‘आई’ धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत : पर्यटनमंत्री गिरीश महाजन

    30-Dec-2023
Total Views |
MTDC Initiative for Tourist Womens

मुंबई :
‘आई’ धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत.

दरम्यान, या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर १ ते ८ मार्च २०२४ हे आठ दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के इतकी सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

सर्व क्षेत्रातील महिलांच्या अमूल्य योगदानाबद्दल कौतुक व्यक्त करण्यासाठी, एमटीडीसी आपल्या ‘आई’ (AAI) उपक्रमाअंतर्गत ही सवलत जाहीर करत आहे. या उपक्रमामुळे महिलांना पर्यटनासाठी वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाकडून व्यक्त करण्यात येत आहे,.