महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मोठे पक्षप्रवेश होणार! बावनकुळेंचे भाकित
14-Jan-2024
Total Views |
मुंबई : येत्या काळात महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहे, असे भाकित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर बावनकुळेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "अनेक पक्षांचे अनेक लोकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेशासाठी रांग लावून आहेत. तसेच भाजपकडेही त्यांनी रांग लावली आहे. हा पक्षप्रवेश लोकसभा आणि विधानसभेचाच असला पाहिजे असे काही आवश्यक नाही. अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या सर्वांकडेच मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाचे हादरे महाराष्ट्राला दिसतील. ते मोठे हादरे असतील," असेही ते म्हणाले.
अनपेक्षित लोक भाजपमध्ये येतील - गिरीष महाजन
मंत्री गिरीष महाजन यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या काळात अजूनही मोठे भुकंप होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच येत्या १५ दिवसांत आपल्याला अपेक्षित नाही असे लोक भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील, असेही ते म्हणाले आहेत.