मोठी बातमी! अभिनेता दिनो मोरियाच्या घरी ईडीची छापेमारी

    06-Jun-2025
Total Views |
 
Dino Morea
 
मुंबई : बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया याच्या मुंबईतील घरी ईडीने छापेमारी केली आहे. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी ही छापेमारी सुरु असून शुक्रवार, ६ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून त्याच्या घरी छापेमारी सुरु आहे. दिनो मोरिया हा उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. 
 
मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात आतापर्यंत १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम याचे अभिनेता दिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी फोनवरून संभाषण झाल्याचे आढळल्याने त्या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. तसेच या तिघांमध्ये अनेकदा आर्थिक व्यवहार झाल्याचाही माहिती उघड झाली आहे.
 
दरम्यान, मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सलग तीन दिवस अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता त्याच्या घरी ईडीने छापेमारी सुरु केली आहे. यासोबतच मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमच्या घरीदेखील ईडीने छापा टाकला आहे. त्याच्या वरळीतील घरी ईडीने छापेमारी सुरु केली आहे. तसेच कांदिवली येथील जय जोशी याच्या घरीदेखील ईडीने छापा टाकला आहे.