्य मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. महालक्ष्मी सरसच्या उद्धाटनानंतर त्यांनी मंगळवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून आता राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले आहे. मनोज जरांगेंकडे अधिक वेळेची मागणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ गेल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी भेट घेतली आहे. ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री संदीपान भुमरे हे अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंच्या भेटीकरिता गेले होते. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली.
यशोमतीताई आपण मंत्री असताना आपण काय केलं? असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी केला काँग्रेस आमदार यशोमती ठाकुर यांना केला आहे. बुधवारी सभागृहात अंगणवाडी सेविकांच्या वेतवाढीबद्दल बोलत असताना गिरीष महाजन आणि यशोमती ठाकुर यांच्यात खडाजंगी झाली.
विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी सलीम कुत्ता प्रकरणाचे पडसाद उमटले. याप्रकरणी विरोधकांनी मंत्री गिरीष महाजनांवर आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगलेच खडसावले आहे. कुठलाही संबंध नसताना एखाद्या मंत्र्यावर बेछुट आरोप केल्याने विरोधकांनी माफी मागायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे सभागृहात आल्यामुळे असे विषय आले असावेते, असा टोलाही त्यांनी लगावला.
एकनाथ खडसेंवर बिकट वेळ आल्याने त्यांच्या डोक्यात मानसिकदृष्ट्या बिघाड झालेला आहे. त्यामुळे ते उठता बसता वाटेल ते बेछूट आरोप करत आहेत, असा घणाघात मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे. सोमवारी सलीम कुत्ता प्रकरणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसेंना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी आजारपणाचे नाटक केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथिल जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेस कार्यक्रमाचे उद्धघाटन ग्रामविकास व पंचायत राज तसेच पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथिल जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेस कार्यक्रमाचे उद्धघाटन ग्रामविकास व पंचायत राज तसेच पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी काल ३ नोव्हेंबर रोजी केले. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, " बदलत्या जीवनशैलीचे कारण देत वाढत चाललेली व्यसनाधीनता हा केवळ महाराष्ट्रातील महानगरांमध्येच नव्हे तर इतर शहरे व ग्रामीण भागातही चिंतेचा विषय ठरत आहे. सिगारेट, दारूसारख्या व्यसनांसह अफू, गांजा, ड्रग्ज, खर्रा, ताडी-माडी, तंबाखू, तपकीर, गुटखा अशा विविध प्रकारच्या व्यसनांमध
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून (२५ ऑक्टो.) आमरण उपोषण सुरू झालं आहे. उपोषणापूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेंना फोन करून संवाद साधला. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय आता उपोषणातुन माघार घेणार नाही. आरत्रण मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावणार. आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. अशी स्पष्ट भुमिका जरांगेंनी मांडली.
सोमवारी नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू झाले आहेत. अजूनही हा मृत्यूचा तांडव सुरु असून मृतांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे. या सगळ्या प्रकारावर आता भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ल्या काही दिवसांपासून धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी सुरु असलेले उपोषण अखेर मंगळवारी मागे घेण्यात आले आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना हे उपोषण सोडवण्यात यश आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवार गटाकडून आपल्याला ऑफर आली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता अजित पवारांनी एकनाथ खडसेंची पोलखोल केली आहे.
'डेक्कन ओडिसी ट्रेन-२.०' या आलिशान व आरामदायी ट्रेनचा प्रमुख उद्देश राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ओळख करून देणे आहे. डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या स्वरूपात आल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनात वाढ होईल, असे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी २.० या ट्रेनचा शुभारंभ गुरुवार, दि. २१ सप्टेंबर रोजी होणार आहे.
गेल्या १७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते. मात्र काही मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीनवंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाटील म्हणाले की, शेवटी मुख्यमंत्री शिंदेना उपोषण स्थळी मी आणूनच दाखवलं. मुळात कुणाच्या सांगण्यावरून मी आंदोलन करत नाही. मात्र मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता फक्त शिंदेंमध्येच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्या
राज्यात विविध विभागांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यातच आता ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेबाबत प्रलोभनास बळी न पडण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. दरम्यान, संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत असून सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार असल्याचे महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.