"निवडणुकीच्या निकालानंतर उबाठा गटाचा फुफाटा होणार!"

    12-Mar-2024
Total Views | 333

UBT


जळगाव :
येत्या निवडणूकीच्या निकालानंतर उबाठा गट साफ होणार आहे. उबाठा गटाचा फुफाटा होणार आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "येत्या निवडणूकीच्या निकालानंतर उबाठा साफ होणार आहे. उबाठा गटाचा फुफाटा होणार आहे. उद्धव ठाकरे नैराश्यातून बोलत आहेत. त्यांनी त्यांची पातळी सांभाळून बोलायला हवं अन्यथा लोकं त्यांना हसतील."
हे वाचलंत का? - "लोकांचं भलं करण्याची संधी असताना..."; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
 
"संजय राऊत वैफल्यग्रस्त झालेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी काहीही केलं तरी ते त्यांच्यावर टिपण्णी करत आहेत. त्यामुळे राऊतांचं डोकं ठिकाणावर नसल्याने त्यांचा इलाज करायला हवा. संजय राऊत तुमच्याबरोबर कुणीही राहिलेलं नाही. तुमच्यासोबत ५० पैकी पाचही जण राहणार नाहीत तरीही तुमची रग अजून जात नाही. त्यापेक्षा आपल्या काय चुका झाल्या यावर आपण थोडं आत्मपरिक्षण करायला हवं. संजय राऊतांचा तोल गेल्याने ते वेडवाकडं वक्तव्य करत आहेत. केवळ प्रसिद्धी मिळवणं एवढंच तुमचं काम राहिलेलं आहे," असे ते म्हणाले.
 
रविंद्र वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर बोलताना ते म्हणाले की, "येत्या दोन तीन दिवसांत आचारसंहिता लागेल. त्याआधी अनेक लोकं भाजप, शिंदे गट किंवा अजितदादांच्या गटात येतील. यासाठी भरपूर नावांची लाईन लागली आहे. त्यामुळे कुणीही आलं तरी याबद्दल आश्चर्य व्यक्त करु नये," असेही ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121