इंडस्ट्री 5.0 : नवोन्मेषासह स्थायी प्रगतीचा महामार्ग

    15-May-2025
Total Views | 12
इंडस्ट्री 5.0 : नवोन्मेषासह स्थायी प्रगतीचा महामार्ग

जागतिक पातळीवर कालानुरुप औद्योगिक आणि व्यावसायिक प्रगतीचे स्वरुपही आमूलाग्र पालटले. तांत्रिक आधुनिकीकरणासह सामाजिक विकास, पर्यावरणाशी सांगड यांसारख्या बाबींनाही आज लक्षणीय महत्त्व प्राप्त झालेले दिसते. त्यानिमित्ताने ‘इंडस्ट्री 5.0’ या औद्योगिक टप्प्यातील महत्त्वपूर्ण टप्प्यातील बदलांची वैशिष्ट्ये अधोरेखित करणारा हा लेख...

उद्योग-व्यवसाय व व्यवस्थापन पद्धतीमध्ये ‘बदल’ ही एक स्थायी व निरंतर चालणारी प्रक्रिया. उद्योग व व्यवसायांच्या गरजांनुरूप हे बदल आणि बदलांच्या प्रक्रियेकडे पाहिले जाते. औपचारिक व्यवसाय व व्यवस्थापन शाखेच्या ऐतिहासिक स्थित्यंतराचा कानोसा घेता, गेल्या अडीचशे वर्षांच्या कालावधीत उद्योग व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये विविध टप्प्यांमध्ये व कालानुरूप उपयुक्त स्वरूपाचे चार बदल क्रांतिकारक स्वरूपात घडून आले आहेत. सद्यस्थितीत जागतिक स्तरावर ‘इंडस्ट्री 5.0’ या महत्त्वपूर्ण व क्रांतिकारी स्वरूपातील बदलांच्या टप्प्याची चर्चा सुरू असून, त्याच्या अंमलबजावणीकडे औद्योगिक क्षेत्र गांभीर्याने पाहात आहे, त्याचाच हा मागोवा.

तत्पूर्वी आधीच्या औद्योगिक बदलांच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांचा थोडक्यात गोषवारा खालीलप्रमाणे घेता येईल.


इंडस्ट्री 1.0 : ऐतिहासिदृष्ट्या स्पष्ट होते की, वर नमूद केल्याप्रमाणे उद्योग व व्यवसायासाठी उपयुक्त अशा ‘इंडस्ट्री 1.0’ या विशेष व्यवस्थापन बदल पद्धतीची औपचारिक सुरुवात 1680 साली झाली. त्यावेळी विशेषतः उद्योगांमधील नव्यानेच येऊ पाहणार्‍या मशीन वापराला पाणी, ऊर्जा वा वाफ यांच्या प्रयोगातून उद्योगांचे उत्पादन प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला होता.

इंडस्ट्री 2.0 : उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा ‘इंडस्ट्री 2.0’ स्वरूपात 1860 साली सुरू झाला. या टप्प्यामध्ये उत्पादन क्षेत्रासह उद्योग-व्यवसायात विजेच्या उत्पादन आणि उपयोगाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला.

इंडस्ट्री 3.0 : त्यानंतर उद्योगक्षेत्रातील तिसरा महत्त्वाचा व क्रांतिकारी टप्पा सुरू होण्यासाठी सुमारे 100 वर्षांचा कालावधी लागला. परिणामी, 1960 साली उद्योगांमध्ये व व्यवसायाला पूरक मोठा प्रयत्न म्हणून संगणकाच्या माहिती आणि उपयोगाची सांगड घालण्यात आली. परिणामी, उद्योग प्रक्रियेला उत्पादक परिणामकारकतेची जोड मिळाली. भविष्याच्या संदर्भात हे प्रयत्न आणि संगणक प्रयोग अनेक कार्यांनी क्रांतिकारक ठरले.

इंडस्ट्री 4.0 : याच बदलांच्या पुढील प्रगतीतून 2011 साली ‘इंडस्ट्री 4.0’चा टप्पा औद्योगिक क्षेत्राने गाठला. या प्रगत टप्प्यामध्ये वाढते संगणकीकरण, उत्पादन प्रक्रियेमध्ये अद्ययावतपणा, मानवी प्रयत्नांना वाढती तंत्रज्ञानाची साथ, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक व परिणामकारक उपयोग, कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिचय, अभ्यास व वापर, उद्योजकतेचा उत्पादकतेची साथ, माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग आणि अवलंब इत्यादींवर भर देण्यात आला होता.

उद्योगांमध्ये वरीलप्रमाणे प्रदीर्घ कालावधीत झालेल्या यशस्वी क्रांतिकारी बदलांचा अनुभव, उपयोग व अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडस्ट्री 5.0’ या नव्या व दूरगामी स्वरूपातील परिणामकारक पद्धतीच्या अद्ययावत उपयोगांकडे पाहणे, उद्योग-व्यवसाय या उभयतांसाठी फायदेशीर ठरणारे आहे.

औपचारिक स्वरूपात 2020 साली सुरू झालेल्या ‘इंडस्ट्री 5.0’च्या नव्या व सुधारित प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने पुढील मुद्द्यांवर भर देण्यात आला.


1) उद्योग-व्यवसाय प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानावर आधारित व अद्ययावत प्रक्रियेचा अधिक कल्पकपणे वापर करणे.

