ठाणे : इ. ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सुरू झाली असून, सर्व पात्र विद्यार्थ्यांनी [https://mahafyjcadmissions.in](https://mahafyjcadmissions.in) या अधिकृत संकेतस्थळावरून वेळेत ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन जिल्हा परिषद ठाणेच्या शिक्षण विभागाने केले आहे. सदर प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे सदर वेळापत्रकाप्रमाणे सर्व पालक व विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहीतुले यांचा कोट:
"विद्यार्थ्यांची 11 वी प्रवेश प्रक्रिया ही संपूर्णतः ऑनलाईन आहे त्यामुळे पालक व विद्यार्थी यांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत जेणे करून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शाखांमध्ये प्रवेश घेणे सुलभ होईल. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावरून प्रवेशासाठी नोंदणी करावी. विद्यार्थी नोंदणीकरिता अंतिम दिनांक ०३ जून, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे. "
विद्यार्थ्यांसाठी अधिक माहितीसाठी-
अधिकृत संकेतस्थळ - https://mahafyjcadmissions.in
ई-मेल आयडी - support@mahafyjcadmissions.in
हेल्पलाईन नंबर ८५३०९५५५६४
सुधारित प्रवेश वेळापत्रक (२०२५-२६):
विद्यार्थी नोंदणी व अर्ज सादर:
२६ मे ते ०३ जून २०२५, सायं. ६.०० वाजेपर्यंत
तात्पुरती गुणवत्ता यादी:
हरकती व दुरुस्ती सादर करणे:
अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरी वाटप (कोटा प्रवेशासाठी):
शून्य फेरी प्रवेश (कोटा):
CAP फेरी १ वाटप:
CAP फेरी १ प्रवेश प्रक्रिया:
दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर: