नाशिक: मागील तीन ते चार दिवसांपासून गोदावरी नदीला आलेला पूर काही अंशी ओसरणार असून गंगापूर धरणातून सुरुअसलेला विसर्ग घटविला जाणार आहे. सध्या ६ हजार १६० क्युसेकने सुरु असलेला विसर्गमंगळवार दि. २४ जून रोजी दुपारी २ वाजता १ हजार ७६० क्युसेकने कमी करण्यात आलाअसून ४ हजार ४०० क्युसेक इतका सुरु राहील, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. मागीलसहा ते सात दिवसांपासून पाणलोट क्षेत्र, घाटमाथा आणि जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरुअसल्याने नदी-नाले दुथडी भरुन वाहायला लागले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच २४धरणांमधील जलसाठ्यात चांगलीच वाढ झाल्याचे बघायला मिळाले.तसेच गोदावरी नदीच्या दारणा,कादवा आणि बाणगंगा या उपनद्याही दुथडी भरुन वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचाइशारा देण्यात आला.
दरम्यान, सोमवार दि. २३ जून रोजी संध्याकाळी कडवा धरणातूनविसर्गात २६५ ने वाढ होवून १ हजार ६० क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात आले.त्यामुळे कडवा आणि गोदावरी नदीच्या संगमावर असलेल्या नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातूनसोमवारी रात्री ९ वाजता विसर्ग ६ हजार ३१० ने वाढवून तो १५ हजार ७७५ तर दारणामधूनरात्री १० वाजता ६६३ ने वाढ करुन ४ हजार ७४२ क्युसेकने करण्यात आला.यासोबतच पुढील काही तासांतनाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील काही ठिकाणी मध्यम ते जोरदारपाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कराहण्याचे प्रशानाने सांगितले आहे. दरम्यान, २० वर्षांपूर्वी २००५ मध्ये जून महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊसझाल्यामुळे गंगापूर धरणामधूनविसर्ग करण्यात आला होता. यंदा मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलच पाणी सोडावे लागल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनीसांगितले.