सामाजिक कार्यकर्ते ॲड.निलेश राऊत मानद डॉक्टर पदवी ने सन्मानित

    10-Aug-2025
Total Views |

कासा, पालघर तालुक्यातील दातिवरे गावातील सामाजिक कार्यकर्ते ॲड नीलेश रमेश राऊत यांच्या सामाजिक व शैक्षणिक विविध क्षेत्रातील कार्यासाठी वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी अमेरिका या अभिमत विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टर पदवी देऊन दिल्ली येथे मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

ॲड.निलेश राऊत गेली २७/२८ वर्ष पालघर ,डहाणू,वसई तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून आदिवासी ,मच्छीमार,शेतकरी,गरीब,गरजू , तरुणांच्या शिक्षण,रोजगारासाठी नेहमी प्रयत्न करित असतात.महिला सबलीकरणासाठी देखील काम करतात.अनेक गावामध्ये स्थानिक लोकप्रतिनीच्याच्या माध्यमातून अनेक विकासकामांचा पाठपुरावा करून कामे पूर्णतःवास नेली आहेत.

पालघर तालुक्यातील अंबाडे, एडवण, वेडी या गावांना पर्यटन विकास दर्जा मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.तसेच त्या भागातील अनेक पर्यटन स्थळांच्या विकासात महत्वाचा सहभाग घेतला आहे.आदिवासी भगिनी ना स्वयंरोजगार निर्मिती साठी न्युक्लिअस योजना असेन किंवा युवा बेरोजगारांना विविध शासकीय कर्ज योजना,स्वयंरोजगार योजना राबविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.दलीत वस्ती मध्ये विकास कामांचा सतत पाठपुरावा करून विकास कामना गती देण्यात दिली आहे.

रोजगार मेळावे,बचतगटांचे मेळावे आयोजित करणे,विविध स्पर्धांच्या आयोजनात भाग घेणे,वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे.अशी अनेक कामे त्यांनी केली असुन ती पूर्ण करीत आहेत.

सामाजिक,राजकीय कार्यकर्ता ते पत्रकार,वकील,उत्तम कवी,लेखक,पत्रकार,सूत्रसंचालक,अभ्यासू वक्ता,गायक अशी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत भारतातल्या वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी समितीच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली.अमेरिकेतील प्रतिष्ठित वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी यांच्या वतीने मानद डॉक्टर पदवी दिल्ली येथील एका कार्यक्रमाच्या वेळी देण्यात आली.तसेच श्रीलंका,भूतान,नेपाळ सह अन्य देशातील मान्यवरांना देखील या वेळी सन्मानित करण्यात आले.

जेष्ठ अभिनेते अरबाज खान,पॅलेस्टाईन दूतावासाचे वाणिज्य दूत बसेन हेलिस, प्रा.डॉ.राजीव मिश्रा, डीन, गालगोटिस विद्यापीठ,ग्रेटर नोएडा,डॉ. रंगडीमा पाथीरागे,उच्च शिक्षण सल्लागार,वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी, अमेरिका, डॉ.राजेश सोनार,केनेडी विद्यापीठ,प्रो.ललितकुमार सागर,कुलगुरू,वेंकटेश्वर मुक्त विद्यापीठ,डॉ. इंदर नेगी ,इथेरिया ग्लोबल विद्यापीठ,अमेरिका,पद्मश्री पुरस्कार सन्मानित श्री.जितेंद्र सिंग शांटी,आदी अनेक मान्यवरांचे हस्ते यावेळी ॲड.निलेश राऊत यांना मानद डॉक्टर पदवी देवून सन्मानित करण्यात आली.

यावेळी या सन्मानाने आणखी जबाबदारी वाढली असून काम करण्याचे मनोबल वाढले असल्याचे ॲड.निलेश राऊत यांनी सांगितले.तसेच हा सन्मान आपले आई वडील,गुरुजन,आप्तेष्ट,पत्नी,मुले,जवळचे मित्र,मार्गदर्शक यांना अर्पण करीत असल्याची भावना व्यक्त केली. समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.