मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथिल जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेस कार्यक्रमाचे उद्धघाटन ग्रामविकास व पंचायत राज तसेच पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, " बदलत्या जीवनशैलीचे कारण देत वाढत चाललेली व्यसनाधीनता हा केवळ महाराष्ट्रातील महानगरांमध्येच नव्हे तर इतर शहरे व ग्रामीण भागातही चिंतेचा विषय ठरत असल्याचे मंत्री महाजन यावेळी म्हणाले.
दरम्यान, सिगारेट, दारूसारख्या व्यसनांसह अफू, गांजा, ड्रग्ज, खर्रा, ताडी-माडी, तंबाखू, तपकीर, गुटखा अशा विविध प्रकारच्या व्यसनांमध्ये आजची तरुणपिढी गुरफटत चालली आहे व हेच कारण कर्करोगाच्या वाढीला कारणीभूत ठरत आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश असून यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे भारताच्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहणे हि आजच्या काळाची गरज आहे, यामध्ये शिक्षक, पालक तसेच सामाजिक संस्थानी पुढाकार घेणे महत्वाचे आहे.", असेदेखील मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.