बावनकुळे यांना चित्रकुट, तर विखे-पाटलांना रॉयल स्टोन बंगला
मंत्र्यांना शासकीय निवासस्थाने आणि कार्यालयांचे वाटप
24-Dec-2024
Total Views | 36
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर आता नवनिर्वाचित मंत्र्यांना शासकीय निवासस्थाने ( government residences ) आणि कार्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चित्रकुट, तर विखे पाटलांना रॉयलस्टोन बंगला देण्यात आला आहे.
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना पर्णकुटी, मंत्री गिरीश महाजन यांना सेवासदन, तर मंत्री गुलाबराव पाटील यांना जेतवन बंगला देण्यात आला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवगिरी, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना ब-१ सिंहगड देण्यात आला आहे.