2) नव्या व बदलत्या स्वरूपातील आर्थिक, सामाजिक बदलांचा स्वीकार करणे.

3) उद्योग व व्यवसाय विकासातून सामाजिक विकासाला अधिक गतिमान करणे.

4) नव्या संशोधनाला चालना देण्यासाठी मानव संसाधनाला प्रगत ज्ञान व कौशल्यासह आवश्यक गुंतवणूक करून पद्धतशीर कार्यपद्धती विकसित करून त्याची अंमलबजावणी करणे.

वरील मुद्द्यांवरून प्रामुख्याने स्पष्ट होणारी बाब म्हणजे, उद्योग-व्यवसायांतर्गत एक कार्यपद्धती म्हणून विकसनशीलतेला सामाजिक विकासाची जोड देणे. यातूनच व्यवस्थापनांतर्गत व व्यवसायाद्वारे विकासावर भर दिला जाणार आहे. त्यादृष्टीनेच उद्योगाचा विकास व आर्थिक प्रगतीला पर्यावरण संरक्षण, आर्थिक फायद्याला समाजकार्याची जोड देऊन त्याद्वारे अधिक जबाबदार व तत्त्वांवर आधारित कार्यप्रणाली स्वीकारून व्यावसायिक यश संपादित करण्यावर भर दिला जाणार आहे.

तसे पाहता, व्यवसायातून विकास वा उद्योगातून सामाजिक जबाबदारी हे मुद्दे गेल्या काही वर्षांपासून व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून चर्चिले जात आहेत. यामध्ये व्यवसायाचाच एक आवश्यक व महत्त्वाचा भाग म्हणून पर्यावरण विषयक, सामाजिक व व्यावसायिक सुचिता म्हणजेच (एर्पींळीेपाशपींरश्र, डेलळरश्र रपव उेीिेीरींश र्ॠेींशीपरपलश - एडॠ) असे सार्थ नामाभिधान दिले आहे. यामागचा मुख्य व व्यापक उद्देश म्हणून उद्योग-व्यवसायाशी संबंधित घटकांचे हितरक्षण व त्यालाच पूरक अशा सामाजिक जबाबदारी तत्त्वाचा सम्यक अवलंबच करणे, हा आहे.

पर्यावरण सामाजिक व व्यावसायिक सुचिता या संदर्भातील वरील उद्दिष्टांची सांगड संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्यांनी मंजुरी दिलेल्या 17 विकास उद्दिष्टांना जोड म्हणून दिली गेली. यातून या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांना जागतिक स्तरावर महत्त्व व मान्यता मिळाली. यातूनच ‘2030 सालापर्यंत स्थायी विकासाच्या माध्यमातून जागतिक परिवर्तन’ ही संकल्पना व्यावहारिक अंमलबजावणीसाठी संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांनी त्यांच्या देशांमधील व्यापार-व्यवसायांसाठी मान्य करण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया घडली.

या विकास विषयक उद्देश आणि प्रयत्नांना ‘इंडस्ट्री 5.0’मुळे उद्योग-व्यवसाय क्षेत्रात गतिमान करण्यात आले, हे आता स्पष्ट होत आहे. विविध उद्योग क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या उत्पादन प्रक्रियेनुसार आपल्या व्यापार-व्यवसायवाढीच्या दरम्यान सामाजिक व सार्वत्रिक विकासाकडे आवजूर्र्न लक्ष देत आहे.

काही उद्योगांनी विचारपूर्वक व सामूहिक स्वरूपात ’अलींळेप अश्रश्रळरपलश षेी ठशलूलश्रळपस इर्शींशीरसश उरीीेंपी’ म्हणजेच ’अअठउ’ या चळवळीची आवर्जून सुरुवात केली. याच प्रयत्नांच्या पुढच्या टप्प्यात ’झरशिी इरीशव इर्शींशीरसश उरीीेंपी’ या विषयावर लक्ष केंद्रित करून उद्योगातून निर्माण होणार्‍या कागदी खोक्यांच्या फेरप्रक्रिया व वापरावर आवर्जून भर दिला जाणार आहे. अन्न व फळप्रक्रिया उद्योग-व्यवसायात कागदी खोक्यांचा वापर एकूण कच्च्या मालापैकी 65 टक्के असतो, हे यासंदर्भात उल्लेेखनीय. या क्षेत्रातील प्रमुख घटक व भागीदार असणार्‍या ‘टेट्रा-पॅक’ कंपनीने यामध्ये स्वतःच्या पुढाकाराने गुंतवणूक केली असून, ‘इंडस्ट्री 5.0’ या संकल्पनेच्या सक्रिय अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे.

आता तर उद्योग-व्यवसायात औद्योगिक प्रगतीची सामाजिक उन्नतीशी जोड घालण्यासाठी ‘इंडस्ट्री 5.0’ या संकल्पनेला विभिन्न औद्योगिक, व्यावसायिक, सामाजिक व व्यावसायिकांच्या प्रयत्नांना शासकीय व प्रशासनिक स्तरावर पुढाकार घेण्यात येत असून, त्याचे सकारात्मक स्वरूपातील दृष्य परिणाम दिसून येतील, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहेत.



(लेखक एचआर व्यवस्थापक व सल्लागार आहेत.)
दत्तात्रय आंबुलकर
9822847886
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121