ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेबाबत प्रलोभनास बळी न पडण्याचे मंत्री गिरीष महाजन यांचे आवाहन

    08-Sep-2023
Total Views | 35
Rural Development Minister Girish Mahajan On Recruitment

मुंबई :
राज्यात विविध विभागांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यातच आता ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेबाबत प्रलोभनास बळी न पडण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. दरम्यान, संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत असून सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार असल्याचे महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच, काही समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नसून अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असेदेखील गिरीष महाजन यावेळी म्हणाले.

मंत्री महाजन म्हणाले की, ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांतर्गत गट – क मधील ३० संवर्गातील एकूण १९ हजार ४६० रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121